Wednesday 11 March 2020

DIO BULDANA NEWS 11.3.2020

मार्च व एप्रिल महिन्याचे अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेतील तांदुळाचे नियतन जाहीर
·     नागपूर येथून गोदामातून वाहतुकीचे आदेश
बुलडाणा, दि. 11 : पणन हंगाम 2019-20 मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत प्राप्त झालेल्या सीएमआर तांदुळाचे  माहे मार्च व एप्रिल 2020 चे अंत्योदय  व प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाभार्थ्यांना तांदुळाचे नियतन जाहीर करण्यात आले आहे. प्राधान्य कुटूंब योजनेकरीता मार्च महिन्यात एकूण 30 हजार 390 क्विंटलपैकी 21629.79 क्विंटल तांदुळाची, तर अंत्योदय योजनेकरीता एकूण 13300 क्विंटलपैकी 8953.39 तांदुळाची वाहतुक करावयाची आहे. त्याचप्रमाणे एप्रिल   महिन्यासाठी अंत्योदय योजनेकरीता 13300 क्विंटल व प्राधान्य कुटूंबातील योजनेकरीता 30390 क्विंटल तांदुळाची वाहतूक नागपूर शहरातील वर्धमान नगर येथील वखार महामंडळाच्या गोदामामधून जिल्ह्यातील विविध शासकीय धान्य गोदामात करण्याबबात आदेश देण्यात आलेले आहे.
   सदर धान्याची जी उचल करण्यासाठी बी.एस जुमडे यांचेऐवजी श्री. बोराडे, पुरवठा निरीक्षक, तहसील कार्यालय, शेगांव हे वाहतूक प्रतिनिधी म्हणून नागपूर शहरातील वर्धमान नगर येथील सीडब्ल्यूसी च्या गोदामात 9 मार्च 2020 पासून पुढील आदेशापर्यंत नेमणूक करण्यात येत आहे. जिल्ह्यातील कार्यरत वाहतूक कंत्राटदार गौरी एंटरप्राईजेस, जळगांव व औरंगाबाद यांना आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत माहे मार्च 2020 चे तांदुळ नियतनाची उचल भंडारा जिल्ह्यातील आमगांव गोदाम येथून करण्याबबात आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र शासनाचे 20 फेब्रुवारी 2020 च्या पत्रातील निर्देशाच्या अनुषंगाने वाहतुक कंत्राटदार गौरी एंटरप्राईजेस, जळगांव व औरंगाबाद यांना सदर तांदुळाचे नियतनाची उचल तात्काळ थांबविण्याबाबत कळविण्यात येत आहे.
  जिल्ह्यासाठी दिलेल्या नियतनाचे भंडारा जिल्ह्यातील रद्द करण्यात येत असून जिल्ह्याकरीता अंत्योदयसाठी 1330 मे.टन व प्राधान्य कुटूंबासाठी 3039 मे.टन नियतन नागपूर शहरातील वर्धमान नगर येथील वखार महामंडळाच्या गोदामातून उचल करण्यात यावी. सदर तांदुळाची उचल या आदेशाच्या दिनांकापासून जिल्ह्यासाठी नियुक्त केलेल्या वाहतुकदाराकडून करण्यात येवू नये. सदर तांदुळाची उचल नागपूर जिल्ह्यासाठी टीपीडीएस च्या अन्न धान्याची वाहतूक करीत असलेल्या विद्यमान वाहतूकदाराने करावयाची आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
अशी राहणार अंत्योदय योजनेतील शासकीय गोदामनिहाय तांदुळाची वाहतूक
बुलडाणा :  मार्च व एप्रिल प्रत्येकी 1399, चिखली :  मार्च व एप्रिल 685, अमडापूर : मार्च व एप्रिल 233, दे.राजा :  मार्च व एप्रिल 569, मेहकर : मार्च व एप्रिल 846, डोणगांव : मार्च व एप्रिल 266, लोणार : मार्च व एप्रिल 1299, सिंदखेड राजा : मार्च व एप्रिल 558, साखरखेर्डा : मार्च व एप्रिल 309, मलकापूर : मार्च व एप्रिल 907, मोताळा : मार्च व एप्रिल 1174, नांदुरा : मार्च व एप्रिल 1215, खामगांव : मार्च व एप्रिल 1007, शेगांव : मार्च व एप्रिल 608, जळगांव जामोद : मार्च व एप्रिल 1008 आणि संग्रामपूर तालुक्यात 1217 क्विंटल असणार आहे.      
अशी राहणार प्राधान्य कुटूंब योजनेतील शासकीय गोदामनिहाय तांदुळाची वाहतूक
बुलडाणा :  मार्च व एप्रिल प्रत्येकी 3351, चिखली :  मार्च व एप्रिल 2846, अमडापूर : मार्च व एप्रिल 925, दे.राजा :  मार्च व एप्रिल 1392, मेहकर : मार्च व एप्रिल 2481, डोणगांव : मार्च व एप्रिल 878, लोणार : मार्च व एप्रिल 1648, सिंदखेड राजा : मार्च व एप्रिल 1112, साखरखेर्डा : मार्च व एप्रिल 844, मलकापूर : मार्च व एप्रिल 2011, मोताळा : मार्च व एप्रिल 1973, नांदुरा : मार्च व एप्रिल 1998, खामगांव : मार्च व एप्रिल 3643, शेगांव : मार्च व एप्रिल 1754, जळगांव जामोद : मार्च व एप्रिल 1832 आणि संग्रामपूर तालुक्यात मार्च व एप्रिल महिन्यात प्रत्येकी 1702 क्विंटल असणार आहे.      
                                                            *******

चिखली आयटीआय येथे 12 मार्च रोजी रोजगार मेळावा
·        155 पदांसाठी होणार भरती
बुलडाणादि. 11 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा व औद्योगिक प्रशिक्षण संस्था,  चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने पंडि‍त दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन गुरूवार,  दि. 12 मार्च 2020 रोजी  सकाळी 11 वाजता करण्यात आले  आहे. या मेळाव्यात निवड पद्धत ही मुलाखत असणार आहे. सदर मेळाव्यात 155 पदांसाठी भरती होत आहे.  तरी तरूण – तरूणींनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
        मेळाव्यास उपस्थि‍त राहणेकरीता सेवायोजन कार्ड, आधारकार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र, शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती, 5 पासपोर्ट फोटो, बायोडाटा सोबत असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी प्राचार्य,औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चिखली यांच्या 9405105884 क्रमांकावर व सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथील 07262-242342 क्रमांकावर संपर्क साधावा,असे जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त गणेश चिमणकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 
अशी करा नोंदणी
अर्जदाराने www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर Employment टॅबवर क्लिक करावी. यामध्ये जॉब सीकर हा पर्याय निवडणूक आपला नोंदणी / आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने साईन इर्न कर. आपल्या होमपेजवर जॉब फेअर हा पर्याय निवडावा. यामध्ये बुलडाणा जिल्हा निवडणूक 12 मार्च 2020 रोजी होणाऱ्या रोजगार मेळाव्यासाठी उपस्थिती नोंदविण्यासाठी क्लिक करावी. त्यानंतर आय ॲग्री या बटनावर क्लिक करावी. आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करून अप्लाय वर क्लिक करावे.
                                                 रोजगार मेळाव्यात कंपनीनुसार अशी असणार पदे
क्लाड मेटल इंडिया प्रा. लि. औरंगाबाद : पदाचे नाव - रेफ्रीजमेंट ॲण्ड एअर कंडीशन,  शिट मेटल वर्कर, मशिनिष्ट, फिटर, वेल्डर, पदे 35, वेतन 8450 मासिक, वयोमर्यादा 18 ते 35 व शैक्षणिक पात्रता 10, 12 वी व आयटीआय उत्तीर्ण.  नवकिसान बायो प्लॅण्टेक लिमीटेड, जळगांव : पदाचे नाव – फिल्ड ऑफीसर, पदे 25, वेतन 8500 मासिक, वयोमर्यादा 20 ते 35 व शैक्षणिक पात्रता 10, 12 वी उत्तीर्ण.  सतिशजी इन्फ्राटेक प्रा. लि चिखली : पदाचे नाव – वेल्डर, फिटर व हेल्पर, पदे 15, वेतन 6 ते 7 हजार मासिक, वयोमर्यादा 18 ते 35 व शैक्षणिक पात्रता 10 वी व आयटीआय उत्तीर्ण.  भारतीय जिवन बिमा निगम, बुलडाणा : पदाचे नाव – ग्रामीण व्यावसायिक एजंट, पदे 30, वेतन कमीशननुसार, वयोमर्यादा 18 ते 35 व शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण.  धुत ट्रान्समिशन प्रा. लि, औरंगाबाद : पदाचे नाव – ट्रेनी ऑपरेटर, पदे  50, वेतन 7200 ते 9200 मासिक, वयोमर्यादा 18 ते 35 व शैक्षणिक पात्रता महिलांसाठी 10, 12 वी, आयटीआय, एमसीव्हीसी, पदविका उत्तीर्ण पुरूषांकरीता आयटीआय, पदवीधर अथवा पदवी उत्तीर्ण.  
                                                ******
                  बंद पडलेल्या टपाल व ग्रामीण टपाल जीवन विमा पॉलीसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी
·        31 मार्च 2020 पर्यंत जवळच्या पोस्ट ऑफीसमध्ये लेखी अर्ज करावा
बुलडाणादि. 11 :  ज्या पॉलीसी धारकांच्या पॉलीसी सतत 5 वर्षे भरणा न केल्याकारणाने बंद पडलेल्या आहेत. त्या पॉलीसीचे पुनूरुज्जीवन 1 एप्रिल 2020 नंतर करता येणार नाही. त्यामुळे शेवटची संधी म्हणून शेवटच्या भरलेल्या प्रिमीयमच्या तारखेपासून 5 वर्षांची मर्यादा ओलांडलेल्या पॉलीसी 31 मार्च 2020 पर्यंत पुनरूज्जीवीत करण्यासाठी विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.  
   या संधीचा लाभ घेण्यासाठी पॉलीसी धारकांनी जवळच्या डाक कार्यालयाशी संपर्क साधावा. पोस्ट ऑफीस लाईफ इन्शुरन्स नियम 2011 मधील अटी व शर्तींच्या दुरूस्तीच्या अनुषंगाने अधिसूचना दि 19 सप्टेंबर 2019 च्या निवेदनानुसार पॉलीसीचे पुनरूज्जीवन करता येणार आहे. त्यासाठी पॉलीसी धारकांच्या चांगल्या आरोग्याच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता राहील.  अशा पॉलीसीचे पॉलीसीधारक ज्यांना विमा लाभ मिळविण्यासाठी पॉलीसी पुनरूज्जीवीत करण्याचा  विचार आहे, त्यांनी जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफीसमध्ये 31 मार्च 2020 च्या आधी लेखी अर्ज करावा. या तारखेनंतर पॉलीसीचे पुनरूज्जीवन केले जाणार नाही, त्यामुळे त्या पॉलीसीज नियमांनुसार रद्दबातल समजल्या जातील. अधिक माहितीसाठी आमच्या टोल फ्री क्रमांक18001805232 वर संपर्क करावा, असे आवाहन डाक अधिक्षक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                                    *******
मासळी व मासळीपासून बनविलेल्या पदार्थांमधून कोरोनाचा फैलाव होत नाही
·        सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांचे आवाहन
बुलडाणादि. 11 :  सद्यस्थितीत कोरोना विषाणूबाबत सामाजिक माध्यमांमधून वेगवेगळे संदेश प्राप्त होत आहेत. यापैकी असाच एक चुकीचा संदेश मासळी व मासळीपासून बनविलेल्या पदार्थांमधून कोरोना विषाणूचा फैलाव होत आहे, असा आहे. ही निव्वळ अफवा आहे, अशा खोट्या अफवांवर, कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन सहायक आयुक्त स. ई नायकवडी यांनी केले आहे.
    जागतिक प्राणी आरोग्य संस्था यांचे अहवालानुसार प्राण्यांच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा फैलाव होत नाही. गर्दीची ठिकाणे मनुष्याच्या संपर्कातून फैलाव होण्याची शक्यता असते. यानुसार मास्कचा वापर करणे, रूमालचा वापर शिंकतांना, खोकतांना करणे.गर्दीच्या ठिकाणी मास्क/ रूमालाचा वापर करणेबाबत खबरदारी घ्यावी. वैयक्तिक घरातील आणि परीसराची स्वच्छता ठेवावी. तसेच मासळी, दुग्ध जन्य पदार्थ, पालेभाज्या असा पौष्टीक आहार घेवून प्रथिनेयुक्त व्हिटॅमीन घेवून आपली प्रतिकार शक्ती कायम ठेवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
                                                            ********
अंडी व चिकनमधून कोरोनाचा प्रादुर्भाव नाही ; अफवांकडे दुर्लक्ष करावे
·        जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांचे आवाहन
बुलडाणादि. 11 :  पशुसंवर्धन विभाग व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर यांनी शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून दिलेल्या प्रोत्साहनामुळे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी कुक्कुट पालन व्यवसाय सुरू केला. मात्र नोव्हेल कोरोना विषाणूचा फैलावानंतर सोशल मिडीयामधून कुक्कुट मांस व इतर कुक्कुट उत्पादने यांच्या आहारातील उपयोगाबाबत विविध अशास्त्रीय अफवा पसरविल्या जात आहेत. कुक्कुट मांस व कुक्कुट उत्पादने यांचा नोव्हेल कोरोना विषाणू प्रादुर्भावाशी कोणताही संबंध नसून कुक्कुट मांस व कुक्कुट उत्पादने यांच्या सेवनातून मानवामध्ये कोरोना विषाणू संग्रमीत झाल्याचे संदर्भ नाहीत. आपल्याकडे चिकन व मटन उकळून शिजवून सेवन केले जाते व त्या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहू शकत नाही.
  मानवीय आहारामध्ये सदर बाबी वापरण्यासाठी पुर्णपणे सुरक्षीत असून नागरिकांनी सोशल मिडीयावरील बातम्यांकडे, अफवांकडे दुर्लक्ष करावे. याबबात काही शंका असल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन सभापती, पशुसंवर्धन व दुग्धशाळा विषय समिती, जि.प, बुलडाणा तसेच पशुसंवर्धन विभाग यांच्यावतीने प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे.
                                                                        *******
फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये पाळीव प्राण्यांची वाहतुकीवर निर्बंध
बुलडाणादि. 11 :  कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सैलानी यात्रा  स्थगित करण्यात आली आहे. सदर यात्रेमध्ये देशातील काना- कोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात आणि सैलानी यात्रेत पारंपारिक प्रथेनुसार कोंबड्या व बकरे यांची कुर्बानी देण्याची पद्धत आहे. आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने सदर आजाराच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना 3 मार्च 2020 च्या मार्गदर्शिकेनुसार कोरोनाचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षीत अंतर रहावे म्हणून गर्दी, यात्रा, मेळावे यावर प्रतिबंध उपाययोजना करण्याचे निर्देश आहेत. प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी पाळीव प्राण्याची वाहतुक व कुर्बानी यात्रा कालावधीत प्रतिबंधीत करणे आवश्यक झाले आहे. फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये सैलानी परिसरात पाळीव प्राण्यांची वाहतुक करण्यास तसेच प्राणी जमविण्यास निर्बंध घालण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                        *****

सैन्य, नौदल व वायुदलात अधिकारी पदासाठी पुर्व प्रशिक्षण
·        12 मार्च रेाजी मुलाखत
बुलडाणादि. 11 :  भारतीय सैन्यदलात, नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्वीस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची पुर्वतयारी करून घेण्यात येते. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतीसाठी 17 मार्च ते 26 मार्च 2020 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 53 आयोतिज करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थी  निवास, भोजन व प्रशिक्षणाची विनामूल्य सोय करण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे 12 मार्च 2020 रेाजी मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येतेवेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिलेले प्रवेशपत्र, यासोबत असलेली परिशिष्ट प्रिंट दोन प्रतीत घेवून व ते पूर्ण भरून सोबत आणावे.
    अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्रमांक 0253-2451031 व 2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवरून संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
                                                                        *****
--

No comments:

Post a Comment