पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील मंगरुळ प्र. खेर्डा गावासाठी टँकर मंजूर
बुलढाणा दि.10 (जिमाका): पाणी टंचाईची तीव्रता लक्षात
घेता चिखली तालुक्यातील मंगरुळ प्र.खेर्डा गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर
करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या
जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली.
मंगरुळ प्र.खेर्डा येथे
500 पशुधन व 2200 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 53 हजार 500 लिटर्स
पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता
टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात
यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर
नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी, बुलढाणा
यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment