Tuesday 24 March 2020

कोरोना अलर्ट : 24.3.2020



जिल्ह्यातील 9 डाकघर वगळता अन्य उपडाकघर व शाखा डाकघर बंद
·        31 मार्च 2020 पर्यंत असणार बंद
बुलडाणा, दि.24 : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी बुलडाणा विभागातील केवळ 9 डाक कार्यालय सुरू राहणार आहे. अन्य इतर सर्व उपडाकघर व शाखा डाकघर 31 मार्च 2020 पर्यंत बंद राहणार आहेत, याची ग्राहकांनी नोंद घ्यावी असे आवाहन अधिक्षक डाकघर, बुलडाणा यांनी केले आहे.
   या सुरू असलेल्या नऊ डाकघर कार्यालयांचे संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत. या संपर्क क्रमांकावर ग्राहकांनी डाक विभागाच्या सेवेसाठी संपर्क करावा. सुरू असलेली नऊ डाकघरे संपर्क क्रमांकांसह पुढील प्रमाणे : बुलडाणा प्रधन डाकघर संपर्क क्रमांक 07262-242508, खामगांव प्रधान डाकघर संपर्क क्रमांक 07263- 252106, चिखली डाकघर संपर्क क्रमांक 07264-242061, देऊळगांव राजा डाकघर संपर्क क्रमांक 07261-232001, जळगांव जामोद डाकघर संपर्क क्रमांक 07266-221422, मलकापूर डाकघर संपर्क क्रमांक 07267-222001, मेहकर डाकघर संपर्क क्रमांक 07268-224522, नांदुरा डाकघर संपर्क क्रमांक 07265-221030, शेगांव डाकघर संपर्क क्रमांक 07265-252062 तरी ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
                                                            ******* 
कोरोना अलर्ट :
जिल्ह्यातील एका संशयीत व्यक्तीचा अहवाल ‘निगेटीव्ह’
·        परदेशातून आलेले 57 नागरिक ‘होम क्वारंटाईन’
बुलडाणा, दि. 24 :  कोरेाना विषाणूचा प्रसार व संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे.  विदेशातून आलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे. तसेच संशयीत व्यक्तींना बुलडाणा, खामगांव व शेगांव येथील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात येत आहे. बुलडाणा येथील कक्षामध्ये दाखल दोन संशयीत व्यक्तीपैंकी एकाचा नागपूर येथील प्रयोगशाळेतून आलेला अहवाल निगेटीव्ह आला आहे.
     घरामध्ये निगराणीखाली असलेल्या नागरिकांमध्ये एका नागरिकाची भर पडली आहे. त्यानुसार काल दि. 23 मार्च 2020 पर्यंत  विदेशातून आलेल्या 56 भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. तसेच आज दि. 24 मार्च 2020 रोजी 1 नवीन नागरिकाला त्याच्या घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 57 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. तसेच स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे दोन व्यक्तींना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
     जिल्ह्यात बुलडाणा आयसोलेशन (विलगीकरण) कक्षात एक नागरिकाला संशयीत म्हणून दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी दाखल नागरिकाचा स्वॅब नमुने नागपूर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या संशयीताच्या रिपोर्ट निगेटीव्ह आला असून अन्य एकाचा नमुना नागपूरला पाठविलेला आहे.  जिल्हयात आतापर्यंत 77 विदेशी भारतीय नागरिक आले. त्यांचे निरीक्षण व तपासणी करण्यात आली. घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या 2 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच बुलडाणा स्त्री रूग्णालयात 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर 9 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. खामगांव आयसोलेशन कक्षातून 3 व बुलडाणा आयसोलेशन कक्षातून 2 नागरिकांचे तपासणी नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले,  अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दिली आहे.
                                                                        ************
जिल्ह्यातील अत्यावश्यक वगळता सर्व उद्योग व कारखाने 31 मार्चपर्यंत बंद
·        कोरोना विषाणू प्रसार पार्श्वभूमी
·        गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा उपाय
बुलडाणा, दि. 24 : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या उपायोजनांचा एक भाग म्हणून साथरोग अधिनियम 1897 मधील तरतूदींनुसार जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जिल्ह्यातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांव्यतिरिक्त  अन्य सर्व उद्योग व कारखाने आजपासून 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. या आदेशातून औषधे निर्माण करणाऱ्या तसेच वैद्यकीय सेवेकरीता साहित्याची निर्मिती करणाऱ्या कंपन्या, कारखाने, उद्योग व्यवसाय, सॅनीटायझर, साबण, जंतूनाशक हॅन्डवाश तयार करणाऱ्या कंपन्या, कारखाने, उद्योग व्यवसाय, कृषि उत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या, दालमील, ऑईलमिल, कारखाने, उद्योग व व्यवसाय आणि अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या कंपन्या कारखाने, उद्योग व्यवसाय यांना वगळण्यात आले आहे.  
   जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही भारतीय दंडसंहीता कलम 188 नुसार दंडनिय कारवाईस पात्र असणार आहे. साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गर्दी टाळण्याच्या उद्देशाने  उपाययोजना करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.
                                                                        ******
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी
उपलब्ध मनुष्यबळाची सेवा जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिग्रहीत
·        जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांचे आदेश
·        आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये जिल्हाधिकारी यांना अधिकार
बुलडाणा, दि. 24 : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. या उपाययोजना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील उपलब्ध मनुष्यबळाची सेवा अधिग्रहीत करता येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील डॉक्टर्स, व्यक्ती/ समुह, संस्था / प्राधिकरणे आदीमधील उपलब्ध असलेली सेवा, साधनसामुग्री, अधिकारी / कर्मचारी, उपलब्ध मनुष्यबळ यांची सेवा कोरोना विषाणूचा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आली आहे.   
    उपरोक्त नमूद सेवा अधिग्रहीत केलेल्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेशीत केल्यास तातडीने उपस्थित व्हावे व अनुपालन करण्यात यावे. तसा अहवालही जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील विविध कलमान्वये शिक्षा प्रस्तावित करण्यात येवून भारतीय दंडसंहीता 1860 मधील कलम 188 नुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी आदेशान्वये कळविले आहे.
*********

No comments:

Post a Comment