Posts

Showing posts from August, 2026

मूग-उडीद पीकस्पर्धेसाठी अर्जाची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढ; खरीप पीकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

  बुलढाणा, दि. 4 (जिमाका): राज्यातील अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत खरीप हंगाम 2026-27 साठी राज्यांतर्गत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. यंदापासून प्रथमच या स्पर्धेसाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज स्वीकारले जात असून, मूग व उडीद पीकस्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत शासनाने 10 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविली आहे. यापूर्वी मूग व उडीद पिकांसाठी अर्जाची अंतिम मुदत 31 जुलै होती. मात्र, ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचे हे पहिलेच वर्ष असल्याने शेतकऱ्यांची सोय लक्षात घेऊन शासनाने "एक वेळची विशेष बाब" म्हणून मुदतवाढ दिली आहे. या स्पर्धेचा उद्देश शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतलेल्या अधिक उत्पादनाला प्रोत्साहन देणे, त्यांचा गौरव करणे आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ इतर शेतकऱ्यांनाही मिळवून देणे हा आहे. तालुका स्तरावरील उत्पादनाच्या आधारे जिल्हा व राज्यस्तरीय विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. खरीप हंगामात भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आ...

बस, टुरिस्ट टॅक्सी आणि ऑटो चालक-मालकांनाही कल्याणकारी मंडळाचे सदस्यत्व; अर्ज करण्याचे आवाहन

  बुलढाणा, दि. 4 (जिमाका): महाराष्ट्र शासनाने 'धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ' या मंडळाच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक क्षेत्रातील चालक-मालकांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शासनाने योजनेत सुधारणा करून आता केवळ ऑटो परवानाधारक वाहन मालकांपुरती मर्यादित असलेली योजना बस, टुरिस्ट टॅक्सी आणि ऑटो चालक-मालकांनाही लागू केली आहे.   यापूर्वी ही योजना केवळ ऑटो रिक्षा परवानाधारक वाहन मालकांसाठी होती. मात्र शासनाच्या सुधारित निर्णयानुसार ज्या चालक-मालकांकडे बस, टुरिस्ट टॅक्सी किंवा ऑटो प्रवासी वाहन चालविण्याचा वैध बॅज आहे, तेही आता या कल्याणकारी मंडळाचे सभासद होण्यासाठी अर्ज करू शकणार आहेत. या कल्याणकारी मंडळामार्फत चालक-मालकांच्या हितासाठी विविध योजना राबविण्यात येणार असून त्यामध्ये ६५ वर्षांवरील चालकांसाठी सन्मान निधी योजना, कर्तव्यावर असताना जीवन विमा व अपंगत्व विमा संरक्षण, आरोग्यविषयक लाभ योजना, कामगार कौशल्यवृद्धी योजना, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास आर्थिक सहाय्य तसेच चालकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती ...

बुलढाण्यात 1 ऑगस्टपासून स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र सुरू; व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी ऑनलाइन वेळ आरक्षित करण्याचे आवाहन

    बुलढाणा, दि. 4 (जिमाका): केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार व्यावसायिक वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) व त्याच्या नूतनीकरणासाठी स्वयंचलित चाचणी केंद्र (Automated Testing Station-ATS) अनिवार्य करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बुलढाणा यांच्या अधिकारक्षेत्रात १ ऑगस्ट २०२६ पासून नवीन स्वयंचलित चाचणी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. मोटार वाहन कायदा, १९८८ मधील नियम ५६ नुसार सर्व व्यावसायिक वाहनांकडे वैध योग्यता प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. तसेच नियम ३९ नुसार नोंदणी नसलेले अथवा आवश्यक कायदेशीर अटींची पूर्तता न केलेले वाहन रस्त्यावर चालविण्यास मनाई आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या या अत्याधुनिक स्वयंचलित चाचणी केंद्रात एकूण तीन चाचणी ट्रॅक उपलब्ध आहेत. त्यापैकी दोन ट्रॅक ऑटोरिक्षा व कार संवर्गातील वाहनांसाठी, तर एक ट्रॅक मालवाहतूक व जड वाहनांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी वाहनधारकांनी संबंधित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने पू...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण पत्नीच्या यकृतदानातून पतीला मिळाले नवजीवन

    बुलढाणा/मुंबई दि.4 :   आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांची आवश्यकता असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील प्रशांत इंगळे (वय ४७) यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत त्यांच्या पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करून पतीला नवजीवन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून प्रशांत इंगळे यांच्यासाठी २ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे टाटा ट्रस्टकडून १९ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक मदतही उपलब्ध झाली. त्यामुळे एकूण २१ लाख ६० हजार रुपयांचा निधी उभारला गेला आणि अत्यंत खर्चिक असलेले यकृत प्रत्यारोपण शक्य झाले. प्रशांत इंगळे हे अकोला येथे केबल टाकण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत...

३ ते १५ ऑगस्टदरम्यान जनजागृतीचे विविध उपक्रम; "अवयवदान-जीवनदानाचा सर्वोत्तम संकल्प" अभियानाला सुरुवात

  बुलढाणा दि. 3 (जिमाका) :   सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार बुलढाणा जिल्ह्यात ३ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत 'अवयवदान पंधरवडा' साजरा करण्यात येत असून, सोमवारी (दि. ३) जिल्हा शासकीय रुग्णालयात अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावर्षी "अवयवदान-जीवनदानाचा सर्वोत्तम संकल्प" या संकल्पनेवर आधारित विविध जनजागृती उपक्रम जिल्हाभर राबविण्यात येणार आहेत. अवयवदानाबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे, त्यासंदर्भातील गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करणे तसेच अधिकाधिक नागरिकांना अवयवदानासाठी प्रेरित करणे हा या पंधरवड्याचा मुख्य उद्देश आहे. अवयवदानामुळे अनेक गंभीर रुग्णांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने समाजहिताच्या या कार्यात सहभागी होऊन अवयवदानाचा संकल्प करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले. शुभारंभ कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. रवी शिंदे, डॉ. कल्पना इंगळे, डॉ. भिलावेकर, नोडल अधिकारी अविनाश चिंचोले, नेत्रदान समुपदेशक योगेश सिरसाट, डॉ. अमोल उगले, सौरभ हिवाळे, डॉ. दे...

क्रातिसिंह नाना पाटील यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
  बुलढाणा दि. 3 (जिमाका) : क्रातिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.     000000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

 

'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरा'चा उत्साहात शुभारंभ; शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली - आमदार संजय गायकवाड

Image
  बुलढाणा, दि. 3 (जिमाका): सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा आणि शासकीय कार्यालयांचे वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर' नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे प्रतिपादन आमदार संजय गायकवाड यांनी केले. या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांच्या सेवा व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निवारण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.             आराध्या लॉन्स येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष पूजा गायकवाड, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, तहसीलदार विठ्ठल कुंभरे तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी, नागरिक उपस्थित होते. आमदार गायकवाड म्हणाले, समाधान शिबिरामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचत असून विविध दाखले, प्रमाणपत्रे आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळत आहे. शासना...

रक्षाबंधनासाठी भारतीय टपाल विभागाचे ‘वन स्टॉप राखी सोल्युशन’; बुलढाणा विभागातील सर्व टपाल कार्यालयांत विशेष राखी लिफाफे उपलब्ध

  बुलढाणा, दि. 3 (जिमाका): रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भाऊ-बहिणीच्या प्रेमाच्या पवित्र नात्याला अधिक सुरक्षित आणि वेळेत जपण्यासाठी भारतीय टपाल विभागाने ‘वन स्टॉप राखी सोल्युशन’ ही विशेष सुविधा सुरू केली आहे. या अंतर्गत बुलढाणा विभागातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये विशेष जलरोधक (वॉटरप्रूफ) राखी लिफाफे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे विशेष राखी लिफाफे केवळ १२ रुपये प्रति लिफाफा या माफक दरात उपलब्ध असून, ते तीन आकर्षक डिझाईन्समध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. पावसाळ्याचा विचार करून या लिफाफ्यांची जलरोधक रचना करण्यात आली असून, त्यामुळे राखी सुरक्षितपणे गंतव्यस्थानी पोहोचण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील टपाल कार्यालयांमध्येही हे लिफाफे उपलब्ध असून, त्यासोबत स्पीड पोस्ट सुविधेचाही लाभ नागरिकांना घेता येणार आहे. याशिवाय, सुरक्षित पॅकिंग, स्पीड पोस्ट, नोंदणीकृत टपाल, पार्सल बुकिंग तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा अशा सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशात किंवा परदेशात राहणाऱ्या भावंडांना राखी, भेटवस्तू, मिठाई आणि इतर वस्तू सुरक्षित ...