२० व २१ जून रोजी ‘स्पेशल ऑनलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह’; १० वी पास ते पदवीधरांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

 


बुलढाणा,दि.17 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, बुलढाणा यांच्या वतीने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी दोन दिवसीय ‘स्पेशल ऑनलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह फॉर ई-श्रम टास्क’ आयोजित करण्यात आला आहे. हा ऑनलाईन रोजगार मेळावा २० आणि २१ जून २०२६ रोजी होणार असून, १० वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये असफा ग्लोबल फायनान्स (बुलढाणा), क्रेडिट ग्रामीण लिमिटेड (बुलढाणा) आणि वैभव इंटरप्रायसेस (नागपूर) या कंपन्या सहभागी होत आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना बुलढाणा तसेच नागपूर जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

हा उपक्रम केंद्र सरकारच्या नॅशनल करिअर सर्व्हिस (NCS) पोर्टलशी संलग्न असून, गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करणाऱ्या उमेदवारांची माहिती थेट एनसीएस पोर्टलवर नोंदविण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांना भविष्यात त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विविध सरकारी व खासगी नोकऱ्यांच्या संधींबाबत मोफत माहिती आणि अपडेट्स मिळत राहतील. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत गुगल फॉर्मद्वारे निःशुल्क नोंदणी करावी. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांशी मुलाखतीसाठी थेट दूरध्वनीद्वारे संपर्क साधला जाणार आहे.

अधिक माहिती व पुढील अपडेट्ससाठी उमेदवारांनी कार्यालयाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनेलला जोडावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटरचे सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी