राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय उद्घाटन उत्साहात संपन्न
बुलढाणा, दि. 30 (जिमाका): राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय उद्घाटन
सोहळा रविवारी (दि. 28) जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले
यांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात
आला.
उद्घाटन कार्यक्रमास निवासी वैद्यकीय
अधिकारी डॉ. प्रवीण घोंगटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते, जिल्हा विस्तार
माध्यम अधिकारी राजेश धुताडमल, वैद्यकीय अधिकारी डॉ. जवरे, सार्वजनिक आरोग्य परिचारिका
श्रीमती भालेराव, प्रदीप वानरे, महाले, आरोग्य कर्मचारी तसेच जिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिका
व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पालकांना ० ते
५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत पोलिओ
प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन करण्यात आले. पोलिओमुक्त समाजाच्या
निर्मितीसाठी प्रत्येक पात्र बालकापर्यंत लसीकरण पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त
करण्यात आला.
आरोग्य विभागाने पालकांनी कोणतेही
बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेऊन जवळच्या लसीकरण केंद्रावर किंवा
आरोग्य कर्मचाऱ्यांकडून पोलिओ प्रतिबंधक लस देण्याचे आवाहन केले आहे. "प्रत्येक
बालकाला पोलिओचे दोन थेंब – निरोगी भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल," असा संदेश
यावेळी देण्यात आला.
000000
Comments
Post a Comment