प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; 30 सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती नोंदविता येणार
*प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; 30 सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती नोंदविता येणार* > *जिल्हयात १८ लाख ९९ हजार ०२८ मतदार* *बुलढाणा, दि. ३१ (जिमाका) :* भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी आज, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मतदारांना प्रारूप यादीतील आपले नाव तपासता येणार असून, नावाबाबत दावे व हरकती नोंदविण्यासाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत संधी देण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाचा दुसरा टप्पा जाहीर केला असून, त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश आहे. या प्रक्रियेत प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट राहण्यासाठी संबंधित व्यक्ती भारताचा नागरिक असणे आणि वयाची १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. *जिल्ह्यात 18 लाखांहून अधिक मतदार* दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण १८ लाख ९९ हजार...