Posts

Showing posts from July, 2026

टीबीमुक्त बुलढाणासाठी सीईओ गुलाब खरात यांचा पुढाकार; सहा महिन्यांसाठी टीबी रुग्ण दत्तक

Image
  बुलढाणा, दि. ३१ (जिमाका): प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाला गती देत जिल्ह्यातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी कौतुकास्पद पुढाकार घेत एका टीबी रुग्णाला पुढील सहा महिन्यांसाठी दत्तक घेतले आहे. निक्षय मित्र म्हणून त्यांनी रुग्णाच्या पोषण आहाराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या 'निक्षय मित्र' (Ni-kshay Mitra) उपक्रमांतर्गत टीबी रुग्णांना औषधोपचारासोबत सकस व पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. याच अनुषंगाने श्री. खरात यांनी रुग्णाला पोषण आहाराचे किट सुपूर्द करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एम. मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) शिवकर भारसाकळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा तसेच आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनकर खेडकर उपस्थित होते. पोषण आहार किटमध्ये काय? : दत्तक कालावधीत दरमहा रुग्णाला देण्यात येणाऱ्या न्यूट्रिशन किटमध्ये गहू, ज्वारी, बाजरी, डाळ, खाद्यतेल तसेच दूध किंवा दूध पावडर यांच...

बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश पाऊस; परिस्थितीचा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतला आढावाबुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश पाऊस; परिस्थितीचा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतला आढावा

Image
    •           जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा   •           तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांना गावात उपस्थित राहण्याच्या सूचना,   •           नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश बुलढाणा, दि. 31(जिमाका): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीसदृश पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीपिके, घरे आणि पायाभूत सुविधांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यांना मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जिल्ह्यातील पावसाच्या परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्र्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देत गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक या...

जिल्ह्यात दमदार पाऊस; प्रशासन हायअलर्टवर, नागरिकांनी सतर्क राहावे – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील

Image
    बुलढाणा, दि. ३१ (जिमाका) : बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली असून प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. जिल्हाधिकारी आणि प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहे. पावसामुळे बाधित झालेल्या सर्व नागरिकांना शासनामार्फत आवश्यक ती मदत दिली जाईल. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी केले आहे.   जिल्ह्यातील सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ९२ महसूल मंडळांपैकी तब्बल ९१ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून, अनेक भागांमध्ये अद्यापही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.   सततच्या पावसामुळे उभी पिके, घरे तसेच विविध पायाभूत सुविधांचे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण व पंचनामे सुरू केले आहेत. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर चोवीस तास लक्ष ठेवून असून पूरपरिस्थितीचा सातत्याने आढावा ...

बसस्थानक परिसरात २०० मीटर 'नो पार्किंग' नियमाची कठोर अंमलबजावणी; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन

Image
  बुलढाणा, दि. ३१ (जिमाका) :   बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडी रोखणे, प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी देणे आणि अवैध प्रवासी वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात 'नो पार्किंग' नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर संयुक्त पथकाद्वारे कठोर कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात बुलढाणा एसटी आगारात पोलीस प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग (RTO), महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि खासगी प्रवासी वाहतूकदार यांची संयुक्त जनजागृती व समन्वय बैठक पार पडली. बैठकीत कायद्याचे पालन, वाहतूक शिस्त आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला. बैठकीला शहर पोलीस निरीक्षक संग्राम पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप भोस, उपपोलीस निरीक्षक भूषण पाटील, सहाय्यक वाहन निरीक्षक राधिका चव्हाण, एसटी महामंडळाचे सुरक्षा व दक्षता अधिकारी जयंत कांडलकर तसेच आगार व्यवस्थापक अमोल गडलिंग उपस्थित होते. बैठकीत बसस्थान...

चारचाकी वाहन मासिक भाडेतत्त्वावर देण्यासाठी सिलबंद निविदा मागविल्या; ५ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  बुलढाणा दि.31 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा कार्यालयाच्या दैनंदिन कार्यालयीन कामकाज व दौऱ्यांसाठी चालक व इंधनासह चारचाकी वाहन मासिक भाडेतत्त्वावर उपलब्ध करून घेण्यासाठी इच्छुक सेवा पुरवठादारांकडून सिलबंद निविदा मागविण्यात आल्या आहेत. संबंधित निविदा ५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यालयात सादर कराव्यात, असे आवाहन सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या शासन ज्ञापनानुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रास वाहन भाडेतत्त्वावर घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार कार्यालयातील गठित समितीने दरमहा ३ हजार किलोमीटरपर्यंत वापरासाठी चारचाकी वाहन भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुक सेवा पुरवठादारांनी विहित नमुन्यातील दरपत्रकासह PUC, पॅनकार्ड, वाहन चालकाचा परवाना, विमा, आरसी बुक, टुर्स अँड ट्रॅव्हल्स नोंदणी प्रमाणपत्र व जीएसटी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. वाहन हे पहिल्या मालकीचे व पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीतील असावे. अलीकडे खरेदी केलेल्या...

पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करा- जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे

Image
    •           1 लाख 16 हजार 436 पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर •            49 हजार 047 शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण बुलढाणा, दि. 31(जिमाका): राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध होणार असून पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी कर्जमुक्ती योजना संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात तसेच ऑनलाईनव्दारे, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक, सर्व उपविभागीय अध...

‘पराक्रम दिन’निमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व फिल्म स्पर्धांचे आयोजन; शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागाचे आवाहन

  बुलढाणा दि.31 (जिमाका): महाराष्ट्र सैनिक, जुनी व माजी सैनिक प्रतिष्ठान (अमर) यांच्या वतीने भारतीय सैन्याच्या शौर्यगाथा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने ‘पराक्रम दिन’निमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व आणि लघुपट (फिल्म) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा 1 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत होणार आहेत. पराक्रम दिन साजरा करण्यामागील उद्देश राज्यातील वीर सैनिकांच्या कार्याचा गौरव करणे, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शौर्य, त्याग आणि कर्तव्यभावना रुजविणे हा आहे. या स्पर्धांमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. निबंध स्पर्धेत मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत जास्तीत जास्त १,००० शब्दांचा निबंध लिहून तो पीडीएफ स्वरूपात संकेतस्थळावर अपलोड करायचा आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत पाच मिनिटांचे भाषण तयार करून त्याचा व्हिडिओ अपलोड करावा लागणार आहे. फिल्म स्पर्धेत मोबाईल किंवा कॅमेऱ्याद्वारे जास्तीत जास्त तीन मिनिटांचा लघुपट तयार करून तोही संकेतस्थळावर अपलोड करावा लागेल. लघुपटासाठी क...

पेनटाकळी धरण 56.51 टक्के भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  बुलढाणा दि.31 (जिमाका): पेनटाकळी प्रकल्पात सातत्याने पाण्याची आवक सुरू असून शुक्रवार (३१ जुलै) रोजी धरणातील जलसाठा 56.51 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे पुढील काळात पाण्याची आवक वाढल्यास धरणातून विसर्ग करावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. उपविभागीय अभियंता, पेनटाकळी प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग, मेहकर यांनी प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार, प्रकल्पाच्या मंजूर जलाशय व द्वार संचालन सूचीनुसार जुलै अखेर धरणात 69 टक्के जलस्तर कायम ठेवण्याचे नियोजन आहे. मात्र, पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्यास तसेच उर्ध्व बाजूच्या प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग झाल्यास पेनटाकळी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नदीपात्रात विसर्ग सोडावा लागू शकतो. जलसंपदा विभागाने नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच जनावरे, वाहने, शेती अवजारे, चल मालमत्ता व इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन केले आहे. तसेच दवंडी किंवा मुनादीद्वारे नागरिकांना सूचना देऊन प...

अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन

  बुलढाणा दि.31 (जिमाका): बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आलेल्या एका अनोळखी वृद्ध व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोस्टे बुलढाणा ग्रामीण येथे मर्ग क्र. ३४/२०२६ कलम १९४ बीएनएसएस (BNSS) अन्वये नोंद करण्यात आली आहे. सुमारे ७० वर्षे वयाचा, अंदाजे ५.५ फूट उंचीचा अनोळखी इसम दिव्य सेवा प्रकल्प, वरवंडचे संचालक अशोक काकडे यांनी उपचारासाठी सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे दाखल केला होता. उपचारादरम्यान संबंधित व्यक्तीचा २२ जुलै २०२६ रोजी मृत्यू झाला. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, त्याचा फोटो व वर्णनाच्या आधारे शोध सुरू आहे. सदर व्यक्ती आपल्या परिसरातून हरवलेली असल्याची माहिती कोणाकडे असल्यास किंवा संबंधित व्यक्तीची ओळख पटत असल्यास तात्काळ पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अधिक माहितीसाठी पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण ०७२६२-२४१२५५, पोलीस निरीक्षक आशिष रोही   ९६०७३०८२२४, तपास अधिकारी पोहेकॉ कैलास उगले (ब. नं. ७१४) : ८८८८८११७१४ तसेच, नागरि...

बुलढाण्यात विवाहपूर्व समुपदेशन केंद्र सुरू होणार; ७ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन * स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविले

  बुलढाणा, दि. ३० (जिमाका): राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यात विवाहपूर्व संवाद (Pre-Marital Counseling Center) केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने केंद्र चालविण्यासाठी प्रशिक्षित समुपदेशक उपलब्ध करून विनामूल्य सेवा देण्यास इच्छुक स्वयंसेवी संस्थांकडून दि. ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. विवाहपूर्व समुपदेशन, कौटुंबिक संवाद आणि मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वाढत्या कौटुंबिक वाद-विवादांना आळा घालणे, विवाहपूर्व परस्पर संवादाला प्रोत्साहन देणे तसेच सुदृढ व समंजस कौटुंबिक जीवनाची पायाभरणी करणे, हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. या केंद्रामार्फत विवाहेच्छुक युवक-युवती तसेच नवविवाहित जोडप्यांना तज्ज्ञांकडून विनामूल्य समुपदेशन सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. केंद्रासाठी आवश्यक जागा व मूलभूत साहित्य जिल्हा प्रशासनामार्फत उपलब्ध करून दिले जाणार असून, प्रशिक्षित समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ज्ञ स्वयंसेवी संस्थांनी उपलब्ध करून द्यावेत. अर्ज करणाऱ्या संस्थांची निती आयोगाच्या पोर्टलवर...

राज्य पुरस्कृत योजनेतून शेतकऱ्यांना परदेश अभ्यास दौऱ्याची संधी; १७ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

  बुलढाणा, दि. ३० (जिमाका): राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना युरोप व चीनसह विविध देशांतील आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ व्हावा, यासाठी अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. १७ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक शेती, पीक उत्पादकता वाढ, सेंद्रिय शेती, फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, कृषी यांत्रिकीकरण, कृषी प्रक्रिया, निर्यात संधी आणि कृषी बाजार व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा आहे. योजनेसाठी अर्ज करणारा लाभार्थी स्वतः शेतकरी असणे आवश्यक असून त्याच्याकडे अॅग्रीस्टॅक Farmer ID, वैध पासपोर्ट आणि आधार कार्ड असणे बंधनकारक आहे. तसेच अर्जदाराचे वय किमान २५ वर्षे असावे, तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा आणि यापूर्वी शासनाच्या आर्थिक सहाय्याने परदेश अभ्यास दौरा केलेला नसावा. या योजने अंतर्गत शासनाकडून अभ्यास दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल २ लाख रुपये इतके अनुदान देण्यात येणार अस...

कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Image
    बुलढाणा दि.30 (जिमाका):   राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून, या योजनेची तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. कर्जबाजारीपणामुळे यापुढे राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सहकार आणि महसूल विभागाच्या वतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्यात आला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण, विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. कोणताही पात्र कर्जदार शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे. या योजनेत प्रामुख्याने कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना (OTS) आणि प्रोत्सा...

NCMC स्मार्ट कार्डसाठी आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

  बुलढाणा दि.30(जिमाका): एसटी प्रवासात राज्य सरकारच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्डच्या अंमलबजावणीला आता १ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक पात्र ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप कार्ड मिळालेले नसल्याने त्यांची प्रवास सवलतीपासून गैरसोय होऊ नये, यासाठी हा दिलासादायक निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (MSRTC) अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ​ राज्य शासनाच्या वतीने 'अमृत ज्येष्ठ नागरिकांना' मोफत प्रवास, तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत दिली जाते. या सवलती अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानावर आधारित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. ​ परंतु, राज्यातील हजारो पात्र प्रवाशांनी नोंदणी केली असली तरी तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणांमुळे काहींना अद्याप प्रत्यक्ष कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे केवळ कार्ड उपलब्ध न झाल्या...

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' चा लाभ मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे.

Image
 

जन्म-मृत्यू नोंदणी आता केवळ CRS Portal द्वारेच; समांतर प्रणाली वापरण्यास बंदी

Image
  बुलढाणा, दि. 29 (जिमाका) : राज्य शासनाच्या निर्देशानुसार जन्म व मृत्यू नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया आता भारत सरकारच्या Civil Registration System (CRS) Portal द्वारेच राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात सर्व निबंधक, उपनिबंधक तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार जन्म व मृत्यू नोंदणीसाठी CRS Portal व्यतिरिक्त कोणतीही स्वतंत्र, स्थानिक अथवा समांतर सॉफ्टवेअर प्रणाली वापरता येणार नाही. यापूर्वी नोंद न झालेल्या जन्म किंवा मृत्यू घटनांची नोंद 'Add Old Event' या सुविधेद्वारे CRS Portal वर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच जन्म व मृत्यू नोंदीतील दुरुस्ती, अद्ययावत माहिती, प्रमाणपत्र निर्गमित करणे तसेच इतर सर्व सेवा केवळ CRS Portal मार्फतच उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी उपलब्ध मूळ अभिलेखांच्या आधारे अचूक माहिती नोंदवून नियमानुसार कार्यवाही करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील जन्म व मृत्यू नोंदींचा एकसंध डिजिटल डेटाबेस तयार होण्यास मदत...

सीपीआर प्रशिक्षणामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची आपत्कालीन प्रतिसाद क्षमता अधिक बळकट

Image
  बुलढाणा, दि. 29 (जिमाका): राज्य शासनाच्या 'माझे गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियानांतर्गत समग्र प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) अंतर्गत कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन (CPR) विषयावरील प्रशिक्षण सत्र प्राथमिक आरोग्य केंद्र, शेलगाव आटोळ येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाले. या प्रशिक्षणामध्ये अचानक हृदयक्रिया बंद पडलेल्या रुग्णाला तातडीने जीवदान देण्यासाठी आवश्यक असलेल्या सीपीआर तंत्राचे सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. सहभागी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीचे मूल्यमापन, योग्य पद्धतीने छातीवर दाब (Chest Compression), कृत्रिम श्वसन (Rescue Breathing) तसेच रुग्णाला वेळेत पुढील उपचारासाठी संदर्भित करण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणासाठी डॉ. शिवानंद शिंगाडे, डॉ. संतोष सांगळे, डॉ. शैलेश खंडारे, डॉ. जीवन भारती, सुवर्णा बेलसरे, स्वाती शेंद्रे, कविता खाडे, सुनिता जवंजाळ आणि सुलोचना पराड यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद प्रशिक्षण केंद्राच्या डॉ. स्न...

तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार; २० ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले

  बुलढाणा, दि. 29 (जिमाका) :   भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय मार्फत साहसी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात येणाऱ्या तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार (Tenzing Norgay National Adventure Award - TNNAA) २०२५ साठी नामांकन प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. इच्छुक खेळाडू व पात्र उमेदवारांनी दि. ३० जुलै ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत केंद्र शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी केले आहे. साहसी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सामान्यतः जमिनीवरील, समुद्रावरील आणि हवाई साहसी उपक्रमांमध्ये प्रत्येकी एक पुरस्कार दिला जातो. तसेच साहसी क्षेत्रातील 'आजीवन योगदान' (Lifetime Achievement) या विशेष श्रेणीसाठीही स्वतंत्र पुरस्कार प्रदान करण्यात येतो. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार पुरस्कारासाठी नामांकन करणाऱ्या खेळाडूंची सन २०२३, २०२४ आणि २०२५ या तीन वर्षांतील कामगिरी विचारात घेतली जाणार आहे. संबंधित कामगिरी ही जमीन, पाणी किंवा हवाई साहसी ...

शेगावात बालकामगार विरोधात कारवाई; तीन बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता

Image
  बुलढाणा, दि. 29 (जिमाका): बालकामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ (सुधारणा २०१६) अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत कृतीदलाने शेगाव येथे धाड टाकून दोन आस्थापनांमधून तीन बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता केली. संबंधित आस्थापनाधारकांविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बालकामगार या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने २८ जुलै रोजी शेगाव शहरात विशेष धाडसत्र राबविण्यात आले. तपासणीदरम्यान खामगाव रोडवरील इंडियन मोटर गॅरेज येथे एक बालकामगार काम करताना आढळून आले. तसेच महाराष्ट्र स्प्रिंग पार्ट अँड वेल्डिंग वर्क्स या आस्थापनामध्ये दोन किशोरवयीन कामगार कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. कृतीदलाने तातडीने तिन्ही बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता करून संबंधित मालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली. कामगार विभागाने सांगितले की, बालकामगार किंवा किशोरवयीन कामगारांना बेकायदेशीररीत्या कामावर ठेवणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकरणांची माहिती कोणताही नागरिक, पोलीस अधिकारी किंवा सरकारी कामगार अधिकारी संबंधित यंत्रणेकडे ...

राज्यांतर्गत पीकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन • तालुका ते राज्यस्तरावर बक्षिसांची संधी

  बुलढाणा, दि. 28 (जिमाका) :   राज्यातील अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासह प्रगतशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत राज्यांतर्गत पीकस्पर्धा – खरीप हंगाम २०२६ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी यंदापासून प्रथमच स्वतंत्र ऑनलाइन अर्ज प्रणाली सुरू करण्यात आली असून, पात्र शेतकऱ्यांनी मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. यापूर्वी पीकस्पर्धेची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येत होती. मात्र, प्रशासनात पारदर्शकता, सुलभता आणि गतिमानता आणण्यासाठी यंदापासून ऑनलाइन अर्ज प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या ११ पिकांसाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर जमीन असणे आणि ती स्वतः कसत असणे आवश्यक आहे. एका शेतकऱ्याला एका वेळी एका पिकासाठीच सहभाग घेता येईल. भात पिकासाठी किमान २० गुंठे, तर इतर पिकांसाठी ४० गुंठे क्षेत्रावर सल...

नायलॉन मांजाच्या वाहतूक व पुरवठ्यावर नियंत्रणासाठी परिवहन विभागाचे आवाहन वाहतूकदार, पार्सल सेवा व कुरिअर एजन्सींनी घ्यावी विशेष दक्षता

  बु लढाणा, दि. 28 (जिमाका) : प्रतिबंधित सिंथेटिक (नायलॉन) मांजाची विक्री, उत्पादन, साठवण आणि वाहतूक रोखण्यासाठी परिवहन विभागाने राज्यभर प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने यासंदर्भात निर्देश जारी केले असून, राज्यातील सीमा तपासणी नाक्यांवरही विशेष निरीक्षण करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने प्रतिबंधित नायलॉन मांजाची निर्मिती, साठवण आणि पुरवठा रोखण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक वाहतूकदार, पार्सल सेवा आणि कुरिअर एजन्सींनी आपल्या स्तरावर बैठक घेऊन नायलॉन मांजाची वाहतूक होणार नाही, यासाठी आवश्यक दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संशयास्पद पार्सल व मालवाहतुकीची नियमित तपासणी करून प्रतिबंधित नायलॉन मांजाची वाहतूक आढळल्यास संबंधित प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असेही परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व वाहतूकदार, मालवाहतूक सेवा, पार्सल कार्यालये आणि कुरिअर एजन्सींना प्रतिबंधित नायलॉन मांजाची वाहतूक अथवा पुरवठा न करण्याचे आवाहन ...

चिखलीत 3 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान; शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी

  बुलढाणा, दि. 28 (जिमाका) : सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न स्थानिक पातळीवर मार्गी लागावेत आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध व्हावा, या उद्देशाने चिखली तहसील कार्यालयामार्फत दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी ' छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. मौनी बाबा संस्थान, चिखली येथे हे शिबिर होणार असून, चिखली तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विजय सवडे यांनी केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात 'छत्रपती शिवाजी महाराज स्वावलंबन समाधान शिबीर' अंतर्गत महसूल, कृषी, ग्रामविकास, आरोग्य, पुरवठा, सामाजिक न्याय आणि इतर विविध विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिबिरात महिलांना शेतकरी दर्जा देण्यासाठी पत्रांचे वितरण, गावठाण स्वामित्व सनद वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, प्रशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमितीकरण, 'जिवंत सातबारा...