बुलढाणा,दि.28 (जिमाका) : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत 28 एप्रिल हा दिवस ‘लोकसेवा हक्क दिन ’ म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने नागरिकांना विविध शासकीय सेवा विहित मुदतीत आणि मुदतीपूर्वी देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. नागरिकांना जात प्रमाणपत्र, उत्पन्न, रहिवासी, शेतकरी दाखला, भूमी अभिलेखविषयक दाखले, तसेच इतर अधिसूचित सेवा वेळेत उपलब्ध करून देत उल्लेखनीय कामगिरी व उकृष्ट सेवा देणारे पदनिर्देशित अधिकारी उपविभागीय कार्यालय बुलढाणा, खामगाव व सिंदखेड राजा, तसेच चिखली, नांदुरा, मलकापुर, संग्रामपुर तहसील मधील अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा कामगार अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी व विद्युत निरीक्षक अशा विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, समाधान गायकवाड, राजेंद...