Posts

Showing posts from October, 2026

मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर राहण्याची गरज नाही आवश्यक कागदपत्रे BLO कडे जमा करा

    बुलढाणा, दि. २ (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचनांनुसार, जुळवणी न झालेल्या (No Mapping) अथवा जुळवणीमध्ये तार्किक विसंगती (Logical Discrepancy) आढळलेल्या मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर राहण्याची आवश्यकता नाही. संबंधित मतदारांनी आवश्यक कागदपत्रे बीएलओकडे सादर करावीत, असे मुख्य निवडणूक   कार्यालय यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.   नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांच्या घरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) भेट देऊन आवश्यक कागदपत्रे जमा करतील. तसेच, मतदारांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही आवश्यक कागदपत्रे अथवा पुरावे संबंधित BLO कडे पाठविता येणार आहेत.   तार्किक विसंगती आढळलेल्या मतदारांच्या प्रकरणात संबंधित कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर अथवा BLO यांच्या पडताळणी अहवालाच्या (पंचनामा) आधारे निर्णय घेण्यात येईल. विहित कागदपत्रे उपलब्ध नसल्यास केवळ अपवादात्मक परिस्थितीतच मतदार नोंदणी अधिकारी अथवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी शक्यतो ऑनलाइन पद्धतीने सुनावणी घेतील. अशा सुनावणीस संबंधित मतदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणतीही प्रौढ व्यक्...

विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ ; मतदार नोंदणीसाठी ३, ४, १० व ११ ऑक्टोबर रोजी विशेष शिबिरे नाव नोंदणी व दुरुस्तीसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Image
    बुलढाणा, दि. २ (जिमाका) : विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ अंतर्गत मतदार यादीत नाव नोंदणी, नावाची पडताळणी तसेच मतदार यादीतील तपशिलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ज्या पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीत अद्याप समाविष्ट झालेले नाही, अशा नागरिकांसाठी त्यांच्या संबंधित मतदान केंद्रांवर ३, ४, १० व ११ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.   मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १२ ऑक्टोबर २०२६ आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी निर्धारित मुदतीत नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.   या विशेष शिबिरांमध्ये १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना नमुना क्र. ६ अर्जाद्वारे मतदार यादीत नाव नोंदणी करता येणार आहे. तसेच नागरिकांना मतदार यादीतील आपले नाव तपासता येणार असून, नाव, पत्ता किंवा इतर तपशिलांमध्ये आवश्यक दुरुस्ती असल्यास संबंधित अर्ज सादर करता येतील. निवडणूक प्रशासनाकडून नोटीस प्राप्त झालेल्या व्यक्तींनाही आवश्य...

विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी; स्वच्छता व किशोरवयीन आरोग्याबाबत मार्गदर्शन ; वळती येथे अनुसूचित जाती मुलांच्या शाळेत आरोग्य तपासणी शिबिर

Image
    बुलढाणा, दि. २ (जिमाका) : प्राथमिक आरोग्य केंद्र, किन्होळा अंतर्गत वळती येथील अनुसूचित जाती मुलांच्या शाळेत आज आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात शाळेतील विद्यार्थ्यांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी करण्यात आली.   यावेळी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता तसेच परिसर स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच किशोरवयीन आरोग्यविषयक विविध बाबींवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. धनुर्वात प्रतिबंधक लसीकरणाचे महत्त्व सांगून पात्र विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.   कीटकजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. आरोग्यविषयक सवयी, स्वच्छता आणि आजारांपासून प्रतिबंध याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.   शिबिरास प्राथमिक आरोग्य केंद्र, किन्होळा येथील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. 0000

तहसील कार्यालय लोणार येथे ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत विविध शासकीय सेवांचे वाटप 252 लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा मिळाला लाभ

    बुलढाणा, दि. 2 (जिमाका) : नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ सुलभतेने आणि कालमर्यादेत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तहसील कार्यालय, लोणार येथे ‘सेवा संकल्प अभियान’ व ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियान’ उत्साहात पार पडले. यावेळी   252 लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला.   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रशांत सानप होते. तहसीलदार भूषण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अभियानांतर्गत पोटखराब क्षेत्राचे लागवडीखालील क्षेत्रात रूपांतर करण्यासंदर्भातील आदेश, कालमर्यादेत निकाली काढलेल्या विविध प्रकरणांचे अंतिम आदेश, तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी आदेश व विविध पत्रव्यवहार, शपथपत्रांचे वाटप करण्यात आले. नकल विभागामार्फत नकल, आयुष्यमान भारत कार्ड तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत ऑनलाइन शिधापत्रिकांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले.   यावेळी नागरिकांना 12 पोटखराब क्षेत्र वहिती आदेश, 13 आधार कार्ड, 21 शिधापत्रिका, 17 रहिवास व अधिवास दाखले, 25 आयुष्यमान कार्ड, 43 संजय गांधी निराधार योजना मंज...

*विशेष लेख* *दुष्काळावर मात : हवी सर्वांची साथ*

Image
*विशेष लेख*                                                                                                  *दुष्काळावर मात : हवी सर्वांची साथ*  _______________                                                               महाराष्ट्रात पावसाचा खंड आणि पिकांचे नुकसान पाहून राज्य शासनाने २६५ तालुक्यांमध्ये ट्रिगर - १ नुसार दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहिर करुन त्या भागातील दुष्काळावर मात करण्यासाठी १२ उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकरी - नागरिकांना सहाय्य करुन दुष्काळावर मात करायची आहे यासाठी सर्वांच...

पंचायत समिती शेगाव अंतर्गत ग्रामपंचायत पहुरजीरा येथे सेवा संकल्प अभियान आणि पोषण महा निमित्त किशोरी मुलींना मार्गदर्शन तसेच महिलांना पोषणाबाबत चर्चासत्र व पोषणाचे विविध उपक्रम घेण्यात आले. यावेळी रांगोळी, चार्ट्स चे माध्यमाने महत्व पटवून देण्यात आले. यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली घनोकार, पर्यवेक्षिका उषा नेमाने, स्वाती आवारे, निर्मला पोहरे,आरोग्य विभागा मधून आरोग्य सेविका श्रीमती भारसाकडे तसेच गावातील सर्व आशा सेविका, अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या.

शिवसाई आश्रमशाळेत ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी ; डेंग्यू, हिवताप प्रतिबंधाबाबत जनजागृती; स्वच्छता व वैयक्तिक आरोग्याबाबत मार्गदर्शन

Image
    बुलढाणा, दि. 01 (जिमाका) : जानेफळ येथील शिवसाई आश्रमशाळेत ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत दि. 30 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सूरज ठाकरे व वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोंळकी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या पथकाने ही तपासणी केली.   तपासणीदरम्यान आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांच्या रक्ताच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. तपासणीमध्ये आढळून आलेल्या बाबींची नोंद घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.   यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छता, वैयक्तिक आरोग्य, संतुलित आहार तसेच विविध आजारांपासून बचावाच्या उपाययोजनांबाबत आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः पावसाळ्यात उद्भवणाऱ्या डेंग्यू व हिवतापापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात आली. परिसरात स्वच्छता राखणे, पाणी साचू न देणे, डासांची उत्पत्ती रोखणे तसेच आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने आरोग्य केंद्रा...

शिवनी येथे ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत घरोघरी आरोग्य तपासणी; ३० वर्षांवरील नागरिकांची तपासणी; समुपदेशनासह मोफत औषधोपचार

Image
  बुलढाणा, दि. 01 (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत आदिवासी भागातील नागरिकांना आरोग्य सेवा त्यांच्या घरापर्यंत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दि. 30 सप्टेंबर रोजी गाव शिवनी येथे घरोघरी आरोग्य तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. आरोग्य पथकाने गावातील 30 वर्षांवरील नागरिकांची तपासणी करून आवश्यकतेनुसार समुपदेशन, मोफत औषधोपचार व संदर्भ सेवा उपलब्ध करून दिली. या मोहिमेदरम्यान नागरिकांची उच्च रक्तदाब (BP), मधुमेह (Blood Sugar) तसेच मुख कर्करोगाची पूर्वतपासणी करण्यात आली. यासोबतच इतर जुनाट तसेच हंगामी आजारांची लक्षणे तपासून नागरिकांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. तपासणीमध्ये आरोग्यविषयक समस्या आढळलेल्या नागरिकांना पुढील तपासणी व उपचारासाठी आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा देण्यात आली. तसेच गरजेनुसार मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणी, आजारांची लक्षणे दिसून आल्यास तातडीने आरोग्य संस्थेशी संपर्क साधणे आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याबाबत नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले. या आरोग्य मोहिमेत डॉ. विशाल दाने, डॉ. विश्वजित त्रिकार व डॉ. विजय दुतवंडे, सम...

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतून ६ लाभार्थ्यांना जमीन वाटप

  बुलढाणा, दि. १ (जिमाका) : सामाजिक न्याय विभागाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर शेतजमीन उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेंतर्गत खामगाव तालुक्यातील मौजे हिवरखेड येथे एकूण ९.६६ हेक्टर जमीन खरेदी करण्यात आली असून, त्यापैकी ६ लाभार्थ्यांची जमीन वाटपासाठी निवड करण्यात आली आहे. शासन निर्णय क्रमांक जमीन-२०२५/प्र.क्र.६४/अजाक, दि. २१ ऑगस्ट २०२५ अन्वये ही योजना राबविण्यात येत आहे. शासन निर्णयातील तरतुदीनुसार संबंधित गावातील ग्रामसेवक व तलाठी यांच्यामार्फत प्राप्त भूमिहीन व दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांच्या यादीतून पात्र लाभार्थ्यांची जमीन वाटपासाठी निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या भूमिहीन अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांबाबत कोणाला काही आक्षेप असल्यास, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, बुलढाणा यांच्या कार्यालयात दि. ९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत लेखी स्वरूपात कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 0000

केंद्रीय DCS MH ॲपद्वारे खरीप ई-पीक पाहणी नोंदणी सुरू; १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पीक पाहणी पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे आवाहन

  बुलढाणा, दि. 1 (जिमाका): बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६-२७ साठी ‘केंद्रीय DCS MH’ (Central DCS) या नवीन मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी व नोंदणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी १० नोव्हेंबर २०२६ पूर्वी आपल्या पिकांची नोंदणी गावातील नियुक्त सहाय्यकाकडून वेळेत पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.              महाराष्ट्र शासनाच्या जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख कार्यालयाच्या निर्देशानुसार पीक पाहणी व नोंदणी मोहिमेला ११ ऑगस्ट २०२६ पासून सुरुवात झाली आहे.   ही ई-पीक पाहणी अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनातर्फे प्रत्येक गावासाठी विशेष 'पीक पाहणी सहाय्यका'ची नियुक्ती करण्यात आली आहे.              जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६-२७ साठी केंद्रीय DCS MH ॲपद्वारे एकूण 8 लाख 41 हजार 296 पीक पाहणी करावयाच्या मालकी (owner's) प्लॉटपैकी 5 लाख 30 हजार 279 प्लॉटवर संबंधित सहाय्यकांमार्फत ७/१२ व...

‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲपबाबत ६ ऑक्टोबरला कार्यशाळा निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

  बुलढाणा, दि. १ (जिमाका) : निवृत्तीवेतनविषयक सेवा जलद व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘Maha-UPLABDHI’ (महा-उपलब्धी) या मोबाईल ॲपबाबत जिल्हा कोषागार कार्यालय, बुलढाणा येथे दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सहसंचालक, लेखा व कोषागारे, अमरावती यांच्या निर्देशानुसार आयोजित या कार्यशाळेत राज्याचे प्रधान सचिव ऑनलाइन माध्यमातून उपस्थित राहून सहभागींचे मार्गदर्शन करणार आहेत. या ॲपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनविषयक सेवा अधिक जलद, सुलभ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेस जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी योगेश धोंगडे यांनी केले आहे. 0000

चांडोळ येथे कृषी मालासाठी उपबाजार घोषित; बुलढाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील ५० गावांचा समावेश

              बुलढाणा, दि. 01 (जिमाका) :   कृषी उत्पन्न बाजार समिती, बुलढाणा अंतर्गत सहकार महर्षी स्व. भास्कररावजी शिंगणे उपबाजार, चांडोळ येथे नियंत्रित शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी उपबाजार घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ अंतर्गत ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, बुलढाणा यांनी चांडोळ येथे उपबाजार सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार शासनाच्या संबंधित आदेशान्वये जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलढाणा यांनी चांडोळ येथील जागा बाजार क्षेत्रामधील नियंत्रित शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी नियमनकारी उपबाजार म्हणून घोषित केली आहे. या उपबाजारासाठी चांडोळ शिवारातील शासकीय ‘ई-वर्ग’ गट क्रमांक ६५९ मधील २.०० हेक्टर जमीन निश्चित करण्यात आली आहे. या जागेच्या चतु:सीमा पूर्वेस उर्वरित जमीन व डंपींग ग्राउंड, पश्चिमेस सरकारी संस्था (चांडोळ-घाट), उत्तरेस उर्वरित जमीन व एमएसईबी पॉवर हाऊस आणि दक्षिणेस गट क्रमांक ६५९ मधील उर्वरित जमीन अशी आह...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

  बुलढाणा, दि. 01 (जिमाका) :     अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी अर्ज करण्याची मुदत १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील, शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असतानाही प्रवेश न मिळालेल्या तसेच इयत्ता ११ वी, १२ वी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाविद्यालये अथवा शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सोयी-सुविधांसाठी आर्थिक मदत दिली जाते. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळाचा वापर करावा. मागील शैक्षणिक वर्षात स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनीही योजनेच्या निकषांनुसार नूतनीकरणासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची मुदत १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली असून, आवश्यक कागदपत्र...

सेवासंकल्प अभियानांतर्गत देऊळगाव राजा पोस्ट ऑफिसमध्ये आधार सेवा उपलब्ध

Image
  बुलढाणा, दि. 01 (जिमाका) :    नागरिकांच्या सोयीसाठी   सेवासंकल्प अभियानांतर्गत देऊळगाव राजा पोस्ट ऑफिस येथे आधार नोंदणी व आधार दुरुस्तीची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आधारशी संबंधित आवश्यक सेवा आता स्थानिक पातळीवरच घेता येणार आहेत. देऊळगाव राजा पोस्ट ऑफिसमधील आधार सेवा केंद्राची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत राहणार आहे. नवीन आधार नोंदणी तसेच आधारमधील आवश्यक दुरुस्ती व अद्ययावतीकरणासाठी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आधारशी संबंधित कामांसाठी नागरिकांना दूरवर जाण्याची आवश्यकता भासू नये आणि स्थानिक पातळीवर सुलभ सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. देऊळगाव राजा व परिसरातील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह पोस्ट ऑफिसमध्ये येऊन आधार सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर, बुलढाणा विभाग, बुलढाणा यांच्याकडून करण्यात आले आहे. 0000