चिखलीत आंतरराष्ट्रीय योग दिन (२१ जून) उत्साहात साजरा होणार; तालुका क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिकांचे आयोजन

 


बुलढाणा दि.18 (जिमाका): संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला असून, यंदा १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन चिखली येथे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. तालुका प्रशासन चिखली, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा, तालुका क्रीडा संकुल समिती चिखली तसेच शहरातील विविध योग संस्था व संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

आयुष मंत्रालयाच्या निर्देशित मानकांनुसार रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी सकाळी ७ ते ७.४५ या वेळेत तालुका क्रीडा संकुल, चिखली येथे सामूहिक योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. योगामुळे व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक व आत्मिक विकासाला चालना मिळते. तसेच निरोगी, सुसंस्कृत आणि जागरूक नागरिक घडविण्यास योगविद्या महत्त्वाची भूमिका बजावते. योगाचा प्रचार-प्रसार करून समाजात आरोग्याबाबत कायमस्वरूपी जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

या कार्यक्रमात शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचारी, नेहरू युवा केंद्र, पोलीस विभाग, महिला मंडळे, क्रीडा मंडळे, एनसीसी, एनएसएस, भारत स्काऊट-गाईड, क्रीडा भारती, आरोग्य भारती, आर्ट ऑफ लिव्हिंग, योग विद्याधाम, योगांजली योग वर्ग, पतंजली योग समिती, विविध क्रीडा संघटना, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, आयुर्वेद व नर्सिंग महाविद्यालये तसेच योग क्षेत्रात कार्यरत संस्था सहभागी होणार आहेत.

योग दिन कार्यक्रमात क्रीडाप्रेमी नागरिक, युवक-युवती तसेच सर्व क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन तालुका क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध विभाग व संस्थांकडून तयारी पूर्ण करण्यात आली असून, चिखली शहरात योग दिनाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी