देऊळगाव राजा शासकीय आयटीआय येथे प्रवेश प्रक्रिया सुरू; 21 जूनपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी


बुलढाणा,दि.9 (जिमाका) : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नविन्यता विभाग तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देऊळगाव राजा येथे शैक्षणिक सत्र ऑगस्ट 2026 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने दि. 21 जून 2026 पर्यंत अर्ज भरून प्रवेश अर्ज शुल्क जमा करावे.

संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण अथवा तांत्रिक समस्या उद्भवल्यास विद्यार्थ्यांनी जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट देऊन मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे. कौशल्याधारित शिक्षण आणि रोजगाराच्या वाढत्या संधी लक्षात घेता, इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या करिअरची भक्कम पायाभरणी करावी, असेही संस्थेकडून सांगण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी