१ जुलै रोजी अटल पेन्शन योजना जनजागृती दिन; जिल्ह्यात १० हजार नागरिकांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट

 


बुलढाणा, दि. 29 (जिमाका): केंद्र शासनाच्या अटल पेन्शन योजना जनजागृती दिनानिमित्त १ जुलै २०२६ रोजी जिल्हाभर विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण (PFRDA) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व बँका, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, बँक प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचा सहभाग राहणार आहे.

 

असंघटित क्षेत्रातील नागरिकांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षितता मिळावी, या उद्देशाने अटल पेन्शन योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. याअंतर्गत १ जुलै रोजी जिल्ह्यात १० हजार लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

 

अटल पेन्शन योजना ही राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत कार्यरत असून तिचे संचालन PFRDA मार्फत केले जाते. ही योजना शेतकरी, फेरीवाले, छोट्या व्यावसायिक, महिला, हमाल, वाहनचालक, बांधकाम मजूर तसेच इतर असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

 

योजनेअंतर्गत १८ ते ४० वर्षे वयोगटातील नागरिकांना सहभागी होता येते. नियमित मासिक हप्ते भरल्यानंतर वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा ₹१,००० ते  ₹ ५,००० पर्यंत निश्चित पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. जिल्हा प्रशासनाने पात्र नागरिकांनी जवळच्या बँकेत किंवा बँक प्रतिनिधीकडे संपर्क साधून अटल पेन्शन योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी