भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

 


बुलढाणा, दि. 22 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिपत्याखालील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, बुलढाणा येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना १० जून २०२६ पासून ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येत आहेत.

शालेय विभाग, कनिष्ठ महाविद्यालय विभाग तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित वसतिगृह कार्यालयात ऑफलाइन स्वरूपात जमा करणे बंधनकारक आहे.

वसतिगृहातील उपलब्ध रिक्त जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल एस. ई. गारमोडे यांनी केले आहे.

प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, बुलढाणा कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी