क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू
बुलढाणा,
दि. ८ जून : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह (नवीन व जुने), बुलढाणा
येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
वसतिगृहातील
प्रवेशासाठी प्रवर्गनिहाय आरक्षित टक्केवारीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,
इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील
विद्यार्थिनी पात्र राहणार आहेत. शालेय शिक्षण, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ
महाविद्यालय तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना प्रवेशासाठी अर्ज
करता येणार आहे.
प्रवेशासाठी
इच्छुक विद्यार्थिनींनी www.hmas.mahait.org
या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ३० जून २०२६ असून पात्र
विद्यार्थिनींनी मुदतीपूर्वी अर्ज भरून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन
वसतिगृहाच्या गृहपाल यांनी केले आहे.
शासकीय
वसतिगृहांमुळे विद्यार्थिनींना सुरक्षित निवास, शैक्षणिक वातावरण आणि विविध शासकीय
सुविधांचा लाभ मिळत असल्याने अधिकाधिक विद्यार्थिनींनी प्रवेश प्रक्रियेत सहभागी
व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment