Wednesday 4 March 2020

DIO BULDANA NEWS 4.3.2020

स्त्री- पुरूष भेद मिटवून.. शिक्षण आपल्याला प्रगत करते..!
  • ‘जिल्हा परिषद शाळे’च्या मारीयाने घेतला जिल्हाधिकारी बनून अनुभव
  • एक दिवसासाठी जिल्हाधिकारी उपक्रम : मलकापूरची मारिया मोहम्मद आबीद बनली जिल्हाधिकारी
बुलडाणा, दि. 4 : एका महिला घर सांभाळते…हे मी समजू शकते.. पण एक महिला जिल्हाधिकारी म्हणून संपूर्ण जिल्हा सांभाळू शकते.. याची जाणीव मला आज जिल्हाधिकारी यांच्या खूर्चीत बसून झाली. शिक्षणाने आपण किती प्रगत होतो.. याची प्रचीती मला आजच्या दिवसाने दिली. शिक्षणाने स्त्री-पुरूष भेद मिटवून प्रगतीची कवाडे उघडी होतात. त्यामुळे प्रत्येक मुलीने आपले शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभे राहीले पाहिजे, असा अनुभावातून आलेला संदेश एक दिवसासाठी जिल्हाधिकारी उपक्रमातील आजच्या जिल्हाधिकारी मारीया मोहम्मद आबीदने दिला.
   जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या संकल्पनेतून महिला सशक्तीकरणाच्या उदात्त हेतूने बुलडाणा येथे सुरू असलेल्या ‘एक दिवसासाठी जिल्हाधिकारी’ हा उपक्रम संपूर्ण राज्यात कौतुकाचा  विषय ठरला आहे. या उपक्रमातंर्गत आज 4 मार्च 2020 रोजी मलकापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलची इयत्ता 9 वीची विद्यार्थीनी मारिया मोहम्मद आबीद एक दिवसासाठी जिल्हाधिकारी म्हणून निवडण्यात आली होती. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी सांकेतिक पदभारचे पत्र सोपवून मारियाला जिल्हाधिकारी यांच्या खुर्चीत बसविले.
  सांकेतिक जिल्हाधिकारी पदभार सांभाळलेल्या मारिया म्हणाल्या, शिक्षण व्यवस्थेत बदल झाले पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येक  माध्यमिक शाळेत विज्ञान प्रयोगशाळा व संगणक प्रयोगशाळा असली पाहिजे. जेणेकरून इंग्रजी वगळता अन्य माध्यमाचे विद्यार्थीसुद्धा विज्ञान व संगणक शास्त्रात आपली पात्रता सिद्ध करतील. शिक्षण घेवून मला खुप मोठे व्हायचे आहे, जणगणनेच्या बैठकीला मी बसले.. तेव्हा कळाले. हा किती मोठा विषय आहे. या विषयाबद्दल केवळ ऐकले होते.. मात्र आज या विषयाचे गांभीर्य समजले. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी सांकेतिक स्वरूपात जिल्हाधिकारी बनलेल्या मारियाला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.
                                                                                    ******
गरीबी परिस्थीतीतून शिक्षणच बाहेर काढेल..!
  • एक दिवसासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी उपक्रमात राखी दुरगुळे बनली सीईओ
बुलडाणा, दि. 4 : आमच्या कुटूंबाची परिस्थिती हलाखीची आहे.. या गरीब परिस्थितीत वडील मला शिकवित आहे.. या गरीब परिस्थितीतून आम्हाला शिक्षणचं बाहेर काढेल.. त्यामुळे यापुढे कठोर मेहनत घेवून उज्ज्वल भविष्य बनविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया एक दिवसासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी उपक्रमात पदाचा अनुभव घेतलेल्या राखी अनिल दुरगुळे हिने व्यक्त केली.
    जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या संकल्पनेतून एक दिवसासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत जिल्हा परिषद हायस्कूल मलकापूर येथील इयत्ता 9 वीतील विद्यार्थीनी राखी अनिल दुरगुळे आज 4 मार्च 2020 रोजी एक दिवसासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवडण्यात आली.
  मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन एस यांनी सांकेतिक स्वरूपात राखीला पदभार सोपविला व सीईओच्या खुर्चीत बसविले. यावेळी राखी भारावून गेली. महिला सशक्तीकरणाच्या उदात्त हेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे निश्चितच जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थीनींचा आत्मविश्वास द्विगुणीत होत आहे.
                                                            ******  

No comments:

Post a Comment