निरंतर देशसेवेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घ आयुष्यासाठी मेहकरच्या श्री शारंगधर बालाजी महाराजांची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली मनोभावे आरती
बुलढाणा, (जिमाका) दि. 12 : भारताचे पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी सलग बारा वर्षे पंतप्रधानपदी विराजमान राहण्याचा बहुमान मिळवला आहे. त्यांच्या
तपपुर्ती आणि निरंतर देशसेवेसाठी दीर्घ आयुष्य लाभो यासाठी मेहकरच्या श्री शारंगधर
बालाजी महाराजांची आरती आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली
केंद्रामध्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला बारा वर्षे पूर्ण झाले आहेत. सलग
बारा वर्षे पंतप्रधानपदी राहिलेले नरेंद्र
मोदी हे भारतातील पहिले प्रथम पंतप्रधान ठरले आहे. मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वात
भारताल विकसित करण्याचा मार्ग दाखवत जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या
दीर्घायुष्यासाठी आणि भविष्यातील अखंड सेवेसाठी आज 12 जून रोजी मेहकर येथील श्री शारंगधर
बालाजीं चरणी प्रार्थना करून केंद्रीय आयुष
आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव
यांनी आरती केली. यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे
सभापती माधवराव जाधव, दिलीपराव देशमुख, किसनराव बळी, सुरेश वाळुकर, जयचंद बाढीया, डॉ.सुभाष
लोहिया, बबनराव भोसले, बबनराव तुपे, रामेश्वर म्हस्के, शिवसेना नगरसेवक ओम सोभागे,
विशाल काबरा,मनोज जाधव, मंगेश गायकवाड उपस्थित होते
00000



Comments
Post a Comment