जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा 23 जून रोजी; तक्रारी सादर करण्याचे आवाहन
बुलढाणा,
दि. 22 (जिमाका): शासन परिपत्रक क्रमांक
अहत-1610/प्र.क्र.64/10/11-अ, दिनांक 4 फेब्रुवारी 2011 अन्वये जिल्हा भ्रष्टाचार
निर्मूलन समितीची सभा मंगळवार, दि. 23 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी
कार्यालय, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आली आहे.
या सभेमध्ये
भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींचा आढावा घेण्यात येणार असून, संबंधित नागरिकांना
आपल्या तक्रारी समितीसमोर सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारदारांनी
तक्रारी प्रतिज्ञालेखावर स्पष्ट शब्दांत नमूद करून त्यासोबत आवश्यक व सबळ पुरावे
जोडून समितीकडे दाखल कराव्यात, असे प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी
भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांबाबत उपलब्ध पुराव्यांसह तक्रारी सादर करून
समितीच्या कार्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात
आले आहे.
00000
Comments
Post a Comment