बुलढाणा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर
बुलढाणा,
दि. 29 (जिमाका): बुलढाणा जिल्हा
दूध उत्पादक सहकारी संघ मर्यादित, बुलढाणा यांच्या सन २०२४-२५ या वर्षांच्या संचालक
मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रारूप व अंतिम मतदार यादी तयार करण्याचा कालबद्ध
कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
जाहीर कार्यक्रमानुसार ३० जून २०२६ रोजी दुपारी
१२ वाजता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याच दिवशी मतदार यादीवर
दावे व हरकती दाखल करण्यासाठी नोटीस बोर्डावर सूचना प्रसिद्ध केली जाईल. ३० जून ते
२३ जुलै २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दावे व हरकती स्वीकारल्या
जातील.
प्राप्त दावे व हरकतींवर २५ जुलै २०२६ रोजी निर्णय
घेण्यात येईल. त्यानंतर ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
करण्यात येणार आहे.
जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक,
सहकारी संस्था (दुग्ध), अमरावती, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), बुलढाणा यांच्या
कार्यालयातील नोटीस बोर्डावर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली असून, पात्र सभासदांनी
विहित मुदतीत दावे व हरकती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment