पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
बुलढाणा,
दि. 29 (जिमाका): भारत सरकारतर्फे
प्रदान करण्यात येणाऱ्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी पद्मविभूषण, पद्मभूषण
आणि पद्मश्री या पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात
आले आहे.
गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने प्रजासत्ताक
दिन २०२७ निमित्त जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट
आणि समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींची नामांकने मागविण्यात आली आहेत. कला, साहित्य
व शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्र, समाजकार्य, विज्ञान व अभियांत्रिकी, नागरी सेवा,
व्यापार व उद्योग आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार
प्रदान करण्यात येतात.
जिल्ह्यातील पात्र व्यक्तींची नामांकने विहित नमुन्यात
भरून दि. ३१ जुलै २०२६ पर्यंत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (http://awards.gov.in) वर
ऑनलाइन अपलोड करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. पद्म पुरस्कारांसंदर्भातील अधिक माहिती
तसेच ऑनलाइन नामांकन प्रक्रियेची माहिती राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर उपलब्ध असून,
इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाने कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment