Posts

Showing posts from May, 2026

जिल्ह्यात योजनांची प्रभावी अंमलबजावणी; विकासाला गती- पालकमंत्री ना. मकरंद जाधव पाटील • पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण

Image
    •           पोलीस विभागाच्या २७ वाहनांचे उद्घाटन   बुलढाणा, दि. १ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून समृद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक बुलढाणा घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले.   पोलिस कवायत मैदान येथे 1 मे महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ.प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ ना...

“माझे गाव, आरोग्य संपन्न गाव” अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; जिल्हाभर एनसीडी तपासणी शिबिरांचे यशस्वी आयोजन

    बुलढाणा, दि.30 (जिमाका) : “ माझे गाव, आरोग्य संपन्न गाव ” या अभियानांतर्गत जिल्हाभर असंसर्गजन्य रोग (NCD) तपासणी शिबिरांचे व्यापक व यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.   हा उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. शिबिरांमध्ये नागरिकांची उच्च रक्तदाब, मधुमेह, अॅनिमिया, ईसीजी, कर्करोग तसेच सिकल सेल तपासणी करण्यात आली. गरोदर मातांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक मार्गदर्शनही देण्यात आले.   किशोरवयीन मुलींमध्ये HPV लसीकरणाबाबत जनजागृती व समुपदेशन करण्यात आले असून लसीकरणासाठी प्रोत्साहन देण्यात आले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उष्माघात (Heat Stroke) प्रतिबंधासाठी आवश्यक सूचना देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.   विविध तालुक्यांत शिबिरांचे आयोजन   चिखली तालुका : प्राथमिक आरोग्य केंद्र अंत्री खेडेकर, एकालारा तसेच उपकेंद्र मंगरूळ नवघरे आणि धोत्रा नाईक येथे शिबिरे आयोजित करण...