बुलढाणा शहरात २८ जून रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम; ० ते ५ वर्षांच्या बालकांना डोस पाजण्याचे आवाहन

 


बुलढाणा, दि. 22 (जिमाका): राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रमांतर्गत रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी बुलढाणा शहरात विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस पाजण्यात येणार आहे.

मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी बुलढाणा शहर परिसरात एकूण ३६ पोलिओ लसीकरण बूथ उभारण्यात आले आहेत. पालकांनी आपल्या परिसरातील जवळच्या बूथवर बालकांना घेऊन जाऊन पोलिओचा डोस पाजावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय बुलढाणा यांनी केले आहे.

पोलिओसारख्या गंभीर आजाराचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचणे आवश्यक असल्याने कोणतेही मूल या मोहिमेपासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाने विशेष नियोजन केले आहे.

आरोग्य विभागाच्या या राष्ट्रीय उपक्रमात पालकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या पाल्यांना पोलिओ प्रतिबंधक डोस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी