मोहरम सुटीमुळे 26 जूनचे दिव्यांग तपासणी शिबिर रद्द

 


बुलढाणा, दि. 22 (जिमाका): जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे प्रत्येक शुक्रवारी नियमितपणे नेत्र, मतिमंद/मनोरुग्ण तसेच कान-नाक-घसा (ईएनटी) संबंधित दिव्यांग तपासणी व दिव्यांग बोर्डाचे कामकाज आयोजित करण्यात येते.

मात्र, येत्या 26 जून 2026 (चौथा शुक्रवार) रोजी मोहरम निमित्त शासकीय सुटी असल्याने त्या दिवशी आयोजित करण्यात आलेले नेत्र, मतिमंद/मनोरुग्ण व कान-नाक-घसा संबंधित दिव्यांग तपासणी शिबिर रद्द करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालय प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, संबंधित दिव्यांग तपासणीसाठी 26 जून रोजी जिल्हा रुग्णालयात येऊ नये. शिबिर रद्द असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा.

तसेच, शिबिर रद्द असल्याची माहिती असूनही कोणी रुग्णालयात आल्यास होणाऱ्या गैरसोयीस प्रशासन जबाबदार राहणार नसल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी