पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


बुलढाणा,दि.8 (जिमाका) : भारत सरकारतर्फे प्रदान करण्यात येणारे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी मानाचे पुरस्कार आहेत. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय आणि समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव या पुरस्कारांद्वारे केला जातो. प्रजासत्ताक दिन २०२७ निमित्त जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी राज्यातील पात्र व्यक्तींची नामांकने मागविण्यात आली आहेत.

गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांचा उद्देश विविध क्षेत्रांतील असामान्य योगदानाची दखल घेणे हा आहे. कला, साहित्य व शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्र, समाजकार्य, विज्ञान व अभियांत्रिकी, नागरी सेवा, व्यापार व उद्योग आदी क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य अथवा सेवेसाठी हे पुरस्कार प्रदान केले जातात.

जिल्ह्यातील पात्र व्यक्तींची पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकने विहित नमुन्यात भरून दि. ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन सादर करावीत. नामांकन प्रस्ताव भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे.

नामांकन प्रक्रियेबाबत अधिक माहिती तसेच ऑनलाइन अर्जासाठी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलला भेट द्यावी. जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची नावे पुढे आणण्यासाठी नागरिक, संस्था आणि संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी