पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील किन्ही नाईक गावासाठी टँकर मंजूर

 


        बुलढाणा दि.11 (जिमाका): पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता चिखली तालुक्यातील किन्ही नाईक गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली.

किन्ही नाईक येथे 700  पशुधन व 2609  लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 62 हजार 180 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी, बुलढाणा यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

Comments