Posts

Showing posts from March, 2026

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर; तीन दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शनाची सांगता * ​नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
  ​ बुलढाणा, (जिमाका) दि. ३० : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय 'मल्टीमीडिया' प्रदर्शनाचा आज उत्साहात समारोप झाला. शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या सर्वसामान्यांपर्यंत दृकश्राव्य माध्यमातून पोहोचवण्याचा हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे, अशी भावना शेगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी यावेळी व्यक्त केली. ​ जिल्हा माहिती कार्यालय आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेगाव येथील नगर परिषदेच्या श्यामाप्रसाद मुखर्जी नगर भवनात २८ ते ३० मार्च दरम्यान हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला विद्यार्थी व नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक न्याय विभागाच्या सर्व महत्त्वपूर्ण योजनांची माहिती अत्यंत आकर्षक आणि चित्रमय स्वरूपात मांडण्यात आली होती. यामध्ये योजनेचे स्वरूप, मिळणारा लाभ, आवश्यक पात्रता, अर्जाची प्रक्रिया आणि संपर्क केंद्र याबद्दलची सविस्तर माहिती फलकांद्वारे (पॅनल) देण्यात आली. ​...

महावीर जयंतीनिमित्त ३१ मार्च रोजी जिल्ह्यात कत्तलखाने व मांसविक्री बंद ठेवण्याचे आदेश

  बुलढाणा: दि 30 (जिमाका): जैन धर्माचे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती ३१ मार्च २०२६ रोजी साजरी होणार असून, या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार, मंगळवार दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात सर्व कत्तलखाने, मांसविक्रीची दुकाने आणि अंडाविक्री केंद्रे पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महावीर जयंती उत्सवाच्या काळात समाजात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि धार्मिक सलोखा टिकून राहावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील मुख्याधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये बुलढाणा, चिखली, देऊळगांव राजा, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, मलकापूर, मोताळा, नांदुरा, खामगांव, शेगांव, संग्रामपूर आणि जळगांव जामोद या सर्व तालुक्यांचा समावेश आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये या दिवशी मांस...

संग्रामपुरात औषध विक्री केंद्रांची तपासणी; ७ जणांना नोटीस अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम

  बुलढाणा (जिमाका), दि. ३० : संग्रामपुर तालुक्यात बेकायदेशीर औषध विक्री होत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने अचानक तपासणी मोहीम राबवून ७ औषध विक्री केंद्रांना नोटीस बजावली आहे. सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, दि. २४ मार्च २०२६ रोजी एका वृत्तपत्रात संग्रामपुर तालुक्यात बेकायदेशीर औषध विक्री होत असल्याबाबत तसेच एका व्यक्तीने १६ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा दिल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. या अनुषंगाने सहायक आयुक्त   गजानन प्रल्हाद घिरके यांनी दि. २७ मार्च २०२६ रोजी संग्रामपुर, वरवंट, बकाल व वानखेड या भागांतील औषध विक्री केंद्रांची अचानक तपासणी केली. या मोहिमेदरम्यान एकूण १२ औषध विक्री केंद्रांची पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान झोपेच्या गोळ्या, गर्भपातासाठी वापरले जाणारे एमटीपी किट्स किंवा गुंगी आणणारी औषधे आढळून आली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तथापि, काही केंद्रांमध्ये नियमभंग आढळल्यामुळे ७ औषध विक्री केंद्रांना औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० तसेच नियम १९४५ अंतर्गत कारणे दाखवा नोटी...

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित; १५ एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

  बुलढाणा (जिमाका), दि. ३० :   क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्ह्यातील युवक-युवती व संस्थांच्या समाजहिताच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सन २०२५-२६ या वर्षासाठी जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी आपले प्रस्ताव १५ एप्रिल २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.   दरवर्षी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांतर्गत जिल्ह्यातील एक युवक, एक युवती आणि एक नोंदणीकृत संस्था यांचा सन्मान करण्यात येणार आहे. समाजाभिमुख कार्य करणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देणे व युवा विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.   पात्रता निकष (युवक/युवती): अर्जदाराचे वय १ एप्रिल रोजी किमान १३ वर्षे पूर्ण व ३१ मार्च रोजी कमाल ३५ वर्षांपर्यंत असावे. संबंधित जिल्ह्यात सलग किमान पाच वर्ष वास्तव्य आवश्यक आहे. अर्जदाराने केलेल्या कार्याचे सबळ पुरावे (वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, फोटो, व्हिडिओ) जोडणे बंधनकारक आहे. तसेच पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र आणि विविध हमीपत्रे सादर...

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील चौथा गावासाठी टँकर मंजूर

            बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता बुलढाणा   तालुक्यातील चौथा गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती बुलढाणा उपविभागीय अधिकारी यांनी दिली. चौथा येथे 430 पशुधन व 2 हजार 400 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 72 हजार 100 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत.   पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे. 000000

नटराज, विश्वकर्मा व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारांसाठी 10 एप्रिलपर्यंत अर्ज आमंत्रित

  बुलढाणा (जिमाका) दि. 30: इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सन २०२५–२६ या वर्षासाठी नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार तसेच क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार देण्यात येणार असून, यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी कार्य करणारे कलावंत, साहित्यिक, समाजप्रबोधनकार, समाजसेवक तसेच संबंधित क्षेत्रात कार्यरत संस्था यांना या पुरस्कारांद्वारे सन्मानित करण्यात येणार आहे. समाजप्रबोधन, सांस्कृतिक जतन, सामाजिक संघटन, अध्यात्मिक मार्गदर्शन व आर्थिक उन्नतीसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना या पुरस्कारासाठी पात्रता राहणार आहे. या पुरस्कारांसाठी अर्ज करणाऱ्या पुरुष उमेदवारांचे किमान वय ५० वर्षे, तर महिला उमेदवारांचे किमान वय ४० वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच संस्थांनी संबंधित क्षेत्रात किमान १० वर्षे कार्य केलेले असणे बंधनकारक आहे. इच्छुक व्यक्ती व संस्थांनी दि. १० एप्रिल २०२६ पर्यंत आपले प्रस्ताव सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, बुलढाणा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, त्रिशरण चौक, चिखली रोड, बुलढाणा येथ...

राज्यस्तरीय शालेय तेंग सु-डो क्रीडा स्पर्धेचा समारोप थाटात संपन्न

Image
  बुलढाणा (जिमाका) दि.27: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच तेंग सु-डो स्पोर्टस असोसिएशन, नांदुरा यांच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय शालेय तेंग सु-डो क्रीडा स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. दि. 24 ते 25 मार्च दरम्यान छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृह, नगर परिषद, नांदुरा येथे 14, 17 व 19 वर्षांखालील मुला-मुलींसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातील विविध विभागांतून 48 मुलगे व 48 मुलींचे संघ, व्यवस्थापक, पंचाधिकारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी तेंग सु-डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष रॉकी डिसोजा, प्रमुख अतिथी म्हणून सुभाष मोहीते, अनिल अंबुसकर, विजय अंबुसकर, पुरुषोत्तम निळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस महानकर यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक व पंचांचे कौतुक केले. पराभूत खेळाडूंनी सातत्याने सराव करून पुढील स्प...

जवळखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचा एचपीव्ही लसीकरणाबाबत सकारात्मक संदेश; आरोग्य सेविकेचा पुढाकार; एचपीव्ही लसीकरणावर वाढला विश्वास

    बुलढाणा (जिमाका) दि.27: प्राथमिक आरोग्य केंद्र, जवळखेड येथे एचपीव्ही (HPV) लसीकरणाबाबत सकारात्मक व प्रेरणादायी संदेश देणारी घटना घडली असून, आरोग्य सेविका (ANM) वर्षा नागरे यांनी स्वतःच्या मुलीला HPV लस देऊन समाजात विश्वास निर्माण करण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. ग्रामीण भागात लसीकरणाबाबत अनेकदा भीती, अफवा व गैरसमज आढळून येतात. या पार्श्वभूमीवर वर्षाताई नागरे यांनी स्वतःच्या कृतीतून “ आधी केले मग सांगितले ” या तत्त्वाचा अवलंब करत नागरिकांसमोर विश्वासार्ह उदाहरण ठेवले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे परिसरातील पालकांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू झाली असून, अनेकांनी आपल्या मुलींच्या लसीकरणाबाबत पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे. HPV (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) हा संसर्गजन्य विषाणू असून, त्यातून पुढे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून HPV लसीकरण अत्यंत प्रभावी मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, 9 ते 14 वयोगटातील मुलींना ही लस दिल्यास भविष्यातील ...

ज्ञानगंगा अभयारण्य मार्ग रात्री बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

  बुलढाणा (जिमाका) दि.27: बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटन व जैववैविध्य स्थळ असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणारा खामगांव–बोथा–बुलढाणा राज्य मार्ग क्र. 24 हा दररोज रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. वन्यजीव संवर्धन व वन संरक्षणाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, बुलढाणा यांच्या आदेशानुसार हा निर्णय लागू करण्यात आला आहे. या मार्गावर खामगांव, बोथा, गोंधनखेड आणि वरवंड येथे एकूण चार वनउपज तपासणी नाके कार्यरत असून संबंधित वेळेत वनकर्मचारी वाहनांची तपासणी करून नोंदी घेतात. तथापि, काही वाहनचालकांकडून रात्रीच्या वेळी नियमांचे उल्लंघन करून तपासणी नाक्यांवरील कर्मचाऱ्यांशी वाद घालण्याचे प्रकार समोर येत आहेत. अशा कृतींमुळे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत दंड व शिक्षेची तरतूद असून संबंधितांवर फौजदारी कारवाई होऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. वन विभागाच्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळेस या परिसरात वाघ, बिबट्या आणि अस्वल यांसारख्या वन्यप्राण्यांचा मुक्त संचार असतो. त्यामुळे वाहनांमुळे अपघात हो...

पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

Image
  पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन ​             बुलढाणा(जिमाका) दि.26 : सोशल मीडियावर सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरत असलेल्या अफवांमुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पेट्रोलियम नियम २००२ मधील तरतुदींचा वापर करून कडक निर्बंध लागू केले आहेत. ​ जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे स्पष्ट करत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले आहेत.   ​ जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश व निर्बंध: ​             खुले इंधन विक्रीवर बंदी: कोणत्याही पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल प्लास्टिक बाटल्या, कॅन, डबे किंवा अनधिकृत कंटेनरमध्ये भरून देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. इंधन केवळ वाहनांच्या टाकीतच भरू...

टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची तात्पुरती ज्येष्ठता यादी प्रसिद्ध; २७ मार्च रोजी विशेष कार्यशाळेचे आयोजन

  ​ बुलढाणा (जिमाका)दि.26: सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, बुलढाणा जिल्ह्यातील टी.ई.टी. (TET) किंवा सी.टी.ई.टी. (CTET) उत्तीर्ण शिक्षकांची पदोन्नतीसाठीची अंतरिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील त्रुटी, दुरुस्त्या आणि आक्षेपांचे निराकरण करण्यासाठी २७ मार्च २०२६ रोजी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ​ मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या २४ मार्च २०२६ च्या पत्रानुसार ही तात्पुरती ज्येष्ठता यादी अंतरिम स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली आहे. २५ मार्च रोजी ही यादी सर्व पंचायत समिती आणि गटसाधन केंद्रांच्या नोटीस बोर्डावर तसेच शिक्षकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ​ ज्येष्ठता यादीवर ज्या शिक्षकांचे आक्षेप असतील, ज्यांना माहितीमध्ये दुरुस्ती करायची असेल किंवा ज्यांचे नाव यादीत समाविष्ट करायचे असेल, अशा सर्व शिक्षकांसाठी २७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता 'श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद बुलढाणा' येथे कार्यशाळा आयोजित केली आहे. ​      ...

जनगणना २०२७ साठी तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिरास उत्साहात सुरुवात अचूक आणि पारदर्शक माहिती संकलनावर भर द्या - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

Image
  ​             बुलढाणा (जिमाका), दि. २६ : जनगणना ही केवळ आकडेवारी गोळा करण्याची प्रक्रिया नसून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणे आखण्याचा मूलभूत पाया आहे. त्यामुळे प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याने नियमावलीचे काटेकोर पालन करत अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह माहिती संकलित करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले. ​ जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर, जनगणना संचालनालय व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, सहायक संचालक अजय ठाकूर, सांख्यिकी अन्वेषण विशाल दिवेकर आदी उपस्थित होते. ​ जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी नमूद केले की, जनगणना प्रक्रियेत वेळेचे आणि अचूकतेचे विशेष महत्त्व आहे. प्रत्यक्ष क्षेत्रात काम करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी इन्...

आशियाई लेक्रॉस स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून सत्कार

Image
  बुलढाणा(जिमाका) दि. २५:   सौदी अरेबियातील रियाध येथे संपन्न झालेल्या आशियाई लेक्रॉस स्पर्धेत (Asian Lacrosse Championship) अजिंक्यपद मिळवून देशाचा तिरंगा फडकवणाऱ्या भारतीय संघाचा आज केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री   प्रतापराव जाधव यांनी गौरव केला. नवी दिल्ली येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी हा सत्कार सोहळा पार पडला. ​ भारताची ऐतिहासिक कामगिरी ​             सौदी अरेबियातील रियाध येथे १ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान आशियाई लेक्रॉस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने इराकविरुद्ध ९-२ अशा मोठ्या फरकाने विजय मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या संघात देशभरातील १८ गुणवंत खेळाडूंचा समावेश होता. ​ विजेत्या संघाला आपल्या दिल्ली येथील निवासस्थानी आमंत्रित करून प्रतापराव जाधव यांनी सर्व खेळाडूंशी जिव्हाळ्याने संवाद साधला. यावेळी त्यांनी खेळाडूंच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक केले. ​ याप्रसंगी बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले की, आज भारत देश सर्वच क्षेत्रांत ज...

मोताळा तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर

    बुलढाणा (जिमाका), दि. 25: राज्य निवडणूक आयोगाकडून घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार मोताळा तालुक्यांतील तीन ग्रामपंचायतींच्या रिक्त थेट सरपंच व सदस्यांच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये तालखेड,गुळभेली, गोतमारा, असे तिन   रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदाच्या जागासाठी निवडणूक होणार आहे. या ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू असून निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मोताळा तहसिलदार तथा ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.     निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे : निवडणूकीची अधिसूचना सोमवार दि. 30 मार्च 2026 रोजी संबधित तहसिल कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. या कार्यक्रमानुसार निवडणुकीकरीता नामनिर्देशनपत्र दि. 7 ते 13 एप्रिल 2026 पर्यंत सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेदरम्यान स्वीकारले जाणार आहे. नामनिर्देशन पत्र छाननी बुधवार दि. 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजूपासून छाननी संपेपर्यंत. दि. 17 एप्रिल 2026 रोजी नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. या नि...

बुलढाणा जिल्हा परिषदेचा ४१.२३ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

  बुलढाणा (जिमाका) दि. 25:   जिल्हा परिषद बुलढाणा यांचा सन २०२५-२६ चा सुधारित व सन २०२६-२७ चा रु. ४१ कोटी २३ लाखांचा मूळ अर्थसंकल्प सामान्य सभेत मंजूर करण्यात आला. मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड यांनी अर्थसंकल्प सादर केला असून मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक गुलाबराव खरात यांनी त्यास मंजुरी दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) कोल्हे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, शिवशंकर भारसाकळे, प्रमोद एंडोले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते, जिल्हा कृषी विकास अधिकारी अंगाईत, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. हा अर्थसंकल्प मुद्रांक शुल्क अनुदान, जमीन महसूल अनुदान, गुंतवणुकीवरील व्याज व इतर उत्पन्न यांचा विचार करून तयार करण्यात आला असून, जिल्हा परिषदेच्या गुंतवणुकीवरील व्याजातून उत्पन्नात वाढ झाल्याने यंदाचा अर्थसंकल्प वाढीव आहे. शासन नियमांनुसार खर्चात समाज कल्याणासाठी २० टक्के, महिला व बाल कल्याणासाठी १० टक्के, देखभाल-दुरुस्ती २० टक्के, दिव्यांग कल्याण ५ टक्के, शाळा दुरुस्ती ५ टक्...

बुलढाणा क्षय आरोग्यधाम येथे जागतिक क्षयरोग दिन उत्साहात साजरा

Image
  बुलढाणा (जिमाका), दि. 25: जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षय आरोग्यधाम, बुलढाणा येथील रुग्णालयात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. १९८२ पासून दरवर्षी २४ मार्च रोजी साजरा होणाऱ्या या दिनानिमित्त यंदाची “ होय! आम्ही क्षयरोगाचा अंत करू शकतो : देशांच्या नेतृत्वाखाली लोकांच्या मदतीने ” ही संकल्पना प्रभावीपणे मांडण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशील चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व डॉ. रॉबर्ट कोच यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. आर. खान यांनी क्षयरुग्णांची सद्यस्थिती, आकडेवारी तसेच शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात रुग्णालयाचे वरिष्ठ लिपिक दत्तात्रय वाघमारे यांनी क्षयरुग्णांवरील स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. आहार तज्ञ डॉ. मयुरी देशमुख यांनी रुग्णांना प्रथिनयुक्त आहाराचे महत्त्व समजावून सांगत योग्य आहाराचे मार्गदर्शन केले. यावेळी क्षयरोगावर मात केलेल्या रुग्णाची प्रेरणादायी व्हिडिओ क्लिपही दाखविण्यात आली. याशिवा...

जिल्हा परिषद शाळांच्या नवपरिवर्तनासाठी “झेप” उपक्रमाची सुरुवात शिक्षकांची उपक्रमशीलता म्हणजे सृजनशील संशोधन – मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात

Image
    बुलढाणा (जिमाका), दि. 25: जिल्हा परिषद शिक्षकांची नाविन्यपूर्ण उपक्रमशीलता ही सृजनशील संशोधनाचेच एक रूप असून, या माध्यमातून आगामी शैक्षणिक सत्रात जिल्हा परिषद शाळांमध्ये आमूलाग्र बदल घडेल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी व्यक्त केला. समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा नियोजन सभागृहात “ झेप   या अभिनव संकल्पनेतून जिल्ह्यातील 150 नाविन्यपूर्ण शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल आकाळ, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. मारुती गायकवाड, व्याख्याते गजानन राऊत, उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर, शेख अकिल आदी मान्यवर उपस्थित होते. गुलाब खरात पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद शिक्षक विविध प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. मात्र या उपक्रमांना व्य...

नांदुरा येथे राज्यस्तरीय शालेय तेंग सु-डो क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन

    ​             बुलढाणा (जिमाका) दि.25 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय (पुणे) अंतर्गत, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि तेंग सु-डो स्पोर्ट्स असोसिएशन, नांदुरा यांच्या तांत्रिक व आर्थिक सहकार्याने राज्यस्तरीय शालेय तेंग सु-डो (१४, १७ व १९ वर्षांखालील मुले-मुली) क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन २४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले.   ​             नांदुरा येथील नगर परिषदेच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन शहराच्या प्रथम नागरिक आणि नगराध्यक्षा मंगलाताई सुधीरजी मुऱ्हेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आदित्यकुमार सिंह, पोलीस निरीक्षक पावरा, मुख्याधिकारी मिलिंद दरोकार, जिल्हा क्रीडा अधिकारी बी.एस. महानकर, तेंग सु-डो असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रॉकी डिसोजा आणि स्थानिक असोसिएशनचे अध्यक्ष सुधीरभाऊ म...

शेगाव तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर

    बुलढाणा (जिमाका), दि. 24: राज्य निवडणूक आयोगाकडून घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार शेगाव तालुक्यांतील पाच ग्रामपंचायतींच्या रिक्त थेट सरपंच व सदस्यांच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये येऊलखेड, चिंचखेड, सगोडा, टाकळी व धारवला मुरा असे पाच   रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदाच्या जागासाठी निवडणूक होणार आहे. या ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू असून निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शेगाव तहसिलदार तथा ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.     निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे : निवडणूकीची अधिसूचना सोमवार दि. 30 मार्च 2026 रोजी संबधित तहसिल कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. या कार्यक्रमानुसार निवडणुकीकरीता नामनिर्देशनपत्र दि. 7 ते 13 एप्रिल 2026 पर्यंत सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेदरम्यान स्वीकारले जाणार आहे. नामनिर्देशन पत्र छाननी बुधवार दि. 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजूपासून छाननी संपेपर्यंत. दि. 17 एप्रिल 2026 रोजी नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ठेवण्...

सावत्र आईकडून मारहाण होत असलेल्या बालिकेची सुटका; चाईल्ड हेल्प लाईन व पोलिसांची संयुक्त कारवाई

  बुलढाणा (जिमाका), दि. 24: मलकापूर येथील वरखेड गावात सावत्र आईकडून मारहाण होत असलेल्या 14 वर्षीय बालिकेची चाईल्ड हेल्प लाईन 1098, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व मलकापूर ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुटका केली. दि. 22 मार्च 2026 रोजी या घटनेची माहिती चाईल्ड हेल्प लाईनला प्राप्त होताच प्रकल्प समन्वयक शेख सोहेप यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे तसेच बाल कल्याण समिती यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू केली. यानंतर चाईल्ड हेल्प लाईनच्या पथकाने वरखेड येथे भेट देऊन चौकशी केली असता संबंधित बालिकेला सावत्र आईकडून मारहाण होत असल्याचे निष्पन्न झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन तात्काळ मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला कळविण्यात आले. चाईल्ड हेल्प लाईनच्या पथकाने बालिकेसह तिच्या मोठ्या भावाला ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये आणले. पोलिसांनी चौकशी करून संबंधित सावत्र आईविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बालिकेला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्...