विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी खामगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची विशेष मोहीम; ८ ते २० जूनदरम्यान स्कूल बसची फेरतपासणी; नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
बुलढाणा,दि.5 (जिमाका) : शालेय
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी खामगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शालेय
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व स्कूल बसांची फेरतपासणीसाठी विशेष मोहीम राबविली
जाणार आहे. ही मोहिम दि. 8 ते 20 जून 2026 दरम्यान होणार असून सर्व स्कूल बस चालक, मालक व शैक्षणिक संस्थांनी
आपल्या शाळास्तरीय स्कूल बस सुरक्षितता समितीशी संपर्क साधावा किंवा उपप्रादेशिक परिवहन
अधिकारी कार्यालय, खामगाव येथे आवश्यक फेरतपासणी करून घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागामार्फत
करण्यात आले आहे.
उच्च
न्यायालय, मुंबई यांच्या जनहित याचिका क्र. ९७/२०१६ मधील दि. १७ डिसेंबर २०१९ च्या
आदेशानुसार तसेच स्कूल बस नियमावली २०११ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या
सर्व स्कूल बसांची फेरतपासणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, खामगाव यांच्या वतीने दि.
८ जून २०२६ ते २० जून २०२६ या कालावधीत होणार असून आवश्यक फेरतपासणी करून घ्यावी.
विद्यार्थ्यांच्या
सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने बसची तांत्रिक तपासणी, सुरक्षा साधनांची उपलब्धता तसेच
नियमांचे पालन याची खातरजमा करण्यात येणार आहे. फेरतपासणी पूर्ण झाल्यानंतरच शालेय
विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच दि. १ जुलै २०२६
नंतरही फेरतपासणी न केलेल्या स्कूल बसेसविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये कठोर कारवाई
करण्यात येणार असल्याचा इशाराही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, खामगाव यांनी
दिला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व संबंधितांनी वेळेत फेरतपासणी
करून घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागामार्फत करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment