जिल्हा नियोजन समिती बुलढाणा येथे 20 वा राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा

 





बुलढाणा, दि. 29 (जिमाका): राष्ट्रीय सांख्यिकीचे जनक प्राध्यापक पी.सी.महालनोबीस यांचा जन्मदिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून जिल्हा नियोजन समिती कार्यालय बुलढाणा येथे माननीय जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा नियोजन अधिकारी बुलढाणा राहुल पवार, कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त बिटोळे, उपायुक्त गोपाल पानगे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी उल्का राणे यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला

 

सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा सांख्यिकी कार्यालय व जिल्हा नियोजन समिती कार्यालय बुलढाणा येथील कर्मचारी व अधिकारी यांनी रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला. तसेच जिल्हा नियोजन समिती व जिल्हा सांख्यिक कार्यालयामधील उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करून कार्यक्रम साजरा केला

 

सहायक संशोधन अधिकारी कृष्ण वानखेडे, सांख्यिकी सहाय्यक मिलिंद इंगळे व प्रफुल बाबर यांनी सांख्यिकी दिनाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक संशोधन अधिकारी प्रदीप तोमर यांनी तर आभार प्रदर्शन प्रज्ञा सुळे यांनी केले.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी