सिंदखेड राजा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सुरू
बुलढाणा दि.10 (जिमाका):
कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नविन्यता
विभाग तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय
औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), सिंदखेड राजा, जि. बुलढाणा येथे शैक्षणिक सत्र
ऑगस्ट 2026 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश
घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी दि. 21 जून 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून
प्रवेश अर्ज शुल्क जमा करावे.
कौशल्याधारित शिक्षणाद्वारे रोजगार व स्वयंरोजगाराच्या
संधी उपलब्ध करून देणाऱ्या आयटीआय अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर
प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत
अर्ज सादर करून आपला प्रवेश निश्चित करावा. प्रवेश प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण अथवा
तांत्रिक समस्या उद्भवल्यास विद्यार्थ्यांनी जवळील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संपर्क
साधावा, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिंदखेड राजा यांच्या प्राचार्यांनी
केले आहे.
0000
Comments
Post a Comment