Posts

Showing posts from February, 2026

प्रत्येकांनी आरोग्याबाबत सजग राहावे: आरोग्य हीच खरी संपत्ती आहे – केंद्रीय आयुष , आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव

Image
    बुलढाणा, दि. 27 (जिमाका) : लहानपणापासून नियमित व्यायाम, योगाभ्यास आणि संतुलित आहाराचा अवलंब केल्यास व्यक्ती निरोगी राहू शकते. मुलांनी बाहेरील जंकफूड, पिझ्झा तसेच रासायनिक पेयांपासून दूर राहून आरोग्याबाबत सजग राहावे. ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.   शेगाव येथील विसावा मैदानावर चार दिवसीय आरोग्य मेळाव्याचं आयोजन आयुष मंत्रालयाच्या वतीने करण्यात आल आहे आज 27 फेब्रुवारीला शाळकरी विद्यार्थ्यांना पोषण आहार व आरोग्य या विषयावर   आयुर्वेदिक बाल आरोग्य तज्ञ वैद्य मैत्रीय सौरभ लिमये यांनी मार्गदर्शन केले तर केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव बोलत होते ते पुढे म्हणाले की, नागरिकांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी असल्यास देशाच्या विकासाला गती मिळते. निरोगी नागरिक हीच राष्ट्राची खरी ताकद आहे. मात्र, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत तरुण वर्ग कामाच्या व्यापामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे. अनियमित दिनचर्या, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे पुढ...

“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानास मंत्रिमंडळाची मान्यता लोकसहभागातून आरोग्यदायी महाराष्ट्र घडविण्याचा शासनाचा निर्धार

    बुलढाणा, दि. 27 (जिमाका): राज्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, रोगमुक्त व स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या “ माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ” या महत्त्वाकांक्षी अभियानास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. लोकसहभागावर आधारित ही राज्यव्यापी आरोग्य चळवळ दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत राज्यभर राबविण्यात येणार आहे.   गावपातळीवर नागरिकांचे आरोग्यमान उंचावणे, प्रतिबंधात्मक व प्रोत्साहनात्मक आरोग्य सेवांना चालना देणे, आरोग्यविषयक सामाजिक वर्तणुकीत सकारात्मक बदल घडवून आणणे आणि आरोग्यदायी जीवनशैली रुजविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. सार्वजनिक स्वच्छता, सुरक्षित पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, सामाजिक प्रबोधन तसेच विविध विभागांच्या समन्वयातून “ आरोग्यदायी गाव ” घडविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.   या अभियानांतर्गत उपचारांपेक्षा आजार होऊ नयेत यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करणे, माता-बाल आरोग्य सुधारणा, पोषण, स्वच...

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी

               बु लढाणा, दि. 27 (जिमाका):   बाल न्याय मुलांची (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व सुधारित 2021 दत्तक नियमावली 2022 नुसार भारतात दत्तक विधान प्रक्रिया राबविली जाते. यानुसार दत्तक विधान कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून भावी इच्छुक माता-पिता बालक दत्तक घेऊ शकतात, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.              बाळ दत्तक कोण घेऊ शकतो : भावी दत्तक माता हे शारीरिक, मानसिक, भावनात्मक आणि आर्थिक स्वरुपात सक्षम असणे आवश्यक आहे. या दत्तक विधान प्रक्रियेसाठी दोन्ही पती-पत्नी यांची सहमती असणे आवश्यक आहे. एकल महिला हि दत्तकसाठी बालक किंवा बालिका निवडु शकते, एकल पुरुष फक्त बालकाची निवड करु शकतो.              बाळ दत्तक घेण्यासाठीची पालकांची वयोमर्यादा : दोन वर्षाच्या आतील बालक असल्यास भावी दत्तक माता पिता यांची संयुक्तिक कमाल वयोमर्यादा 85 वर्ष, तर भावी एकल माता पिता यांची कमाल ...

8 मार्च रोजी 'विधी सेवा महाशिबिर'; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी घेतला तयारीचा आढावा

Image
  बुलढाणा, (जिमाका)दि. 27 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली तालुक्यातील अमडापूर येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. मौजे अमडापूर देवी संस्थाच्या परिसरात 8 मार्च रोजी सकाळी 10 वा. पासून सुरू होणाऱ्या या शिबिराच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव नितीन पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या शिबिराच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ आणि कायदेशीर मार्गदर्शन मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सर्व विभागांच्या प्रमुखांना सेवा शिबिरांच्या अनुषंगाने विशेष सूचना दिल्या. शिबिराच्या ठिकाणी 50 स्टॉल्स लावण्यात येणार असून नगरपालिका, आरोग्य, कृषी, जिल्हा कौशल्य विकास, जिल्हा रेशीम उद्योग, जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सहकार, महसूल, समाज कल्याण, एकात्मिक बाल विकास आणि कामगार कल्याण अशा विविध विभागांचे स्वतंत्...

शासकीय वसतिगृहात ऑनलाईन प्रवेश अर्ज सुरु; 11 मार्चपर्यंत मुदत

बुलढाणा, दि. 27 (जिमाका): शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यातील इतर मागास वर्ग (OBC), विमुक्त जाती (VJ), भटक्या जमाती (NT) व विशेष मागास प्रवर्ग (SBC) विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अंतर्गत प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांच्या पत्रानुसार, इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सन 2025-26 मध्ये वरील योजनांचा लाभ मिळविण्यासाठी शासकीय वसतिगृहात ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. इयत्ता १२ वी नंतरचे बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. तसेच इतर व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 11 मार्च 2026 पर्यंत अर्ज करावे. निवड यादी गुणवत्तेनुसार अंतिम व प्रसिद्ध 12 मार्च 2026 रोजी होईल. निवड यादीप्रमाणे प्रवेशाची अंतिम मुदत 20 मार्च 2026 राहिल. सदर अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून पात्र विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आल...

मलकापूर तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

    बुलढाणा, दि. 27 (जिमाका): माहे जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 दरम्यान मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ग्रामविकास विभाग यांच्या आदेश दिनांक 17 फेब्रुवारी 2026 अन्वये प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मलकापूर तालुक्यातील 33   ग्रामपंचायतींचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे.   > समाविष्ट ग्रामपंचायती याप्रमाणे : दसरखेड, नरवेल, विवरा, भानगुरा, तिघ्रा, म्हैसवाडी, वाघोळा, दुधलगाव खुर्द, चिखली, निबारी, घिर्णी, वाघुड, माकनेर, वडोदा, धरणगाव, भालेगाव, कुंड खुर्द, कुंड बु., तालसवाडा, तांदलवाडी, हिंगणाकाझी, शिराढोण, भाडगणी, पिंपळखुटा बु., दाताळा, वरखेड, लासुरा, खामखेड, जांभुळधाबा, वडजी, दुधलगाव बु., लोणवडी व हरणखेड.   प्रारूप प्रभाग रचना तयार करणे: तहसिलदार यांनी गुगल अर्थ नकाशांवर सुपर इम्पोज करून गावनिहाय नकाशे अंतिम करणे, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्थळ पाहणीनंतर प्रभाग पाडणे व सीमा निश्चित 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर तहसिलदार यांच्या...

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग खरेदी-विक्री संमेलन 7 मार्चला

    बुलढाणा, दि. 27 (जिमाका) : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत जिल्ह्यातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच स्थानिक उत्पादनांना चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभाग, बुलढाणा यांच्या वतीने शनिवार, दि. 7 मार्च 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता जिजामाता प्रेक्षागृह येथे विशेष जिल्हास्तरीय खरेदी-विक्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.   या संमेलनाचा मुख्य उद्देश उत्पादक आणि खरेदीदार यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित करणे हा आहे. जिल्ह्यातील वैयक्तिक लाभार्थी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) तसेच सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजक या संमेलनात सहभागी होणार आहेत. संमेलनात मसाले, धान्य प्रक्रिया उत्पादने, फळ-भाजीपाला प्रक्रिया पदार्थ, लोणची, पापड, चटण्या आणि बेकरी उत्पादनांचे स्टॉल्स उभारले जाणार असून स्थानिक उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री केली जाणार आहे.   कार्यक्रमादरम्यान तज्ज्ञांकडून ब्रँडिंग व आकर्षक पॅकेजिंग तंत्र, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) नोंदणी प्रक...

वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान २०२६ : बुलढाणा राज्यात सहावा, अकोला विभागात प्रथम

    बुलढाणा,दि.27 (जिमाका) : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या परिपत्रकानुसार “ वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान २०२६ ” अंतर्गत National Tuberculosis Elimination Program (NTEP) कार्यप्रदर्शनाच्या राज्यस्तरीय मानांकनात बुलढाणा जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. बुलढाणा जिल्हा राज्यात सहाव्या स्थानी तर अकोला विभागात बुलढाणा जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावून विभागात अग्रस्थान मिळवले आहे.   राज्यस्तरीय गुणांकनात अवघ्या एका गुणामुळे पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये स्थान हुकले असले, तरी बुलढाणा जिल्हा राज्यात सहाव्या स्थानी राहिला आहे. विशेष म्हणजे, अकोला विभागात बुलढाणा जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावून विभागात अग्रस्थान मिळवले आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत बुलढाणा जिल्हा सातत्याने राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवत असून, ही सातत्यपूर्ण प्रगती जिल्ह्याच्या सक्षम नियोजनाची साक्ष देणारी आहे.   केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्य...

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम

    बुलढाणा,दि.27 (जिमाका) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी मोफत अनिवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम एक महिना व दोन महिने अशा कालावधीत राबविण्यात येणार आहे.   सदर उपक्रमाचा मुख्य उद्देश अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार सुरू करावा किंवा तांत्रिक कौशल्याच्या आधारे रोजगाराच्या संधी प्राप्त कराव्यात हा आहे. प्रशिक्षणादरम्यान संबंधित विषयांचे प्रॅक्टिकलसह तांत्रिक ज्ञान तसेच उद्योजकीय मार्गदर्शन दिले जाणार आहे.   प्रशिक्षणात उद्योग उभारणी प्रक्रिया, शासकीय कर्ज व अनुदान योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल तयार करणे, विक्री कला, उद्योग व्यवस्थापन, उद्योगांना भेटी, तसेच कर कायदा व परवाने (लायसन्स) याविषयी तज्ञ मार्गदर्शकांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल. लाभार्थींची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे...

डाक अदालत 9 मार्चला

    बुलढाणा, (जिमाका) दि. 27:    पोस्ट विभागाच्या तक्रारी सोडविण्यासाठी बुलडाणा डाकघर विभागातर्फे सोमवार, दि. 9 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आले आहे. पोस्टाच्या कार्याविषयी किंवा कामकाजाबद्दल सहा आठवड्यात तक्रारींचे निवारण झालेले नसल्यास अशा तक्रारींची दखल डाक अदालतीमध्ये घेतल्या जाणार आहे.               देशातील पोस्टाची सेवा ही सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये पोस्टाच्या सेवेने वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते. ही सेवा देताना संभाषण, पत्रव्यवहार किंवा सेवेमध्यील काही त्रृटीमुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रारी होतात. तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवडा करण्यासाठी पोस्ट खात्यातर्फे डाक अदालती घेण्यात येते. विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तू पार्सल, बचत बँक आणि मनीऑर्डरबाबत तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्र...

शेगावात 'महाआरोग्य मेळाव्या'चा जागर; दुसऱ्या दिवशी नागरिकांचा उदंड प्रतिसाद

Image
  शेगावात 'महाआरोग्य मेळाव्या'चा जागर; दुसऱ्या दिवशी नागरिकांचा उदंड प्रतिसाद बुलढाणा(जिमाका) दि. 26: "आरोग्य हीच खरी संपत्ती" हा मोलाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य मेळाव्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दुसऱ्या दिवशी या मेळाव्यात आरोग्य तपासणी आणि आयुर्वेदिक मार्गदर्शनासाठी भाविक व स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या मेळाव्याचे नियोजन अशा पद्धतीने करण्यात आले आहे की, त्याचा सर्वाधिक लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला होत आहे. यामध्ये प्रामुख्याने महिला व ज्येष्ठ नागरिक: आरोग्य तपासणीसाठी महिला आणि वृद्धांची संख्या लक्षणीय आहे. योग प्रात्यक्षिके आणि सुदृढ जीवनशैलीबद्दल जाणून घेण्यासाठी तरुणांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. मेळाव्यात केवळ तपासणीच नव्हे, तर आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने येथे विविध उपक्रम राबविले जात आहेत.  तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, आयुर्वेदिक सल्ला आणि पंचकर्म चिकित्सा यांबाबत मार्गदर्शन दिले जात आहे. निरोगी राहण्यासाठी योगाचे महत्त्व...

घरगुती उपचारांची शिदोरी: 'आजीबाईचा बटवा' सत्रातून आरोग्याचा मंत्र

Image
  घरगुती उपचारांची शिदोरी: 'आजीबाईचा बटवा' सत्रातून आरोग्याचा मंत्र  बुलढाणा, (जिमाका)दि. २६ : शेगाव येथे केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने आयोजित चार दिवसीय 'राष्ट्रीय आरोग्य मेळाव्या'मध्ये 'आजीबाईचा बटवा' या विशेष सत्राला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. २६ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या या सत्रात वैद्य अपश्चिम मालेगावकर यांनी उपस्थितांना घरगुती आयुर्वेदिक उपचार पद्धतीची सखोल माहिती दिली. आपल्या सभोवतालच्या परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या औषधी वनस्पतींचे महत्त्व सांगताना मालेगावकर यांनी स्पष्ट केले की, निसर्गात अशा अनेक वनस्पती आहेत ज्या विविध आजारांवर रामबाण उपाय ठरू शकतात. केवळ अंगणातील झाडेच नव्हे, तर स्वयंपाकघरातील मसाल्याच्या पदार्थांमध्येही औषधी गुणधर्म दडलेले आहेत. कोणत्या आजारावर या वस्तूंचा वापर कसा आणि किती प्रमाणात करावा, याचे शास्त्रोक्त मार्गदर्शन त्यांनी केले. किरकोळ आजारांसाठी रासायनिक औषधांऐवजी नैसर्गिक उपचार पद्धतीचा अवलंब करून आरोग्य कसे सुदृढ ठेवावे, याचे मोलाचे सल्ले या मेळाव्यात देण्यात आले. या उपक्रमामुळे विस्मरणात जात असलेल्या पारंपरिक...

विदर्भात उभे राहणार 'वनौषधी हब'; शेतकऱ्यांनी आयुर्वेदिक शेतीकडे वळण्याचे आवाहन

  विदर्भात उभे राहणार 'वनौषधी हब'; शेतकऱ्यांनी आयुर्वेदिक शेतीकडे वळण्याचे आवाहन बुलढाणा, (जिमाका)दि. २६ : विदर्भामध्ये वनौषधींची मोठी संपत्ती असून, या क्षेत्राचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला औषधी वनस्पतींच्या लागवडीची जोड द्यावी, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. शेगाव येथे आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित 'आयुर्वेदिक शेती उत्पादन आणि विक्री मार्गदर्शन' कार्यक्रमात ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आयुष मंत्रालय कटिबद्ध असल्याचे सांगताना मंत्री जाधव म्हणाले की, आगामी काळात या भागात 'वनौषधी हब' विकसित करण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना केवळ उत्पादनावरच नव्हे, तर प्रक्रियेवरही भर देता येईल. उत्पादित मालाच्या विक्रीसाठी मंत्रालयामार्फत हक्काचे व्यासपीठ (मार्केटिंग प्लॅटफॉर्म) उपलब्ध करून दिले जाणार असल्याने शेतकऱ्यांची मध्यस्थांकडून होणारी पिळवणूक थांबण्यास मदत होईल. या कार्यक्रमात तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रोफेसर (डॉ.) महेश कुम...

नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षणाचे क्षेत्रकार्य सुरू; नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे आवाहन

  बुलढाणा, दि. 26 (जिमाका): भारत सरकारच्या अधिपत्याखालील राट्रीय सांख्यिकी ऑफिस (NSO) तसेच महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत कार्यरत आर्थिक व सांख्यिकी संचालनालय यांच्या वतीने नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (Periodic Labour Force Survey) पाहणीचे क्षेत्रकार्य जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत ग्रामीण व नागरी भागात राबविण्यात येत आहे. सर्वेक्षणाची अचूक व परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक यांनी केले आहे. या सर्वेक्षणाद्वारे देशातील श्रमशक्ती (Labour Force), लोकसंख्येच्या तुलनेत कामगारांचे प्रमाण, रोजगार व बेरोजगारीची संरचना, शिक्षण व तांत्रिक शिक्षण घेतलेल्यांचे प्रमाण, शिक्षणातील गळती व त्याची कारणे, शेती व शेतीपूरक व्यवसाय, उत्पादन, व्यापार आणि सेवाक्षेत्रातील रोजगारस्थिती यांसंदर्भातील सविस्तर माहिती गोळा केली जाणार आहे. कुटुंबांकडून संकलित होणाऱ्या माहितीचा प्रमुख उद्देश म्हणजे कामगार बाजारातील महत्त्वाचे निर्देशक तयार करणे. विशेषतः सध्याच्या साप्ताहिक स्थिती (CWS) नुसार कामगार शक्ती सहभाग दर (LFPR), कामगार ल...

संस्थाबाह्य संगोपनासाठी इच्छुक पालकांना जिल्हा प्रशासनाचे आवाहन

  बुलडाणा, (जिमाका) दि. 26 :   प्रत्येक बालकाला प्रेमळ व सुरक्षित कुटुंबीय वातावरण मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार असल्याचे अधोरेखित करत महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा प्रशासनाने संस्थाबाह्य संगोपन (प्रायोजकत्व/प्रतिपालकत्व) योजनेसाठी इच्छुक पालकांनी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 तसेच सुधारित 2021 मधील तरतुदींनुसार अनाथालय, बालाश्रम, बालगृह किंवा निरीक्षणगृह हे शेवटचा पर्याय मानले जातात. शक्य तितक्या बालकांचे पुनर्वसन कुटुंबीय वातावरणात व्हावे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि सर्वांगीण विकास साधावा, हा कायद्याचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील बाल संगोपन संस्थांमध्ये दाखल असलेली अनाथ, निराधार, परित्यागीत, असक्षम पालकांची किंवा दीर्घकाळ भेट नसलेली बालके यांना कुटुंबीय आधार मिळावा, यासाठी ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. अर्जदारांचे पात्रता निकष : अर्जदार शारीरिक, मानसिक, भावनिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असावेत, कोणतीही जीवघेणी वैद्यकीय स्थिती नसावी, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी, विवाहित जोडप्याच्या बाबतीत दो...

२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जिल्हास्तरीय लोकशाही दिन

  ​ बुलढाणा (जिमाका) दि. २६ : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी आणि प्रशासकीय अडचणींचे वेळेत निराकरण करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे ‘जिल्हास्तरीय लोकशाही दिन’ आयोजित करण्यात आला आहे. ​ नागरिकांनी आपल्या प्रलंबित समस्या मांडण्यासाठी या व्यासपीठाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ​ अर्जासाठी महत्त्वाचे निकष : लोकशाही दिनात तक्रार सादर करताना नागरिकांनी ​ विहित अर्ज केवळ शासनाने ठरवून दिलेल्या विहीत नमुन्यातच असावा, तक्रार किंवा निवेदन केवळ वैयक्तिक स्वरूपाचे असावे (सामूहिक स्वरूपाचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत), अर्जाच्या दोन प्रती, संबंधित लोकशाही दिनाच्या किमान १५ दिवस आधी सादर करणे आवश्यक आहे. ​             तालुका लोकशाही दिनानंतर १ महिन्याने जिल्हा स्तरावर, तर जिल्हा स्तरांनंतर २ महिन्यांनी विभागीय आणि त्यानंतर २ महिन्यांनी मंत्रालयीन स्तरावर अर्ज करता येईल. कोणत्या तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत.तसेच न्यायप्रविष...

सैलानी उत्सवासाठी वाहतुकीत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे मार्ग वळविण्याचे आदेश

  बुलढाणा, (जिमाका)दि. २६ : सैलानी बाबा दर्गा येथील ११९ व्या उरूस महोत्सवासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या महोत्सवाच्या काळात होणारी भाविकांची अलोट गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी वाहतूक मार्गांत बदल करण्याचे आदेश दिले आहेत. २५ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२६ या कालावधीत हे निर्बंध लागू राहतील. दिनांक 25 फेब्रुवारी ते 12 मार्च 2026 या कालावधीत महोत्सव साजरा होत असून, 2 मार्च रोजी होळी उत्सवात नारळांची होळी, 8 मार्च रोजी संदल मिरवणूक आणि 12 मार्च रोजी फातेहाखानीचा कार्यक्रम पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अंदाजे 4 ते 5 लाख भाविक सैलानी येथे येणार आहे. त्यानुसार पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांच्या विनंतीनुसार जिल्हादंडाधिकारी बुलढाणा यांनी जिल्हा वाहतूक मार्ग क्रमांक 26 वरील वाहतुकीचे वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.   पर्यायी मार्ग :   1) सध्याचा मार्ग :   रायपूर – पिंपळगाव सराई – सैलानी – ढासाळवाडी – दुधा.   पर्यायी मार्ग : रायपूर – मातला – केसापूर – माळवंडी – दुधा 2) सध्याचा मार्ग : दुधा – घाटनांद्...

ग्रामीण पाणीपुरवठा योजना हस्तांतरित करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जल अर्पण दिवस साजरा करण्यात येणार - मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात

  Ø   8 ते 22 मार्च दरम्यान जल अर्पण दिवस होणार साजरा   बुलढाणा दि 26(जिमाका):   ग्रामीण भारतात जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा पायाभूत सुविधा आता उभारल्या गेल्यामुळे गावे पाणीपुरवठा प्रणालीच्या संचालन आणि देखभाल दुरुस्ती च्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश करत आहेत. या केवळ पायाभूत सुविधा नसून समुदाय आणि सरकार यांच्यातील अनेक वर्षाचा आशावाद, प्रयत्न आणि भागीदारीचे प्रतीक आहे. या योजना पूर्ण झाल्यानंतर त्यांचे हस्तांतरण काळजीपूर्वक, स्पष्टतेने आणि सामायिक अभिमानाने केले पाहिजे. ज्यामुळे पाणी व्यवस्थापनाची जबाबदारी ग्रामपंचायत, ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती आणि समुदायाच्या हाती येईल .जे आता त्यांच्या गावाच्या पाणीपुरवठा प्रणालीचे संरक्षक म्हणून नेतृत्व करतील. यासाठी दिनांक 8 मार्च ते 22 मार्च दरम्यान देशभर जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जल उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्यातही या उपक्रमाचे प्रभावी आयोजन करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी यंत्रणेला दिले आहेत.      देशभर ...

बुलढाणा ग्रंथोत्सवाची उत्साहात सांगता; दोन दिवसांत ३ लाखांहून अधिक ग्रंथांची विक्री

Image
  बुलढाणा, (जिमाका)दि. २६ : स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आयोजित दोन दिवसीय 'ग्रंथोत्सव २०२५' चा मोठ्या उत्साहात समारोप झाला. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राज्य ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालयाधिकारी कार्यालयामार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथदिंडीने सुरू झालेल्या या सोहळ्याला जिल्ह्यातील ग्रंथप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रंथोउत्सवामध्ये विविध वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना परिसंवाद व कविसंमेलन च्या माध्यमातून मिळाली. पहिल्या सत्रात ‘वाचन संस्कृती: काल, आज आणि उद्या ’ या विषयावर परिसंवाद पार पडला. प्रा. कमलेश खिल्लारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चेत नेमिनाथ सातपुते, सुनील वायाळ, डॉ. राजेंद्र गणगे, देविदास समुद्रवार आणि रफिक कुरेशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला. संदीप चव्हाण यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले. दुपारच्या सत्रात सुभाष किन्होळकर यांच्या अध्यक्षतेखाली रंगलेल्या कविसंमेलनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. गोविंद गायकी, सर्जेराव चव्हाण, राजेंद्र काळे, रमेश आराख आणि...