बुलडाण्यात शेळीपालन, कुक्कुटपालन व गाय-म्हैस पालन प्रशिक्षणाचे आयोजन
बुलढाणा, दि. 26 (जिमाका) : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी)
यांच्या वतीने जिल्हा उद्योग केंद्र, बुलढाणा यांच्या माध्यमातून उद्योग-व्यवसाय
सुरू करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी शेळीपालन, कुक्कुटपालन
तसेच गाय-म्हैस पालन या विषयांवरील पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दि. २ जुलै ते ६ जुलै २०२६
या कालावधीत बुलढाणा येथे होणार आहे.
सुशिक्षित
बेरोजगारांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःचा
उद्योग उभारावा, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.
प्रशिक्षणामध्ये
शेळीपालन, कुक्कुटपालन आणि गाय-म्हैस पालनाचे आधुनिक तंत्रज्ञान, विविध जातींची
माहिती, लसीकरण, रोग व त्यांची लक्षणे, पशुखाद्य निर्मिती, चाऱ्याचे प्रकार,
उद्योग उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन, उद्योजकता विकास, उद्योग संधी, शासकीय
योजनांची माहिती तसेच व्यवसायासाठी आवश्यक सहकार्य याविषयी तज्ज्ञांकडून
मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणासाठी
अर्ज करणारा उमेदवार किमान ५ वी उत्तीर्ण आणि
१८ वर्षे वयाचा असावा. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण
करणाऱ्या सहभागींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
प्रशिक्षणासाठी
नोंदणी, शुल्क तसेच अधिक माहितीसाठी इच्छुकांनी दि. २ जुलै २०२६
पर्यंत कार्यालयीन वेळेत श्री. गणेश गुप्ता, प्रकल्प
अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), जिल्हा उद्योग केंद्र,
तहसील कार्यालयाजवळ, चिखली रोड, बुलढाणा येथे संपर्क साधावा. तसेच
मो. ९०११५७८८५४ / ८२७५०९३२०१ या क्रमांकावरही संपर्क साधता
येईल.
या प्रशिक्षणाचा लाभ
घेऊन स्वयंरोजगाराच्या दिशेने पाऊल टाकण्याचे आवाहन श्री.
किशोर अंभोरे, विभागीय अधिकारी, एमसीईडी, अमरावती यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment