दुचाकींसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकांचा २ जुलैला लिलाव; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
बुलढाणा, दि. ३० (जिमाका) : उप प्रादेशिक परिवहन
कार्यालय (RTO) खामगाव येथे दुचाकी वाहनांसाठी आकर्षक (फॅन्सी) नोंदणी क्रमांक मिळविण्याची
नवीन ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक वाहनधारकांनी १ जुलै २०२६ रोजी
सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज सादर करून निर्धारित
शुल्कासह डिमांड ड्राफ्ट (डीडी) जमा करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी
केले आहे.
एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी
एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित अर्जदारांची यादी नोटीस बोर्डावर प्रसिद्ध
करण्यात येईल. त्यानंतर २ जुलै २०२६ रोजी दुपारी ४ वाजता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,
खामगाव येथे खुल्या लिलावाद्वारे संबंधित क्रमांकाचे वाटप करण्यात येणार आहे.
लिलावासाठी सादर करण्यात येणारा
डिमांड ड्राफ्ट Dy. R.T.O., Khamgaon यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेचा असावा व तो
दोन महिन्यांपेक्षा जुना नसावा. प्रत्येक पसंती क्रमांकासाठी स्वतंत्र डीडी आणि स्वतंत्र
अर्ज आवश्यक असून, विहित शुल्कापेक्षा कमी रकमेचा डीडी ग्राह्य धरला जाणार नाही. एका
अर्जदारास एका क्रमांकासाठी एकच अर्ज करता येईल.
लिलाव
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित आकर्षक नोंदणी क्रमांक ऑनलाइन आरक्षित करण्याची
सुविधाही उपलब्ध होणार आहे. वाहनधारकांना https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर
नाव, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक नोंदवून अर्ज व शुल्क भरल्यानंतर पसंतीचा क्रमांक
आरक्षित करता येणार असून, त्यासाठी कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता राहणार
नाही.
00000
Comments
Post a Comment