भुसावळ येथे ३० जून रोजी माजी सैनिकांचा भव्य मेळावा
बुलढाणा,दि.24(जिमाका)
: जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी
सैनिकांच्या विधवा, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता तसेच अवलंबित यांच्या विविध अडचणी
व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी ३० जून २०२६ रोजी भुसावळ येथे भव्य मेळाव्याचे
आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा सकाळी ९ वाजता स्टेशन हेडक्वार्टर, भुसावळ येथे
होणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बुलढाणा यांनी दिली.
मेळाव्यात माजी सैनिकांच्या सेवा,
निवृत्तीवेतन, बँकिंग, नोंदवही तसेच इतर प्रशासकीय समस्यांवर मार्गदर्शन व
निराकरणासाठी विविध विभागांचे अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये
आर्मी प्लेसमेंट नोड पुणे, पीसीडीए अलाहाबाद, महार रेजिमेंट, आर्मर्ड कॉर्प्स,
मराठा लाईट इन्फंट्री, मॅकनाईज्ड इन्फंट्री, ईएमई, सिग्नल्स, बीईजी, आर्टिलरी
रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. तसेच सीपीपीसी, स्टेट बँक ऑफ इंडिया,
पंजाब नॅशनल बँक, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय बुलढाणा व जळगाव येथील अधिकारीही
उपस्थित राहतील.
मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या माजी
सैनिक, विधवा, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता आणि अवलंबितांनी आपल्या अडचणींसंदर्भातील
निवेदन छायांकित तीन प्रतींसह आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, भुसावळ येथे जाण्यासाठी
सहभागींसाठी सकाळी ६.३० वाजता विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. ही बस ईसीएचएस
बुलढाणा, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय बुलढाणा आणि चिखली बस डेपो येथून उपलब्ध
राहणार आहे.
जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा,
असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment