राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त 26 जून रोजी सामाजिक न्याय दिन साजरा
बुलढाणा,दि.25(जिमाका)
: राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 26
जून हा दिवस ‘सामाजिक न्याय दिन’
म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त यंदाही सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय
बुलढाणा आणि जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने जिल्हाभर विविध
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजकल्याण विभागाच्या
वतीने 26 जून 2026 रोजी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात सामाजिक न्याय, समता आणि
सर्वसमावेशक विकासाचा संदेश देणारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये
जनजागृती कार्यक्रम, सामाजिक न्याय विषयक मार्गदर्शन, तसेच शासनाच्या विविध
कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे.
या निमित्ताचा मुख्य कार्यक्रम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बुलढाणा येथे
शुक्रवार, दि. 26 जून रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात
राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार असून सामाजिक न्यायाच्या
मूल्यांचा प्रसार करण्यावर भर दिला जाणार आहे.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व नागरिक, सामाजिक
कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच लाभार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित
राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग बुलढाणा डॉ.
मनोज मेरत यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment