खामगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सुरू; ६२० जागांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
बुलढाणा दि.11 (जिमाका): शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), खामगाव
येथे शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. दहावी उत्तीर्ण तसेच
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन संस्थेचे
प्राचार्य यांनी केले आहे.
प्रवेश इच्छुक उमेदवारांनी
Admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावेत. औद्योगिक
प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी तयार करण्यात आलेली प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती
पुस्तिका देखील याच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऑनलाइन अर्ज नोंदविल्यानंतर
उमेदवारांनी जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जाऊन अर्ज निश्चित (कन्फर्म) करून
घ्यावा. त्यानंतर प्रवेशासाठी आवश्यक विकल्प (ऑप्शन) सादर करावेत. प्रवेश प्रक्रियेतील
विविध टप्प्यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये
समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात येत असून, त्यामध्ये विविध व्यवसायांची माहिती दिली
जाते.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण
संस्था, खामगाव येथे एकूण १८ व्यवसायांसाठी ६२० प्रवेश क्षमता उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना
देण्यात येणाऱ्या मासिक विद्यावेतनामध्ये वाढ करण्यात आली असून, विविध प्रवर्गातील
प्रशिक्षणार्थ्यांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना देखील लागू करण्यात आली आहे.
आयटीआयमधून व्यावसायिक
शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगार, स्वयंरोजगार तसेच उच्च शिक्षणाच्या
विविध संधी उपलब्ध होत असल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेश प्रक्रियेत
सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगाव यांनी
केले आहे.
0000
Comments
Post a Comment