Posts

Showing posts from 2026

प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ**अंतिम मतदार यादी मात्र १६ नोव्हेंबरलाच प्रसिद्ध होणार भारत निवडणूक आयोगाचा निर्णय

*प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ* *अंतिम मतदार यादी मात्र १६ नोव्हेंबरलाच प्रसिद्ध होणार भारत निवडणूक आयोगाचा निर्णय*   *बुलढाणा दि. १२ (जिमाका):* महाराष्ट्रात १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट, २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीसाठी दावे व हरकती सादर करण्याच्या मुदतीत भारत निवडणूक आयोगाने पुन्हा वाढ केली आहे. त्यानुसार, आता नागरिकांना २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. अंतिम मतदार यादी मात्र पूर्वीच्या वेळापत्रकानुसार १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार, दावे व हरकती सादर करण्याचा २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सादर करता येतील. तसेच नोटीस टप्पा आणि दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर १६ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नोंदींमध्ये दुरुस्ती करणे तसेच आवश्यकतेनुसार हरकती दाखल ...

एकही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाणार नाही**विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यभर मतदान केंद्रांवर विशेष मोहीम; मतदारांच्या तक्रारींसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज*

Image
*एकही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाणार नाही* *विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यभर मतदान केंद्रांवर विशेष मोहीम; मतदारांच्या तक्रारींसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज* *बुलढाणा, दि. १२ (जिमाका) :* भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या सर्व विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये नावांचा समावेश करणे, नावे वगळणे तसेच नोंदींमध्ये आवश्यक दुरुस्ती करण्याची कार्यवाही सुरू आहे. राज्यातील एकही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाणार नाही, याची सुनिश्चिती करण्यासाठी निवडणूक प्रशासन वचनबद्ध असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. *राज्यातील १ लाख २५ हजार मतदान केंद्रांवर विशेष मोहीम* मतदार यादीच्या पुनरीक्षण प्रक्रियेत नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी राज्यातील १ लाख २५ हजार मतदान केंद्रांवर शनिवार, दि. ३ ऑक्टोबर, रविवार, दि. ४ ऑक्टोबर, शनिवार, दि. १० ऑक्टोबर आणि रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, नवमतदारां...

इच्छुक दाम्पत्यांनी बालकांच्या संगोपनासाठी दत्तक प्रक्रियेत सहभागी व्हावे दत्तक प्रक्रियेबाबत जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे आवाहन; मिशन वात्सल्य पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा

    बुलढाणा, दि. १२ (जिमाका) : अनाथ, निराधार आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना प्रेमळ कौटुंबिक वातावरण, सुरक्षितता आणि उज्ज्वल भविष्य मिळवून देण्यासाठी दत्तक विधान प्रक्रिया राबविण्यात येते. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५, सुधारित अधिनियम २०२१ आणि दत्तक नियमावली २०२२ नुसार ही प्रक्रिया पार पाडली जाते. इच्छुक पात्र दाम्पत्यांनी दत्तक प्रक्रियेत सहभागी होऊन बालकांना कुटुंबाचा आधार द्यावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे.   दत्तक घेण्यासाठी पात्रता व वयोमर्यादा : दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या भावी माता-पित्यांची शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक क्षमता सक्षम असणे आवश्यक आहे. दत्तक प्रक्रियेसाठी पती-पत्नी दोघांची संमती आवश्यक असून, एकल महिला मुलगा किंवा मुलगी दत्तक घेऊ शकते, तर एकल पुरुष केवळ मुलगा दत्तक घेऊ शकतो.   बालकाच्या वयानुसार दत्तक घेणाऱ्या भावी माता-पित्यांच्या कमाल संयुक्त वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे : •           दोन वर्षांपेक्षा कमी वयाचे बालक : संयु...

बुलढाणा जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेचा आढावा; क्षेत्रीय कामकाजाची तपासणी कुष्ठरुग्णांना वेळेत उपचार, औषधोपचार व पुनर्वसन सुविधा देण्यावर भर

    बुलढाणा, दि. १२ (जिमाका) : जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठ व क्षयरोग) डॉ. सचिन एडके यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच कुष्ठरोग नियंत्रणाशी संबंधित क्षेत्रीय कामकाजाची पाहणी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.   डॉ. एडके यांनी संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा, जामोद तसेच संबंधित आरोग्य संस्थांमध्ये सुरू असलेल्या कुष्ठरोग शोधमोहिमेची व क्षेत्रीय तपासणीची पाहणी केली. यावेळी कुष्ठरुग्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन उपचारांची स्थिती जाणून घेतली. तसेच कुष्ठरोग सर्वेक्षण, रुग्णांची नोंदणी, बहुऔषधोपचार (MDT) वितरण, दिव्यांगत्व प्रतिबंध व वैद्यकीय पुनर्वसन (DPMR) नोंदवही आणि इतर अभिलेखांची तपासणी केली.   कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत दैनंदिन कामकाजाचा आढावा घेताना त्यांनी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना रुग्णांचा नियमित पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या. कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास त्वरित ...

थकीत कर्जावरील व्याजात ५० टक्के सवलत; ३१ मार्च २०२७ पर्यंत एकरकमी परतफेड योजनेचा लाभ घ्या इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचे थकबाकीदार लाभार्थ्यांना आवाहन

    बुलढाणा, दि. १२ (जिमाका) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत वितरित करण्यात आलेल्या कर्जाची थकबाकी असलेल्या लाभार्थ्यांसाठी एकरकमी परतावा (ओटीएस) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत थकीत व्याजाच्या रकमेत ५० टक्के सवलत देण्यात येणार असून, लाभार्थ्यांनी ३१ मार्च २०२७ पर्यंत या योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.   महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्या जिल्हा कार्यालयामार्फत बुलढाणा जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध कर्ज योजनांच्या माध्यमातून अल्प व्याजदराने कर्ज वितरित करण्यात आले आहे. या कर्जाची थकबाकी असलेल्या लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी महामंडळाने एकरकमी परतावा योजना सुरू केली आहे.   या योजनेंतर्गत थकीत कर्जाच्या व्याजाच्या रकमेत ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना थकीत मुद्दल व सवलतीनंतरचे व्याज एकरकमी भरून कर्जाची परतफेड करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ही योजना ३१ मार्च २०२७ पर्य...

समग्र प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण कार्यशाळेची अधिकाऱ्यांकडून पाहणी ; *प्रशिक्षणाच्या गुणवत्तेचा घेतला आढावा; ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा देण्यावर भर

    बुलढाणा, दि. १२ (जिमाका) : ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच दर्जेदार, सर्वसमावेशक व सुलभ प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत समग्र प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. खामगाव येथे सुरू असलेल्या या कार्यशाळेला आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, अटाळी तसेच संबंधित आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रशिक्षणाच्या कामकाजाची पाहणी केली.   या भेटीदरम्यान प्रशिक्षणार्थींना दिले जाणारे मार्गदर्शन, प्रशिक्षण सत्रांचे नियोजन, प्रशिक्षणाची कार्यपद्धती आणि निर्धारित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. प्रशिक्षणाचे नियोजन, सत्रांची अंमलबजावणी आणि कार्यशाळेच्या आयोजनाबाबत उपस्थित अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. प्रशिक्षणाच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्य वृद्धिंगत करण्याच्या प्रयत्नांचेही कौतुक करण्यात आले.   ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्...

बुलढाणा मुख्य डाकघरात तीन दिवसीय टपाल तिकीट प्रदर्शन ; शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रदर्शन भेटीसाठी विशेष आवाहन

  बुलढाणा, दि. 12 (जिमाका) : भारतीय डाक विभागातर्फे सेवासंकल्प अभियान व राष्ट्रीय टपाल सप्ताह २०२६ निमित्त बुलढाणा मुख्य डाकघर येथे दि. १२ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत तीन दिवसीय टपाल तिकीट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनीच्या माध्यमातून नागरिकांना टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारताचा समृद्ध इतिहास, संस्कृती आणि वारसा जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. या प्रदर्शनात विविध प्रकारची टपाल तिकिटे, पाकिटे, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा दर्शविणारी छायाचित्रे तसेच टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारताचा समृद्ध इतिहास उलगडणारी माहिती पाहता येणार आहे. टपाल तिकीट संग्रह (फिलॅटेली) हे केवळ छंदाचे साधन नसून ज्ञान, इतिहास आणि संस्कृतीची ओळख करून देणारे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकीट संग्रहाची आवड निर्माण करणे, भारतीय टपाल विभागाच्या गौरवशाली परंपरेची माहिती देणे आणि नवीन पिढीमध्ये इतिहासाविषयी कुतूहल वाढविणे हा या प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश आहे. शाळांनी विद्यार्थ्यांसह प्रदर्शनाला भेट द्यावी : बुलढाणा शहर व परिसरातील सर्व शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना या प्र...

बुलढाणा जिह्यातील १०३ सहकारी संस्थांची नोंदणी रद्द होणार; १० दिवसांत हरकती नोंदवण्याचे सहकार विभागाचे आवाहन

  बुलढाणा, दि. 12 (जिमाका) : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम १०९ मधील तरतुदींनुसार, जिह्यातील अवसायनात काढण्यात आलेल्या एकूण १०३ (पदूम) सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या संस्थांची नोंदणी अंतिमरीत्या रद्द करण्यापूर्वी संस्थांकडे असलेले देणे-घेणे किंवा इतर बाबींसंदर्भात संबंधित व्यक्ती, धनको, ऋणको आणि नागरिकांकडून दाव्यांची माहिती मागवण्यात आली आहे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) बुलढाणा यांच्या कार्यालयामार्फत दिलेल्या माहितीनुसार, अवसायनातील संस्थांची तालुकानिहाय संख्या बुलढाणा १२, चिखली ३, मेहकर १४, लोणार २०, देऊळगाव राजा १०, सिंदखेड राजा १३, मोताळा १२, खामगाव १४, जळगाव जामोद २, नांदुरा २, संग्रामपूर १, याप्रमाणे आहेत. संस्थांचे प्रकार: रद्द प्रक्रियेत समाविष्ट संस्थांमध्ये प्रामुख्याने दुध उत्पादक सहकारी संस्था, शेळी-मेंढी पालन सहकारी संस्था आणि कुक्कुट पालन सहकारी संस्थांचा समावेश आहे. हरकत नोंदवण्याची मुदत व ठिकाण: या संस्थांच्या देणे-घेण्याबाबत अथवा नोंदणी रद्द करण्याबाबत कोणाचीही काही हरकत किंवा आक्षेप असल्यास,...

विशेष लेख महिला शेतकरी : कायदेशीर ओळख

Image
  २०२६ हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरे होत असताना, महाराष्ट्र शासनाने नुकतेच ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा, २०२६’ विधेयक पारित केले आहे. त्यानुसार महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख, समान अधिकार आणि शासनाच्या कृषी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शेतकरी महिला प्रमाणपत्र देण्याच्या विशेष उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. या उपक्रमाविषयी ही माहिती... महाराष्ट्र हे भारतातील तिसरे सर्वात मोठे राज्य आणि देशाचे आर्थिक व वित्तीय केंद्र आहे. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात या राज्याचा १५ टक्के वाटा आहे. सरासरी १.१४ हेक्टर जमिनीसह सर्वाधिक भूधारक क्षेत्रांपैकी एक असलेल्या या राज्याच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे महत्त्वपूर्ण ११.९ टक्के योगदान आहे. महिला शेतकरी भारताच्या आणि महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देतात. भारतीय कृषी क्षेत्रात एकूण महिला मनुष्यबळापैकी ६५ टक्के महिला कार्यरत आहेत. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या कृषी विस्तार संचालनालयाच्या ' कृषी क्षेत्रातील लिंगभाव दृष्टिकोन २०२१-२२' या अहवाला...

सेवासंकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय पोषण आहार विवीध उपक्रमाचे आयोजन

 

सेवा संकल्प अभियानांतर्गत दोढ्रा येथे आरोग्य तपासणी शिबिर १२५ लाभार्थ्यांची रक्तदाब, रक्तशर्करा व विविध आजारांसाठी तपासणी

      बुलढाणा, दि. 11 (जिमाका) : नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे, विविध आजारांचे वेळीच निदान करणे आणि आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सेवा संकल्प अभियानांतर्गत दि. १० ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत दोढ्रा येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण १२५ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.   या शिबिरामध्ये नागरिकांची रक्तदाब (बीपी), रक्तशर्करा (शुगर) तसेच विविध संसर्गजन्य आजारांच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली. आरोग्यविषयक तक्रारींचे वेळीच निदान व्हावे, आजारांची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यातच लक्षात यावीत आणि नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.   बदलती जीवनशैली, अनियमित आहार आणि व्यायामाचा अभाव यांमुळे रक्तदाब व मधुमेहासारख्या आजारांचा धोका वाढत आहे. अनेकदा या आजारांची सुरुवातीची लक्षणे स्पष्टपणे जाणवत नसल्याने नियमित आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे ठरते. या पार्श्वभूमीवर शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. ...

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी अमरावती विभागातील ८१ मतदान केंद्रांना निवडणूक आयोगाची मान्यता* *बुलढाणा जिल्हात १८ मतदान केंद्र*

*अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी अमरावती विभागातील ८१ मतदान केंद्रांना निवडणूक आयोगाची मान्यता*  *बुलढाणा जिल्हात १८ मतदान केंद्र* *बुलढाणा दि. १० -* महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-२०२६ अंतर्गत अमरावती विभाग मतदारसंघातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या ५ जिल्ह्याच्या क्षेत्रात एकुण ८१ मतदान केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली आहे, अशी माहिती अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांनी दिली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता पाठविण्यात आलेल्या ८१ मतदान केंद्रांच्या प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली असल्याचे उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी एका पत्राद्वारे विभागीय आयुक्त यांना काल कळविले आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील जिल्हानिहाय मतदान केंद्रांची संख्या अनुक्रमे पुढील प्रमाणे आहे. अमरावती- २...

केंद्रीय पथक शेतकऱ्यांच्या बांधावर! यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

Image
*केंद्रीय पथक शेतकऱ्यांच्या बांधावर! यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी* > दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या > कापूस, सोयाबीन, तूर पिकांची प्रत्यक्ष पाहणी व मूल्यांकन > दुष्काळी संकटाशी दोन हात करण्यासाठी शेतकऱ्यांना दिला धीर > शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक > पीक परिस्थितीचा अहवाल केंद्र सरकारला सादर करणार *बुलढाणा, दि.10 :* यंदाच्या खरीप हंगामात पावसातील खंड आणि पिके करपल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाने आज यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा केला. पथकाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांची प्रत्यक्ष पाहणी व मूल्यांकन केले. तसेच दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा, अडचणी आणि मागण्या जाणून घेत त्यांना संकटाशी दोन हात करण्यासाठी धीर दिला. यंदाच्या खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळा...

मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्तीसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत**नवमतदारांसाठी आज, ११ ऑक्टोबरला विशेष शिबिरे; पात्र नागरिकांनी संधीचा लाभ घेण्याचे आवाहन*

*मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्तीसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत* *नवमतदारांसाठी आज, ११ ऑक्टोबरला विशेष शिबिरे; पात्र नागरिकांनी संधीचा लाभ घेण्याचे आवाहन* **बुलढाणा, दि. १० (जिमाका) :** मतदार यादीतील नावांची नोंदणी, वगळणी तसेच नोंदींमधील दुरुस्ती करण्यासाठी १२ ऑक्टोबर २०२६ ही अंतिम मुदत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची आणि आवश्यक दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. *नाव नोंदणीसाठी ७ लाखांहून अधिक अर्ज* राज्यात ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ८ ऑक्टोबरपर्यंत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना-६ अंतर्गत ७ लाख १९ हजार ३८२ अर्ज प्राप्त झाले आहेत. मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरुस्तीसाठी नमुना-८ अंतर्गत ३ लाख ९९ हजार ९२५ अर्ज, तर नाव वगळण्यासाठी नमुना-७ अंतर्गत १८ हजार ७४८ अर्ज प्राप्त झाले आहेत. *नवमतदारांसाठी विशेष शिबिरांची सुविधा* दि....

हतेडी बु. येथे राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम उत्साहात संपन्न पौष्टिक आहाराच्या विविध पाककृतींचे प्रदर्शन; प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेबाबत जनजागृती

 

हतेडी बु. येथे राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम उत्साहात संपन्न पौष्टिक आहाराच्या विविध पाककृतींचे प्रदर्शन; प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेबाबत जनजागृती

Image
    बुलढाणा, दि. १० (जिमाका) : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, बुलढाणा कार्यालयाच्या वतीने नवव्या राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत हतेडी बु. येथे दि. ८ ऑक्टोबर रोजी विविध उपक्रमांसह पोषण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.   या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, प्रकल्प संचालक श्री. म्हस्के, जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद येन्डोले, गटविकास अधिकारी अमिता गावडे, बुलढाणा बालविकास प्रकल्प अधिकारी संदीप गवळी, मोताळा बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. सय्यद, बुलढाणा येथील एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे विस्तार अधिकारी गणेश शिंदे, पर्यवेक्षिका सुषमा लांभाडे यांच्यासह सर्व पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि हतेडी बु. येथील ग्रामस्थ उपस्थित होते.   कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांनी तयार केलेल्या विविध पौष्टिक पाककृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले. यामध्ये पूरक पोषण आहार (THR) पासून तयार केलेल्या पाककृती, रानभाज्या आणि फळभाज्यांपासून बनविलेल्या विविध पदार्थांचा समावेश होता. स्थानिक व पौष्टि...

सेवा संकल्प अभियानांतर्गत देऊळगाव मही येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व लसीकरण वैयक्तिक स्वच्छता, संतुलित आहार आणि आरोग्यदायी सवयींबाबत जनजागृती

Image
    बुलढाणा, दि. 10 (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर, देऊळगाव मही यांच्या वतीने सहकार विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी व लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रंजित मंडाले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्रकुमार साळवे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवानंद शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.   शिबिरात पाच ते पंधरा वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना नियोजित लसीकरण कार्यक्रमानुसार डीपीटी (DPT) व टीडी (Td) लसी देण्यात आल्या. तसेच आरोग्य सेविकांमार्फत लहान बालकांचे नियमित लसीकरण करण्यात आले.   विद्यार्थ्यांना आरोग्य व स्वच्छतेचे मार्गदर्शन   समुदाय आरोग्य अधिकारी शिल्पा बंगाळे यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये विद्यार्थ्यांचे वजन, उंची आणि दातांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. यासोबतच विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.   जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर साबणाने हात धुणे, नखे स्वच्छ व लहान ठेवणे, दातांची...

कोराडी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्याचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा सिंचनासाठी पाणी उपलब्धतेची चाचपणी; पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाबाबत लवकरच निर्णय

  बुलढाणा, दि. 10 (जिमाका) : यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतीसाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्यासह पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी मेहकर तालुक्यातील कोराडी मध्यम प्रकल्पाला भेट देऊन पाणीसाठा व पाणीवापराच्या नियोजनाचा आढावा घेतला. उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देता येईल का, तसेच पिण्याच्या पाण्याचे आरक्षण कसे निश्चित करता येईल, याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.   कोराडी मध्यम प्रकल्प परिसराची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासह सिंचनासाठी पाणी उपलब्धतेची व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश दिले. या संदर्भात लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.   पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधून पाणीटंचाईच्या परिस्थितीची माहिती घेतली. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतीला पाण्याची आव...

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून ४ उमेदवारांची माघार

निवडणूक विशेष  ९ ऑक्टोबर २६ *अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून ४ उमेदवारांची माघार*  *बुलढाणा दि.९-* विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी वैध नामनिर्देशनपत्रे दाखल केलेल्या ३० उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी आज अखेर आपली उमेदवारी मागे घेतली आहे. निवडणूकीतून उमेदवारी मागे घेणाऱ्या उमेदवारांमध्ये सुनिल दुर्गादास राठोड (अपक्ष), नितीन सुभाषराव आगे (अपक्ष), सजील खान खलील खान (अपक्ष) आणि प्रिती हर्षल रेवणे (राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी) यांचा समावेश आहे. *अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीच्या रिंगणात आता अंतिमतः २६ उमेदवार.* भारत निवडणूक आयोगाच्या जाहिर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानूसार शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार असून, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अमरावती येथे मतमोजणी होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त अमरावती यांनी कळविले आहे. 0000

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी पहिली प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न**मतदान प्रक्रियेतील अचूकता, पारदर्शकता आणि नियमपालनावर भर; अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन*

Image
*अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी पहिली प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न* *मतदान प्रक्रियेतील अचूकता, पारदर्शकता आणि नियमपालनावर भर; अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन* *बुलढाणा, दि. ९ (जिमाका) :* विधानपरिषदेच्या द्विवार्षिक अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी पहिली प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत मतदान प्रक्रियेचे विविध टप्पे, पसंतीक्रम मतदान पद्धती, मतपत्रिका व मतपेट्यांचे व्यवस्थापन तसेच निवडणूक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण कार्यशाळेला अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, राजेंद्र पोळ, डॉ. जयश्री ठाकरे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, तहसीलदार विठ्ठल कुमरे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि निवडणूक कामकाजाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करणे व तिचे पुनरीक्षण, पात्र मतदारांची नोंदणी, आवश...