कोलवड येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू
बुलढाणा,
दि. 29 (जिमाका): एकात्मिक आदिवासी
विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत कार्यरत असलेल्या आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, कोलवड
(ता. बुलढाणा) येथे शैक्षणिक सत्र 2026-27
साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना 1 जुलै
2026 पासून ऑनलाइन अर्ज करता येणार असून, बुलढाणा तसेच परिसरातील जिल्ह्यांतील पात्र
विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल एस. एस. चौरपगार यांनी केले
आहे.
शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय,
डिप्लोमा, पदवी, पदविका तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी 1
ते 15 जुलै 2026 या कालावधीत https://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन
अर्ज भरावेत. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत व सर्व आवश्यक कागदपत्रांसह 15 जुलैपूर्वी
वसतिगृह कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.
अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रांच्या
स्पष्ट प्रती संकेतस्थळावर अपलोड कराव्यात. अर्जामध्ये विद्यार्थ्यांचा स्वतःचा आधारशी
संलग्न मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक असून, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि बँक
खाते परस्पर संलग्न असणे गरजेचे आहे. तसेच अर्जात नमूद केलेले बँक खाते कार्यरत असल्याची
खात्री करूनच त्याची नोंद करावी.
अर्जातील नाव आधार कार्डावरील नावाप्रमाणेच अचूक
भरावे. विद्यार्थी व पालकांचे स्वयंघोषणापत्र जोडणे अनिवार्य असून त्याचा नमुना संकेतस्थळावरील
सूचना फलकामध्ये उपलब्ध आहे. अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, गुणपत्रिका,
आधार कार्ड, बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा प्रवेश घेतल्याची मूळ पावती, विद्यार्थी व पालकांचे
स्वयंघोषणापत्र, बँक पासबुकची प्रत आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आदी कागदपत्रे जोडणे
बंधनकारक आहे.
अर्ज भरताना कोणतीही चुकीची माहिती नोंदविली जाणार
नाही, याची विशेष काळजी विद्यार्थी व पालकांनी घ्यावी, असे आवाहनही गृहपाल एस. एस.
चौरपगार यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment