Posts

चारा साक्षरतेसाठी पशुसंवर्धन विभागाचा पशुपालकांशी संवाद**दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याचा काटकसरीने वापर, मुरघास निर्मिती व वैरण पिकांच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन; महिला पशुधन विकास अधिकाऱ्यांचा उल्लेखनीय पुढाकार

Image
*चारा साक्षरतेसाठी पशुसंवर्धन विभागाचा पशुपालकांशी संवाद* *दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याचा काटकसरीने वापर, मुरघास निर्मिती व वैरण पिकांच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन; महिला पशुधन विकास अधिकाऱ्यांचा उल्लेखनीय पुढाकार* *बुलढाणा, दि. १८ (जिमाका) :* जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासोबतच उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर करण्याबाबत पशुपालकांमध्ये जनजागृती केली जात आहे. यासाठी जिल्ह्यात चारा साक्षरता उपक्रमांतर्गत सायंकाळच्या वेळी पशुपालकांशी थेट संवाद साधून चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. बहुतांश पशुपालक सायंकाळी घरी उपलब्ध असल्याने त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि आवश्यक मार्गदर्शन करणे शक्य होत आहे. या चर्चा सत्रांमध्ये दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने वापर कसा करावा, पशुधनाच्या आहाराचे योग्य नियोजन कसे करावे, तसेच आगामी रब्बी हंगामात वैरण पिकांची लागवड व नियोजन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. चाऱ्याची कमतरता भासू नय...

केंद्रीय पथक शेतकऱ्यांच्या बांधावर! यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

Image
*केंद्रीय पथक शेतकऱ्यांच्या बांधावर! यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी* > दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या > कापूस, सोयाबीन, तूर पिकांची प्रत्यक्ष पाहणी व मूल्यांकन > दुष्काळी संकटाशी दोन हात करण्यासाठी शेतकऱ्यांना दिला धीर > शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक > पीक परिस्थितीचा अहवाल केंद्र सरकारला सादर करणार *बुलढाणा, दि.10 :* यंदाच्या खरीप हंगामात पावसातील खंड आणि पिके करपल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाने आज यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा केला. पथकाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांची प्रत्यक्ष पाहणी व मूल्यांकन केले. तसेच दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा, अडचणी आणि मागण्या जाणून घेत त्यांना संकटाशी दोन हात करण्यासाठी धीर दिला. यंदाच्या खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळा...

पीक विमा तक्रार व नुकसानीच्या माहितीसाठी तालुकास्तरीय प्रतिनिधींशी संपर्क साधावा; कृषी विभागाचे आवाहन

Image
*पीक विमा तक्रार व नुकसानीच्या माहितीसाठी तालुकास्तरीय प्रतिनिधींशी संपर्क साधावा; कृषी विभागाचे आवाहन* *बुलढाणा, दि. १७ (जिमाका) :* विमा भरताना अथवा पिकांच्या नुकसानीची माहिती देताना शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास त्यांनी संबंधित तालुक्यातील बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधींशी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी तत्काळ संपर्क साधावा. यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर कंपनीचे प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले असून, प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र संपर्क अधिकारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ तसेच इतर प्रतिकूल परिस्थितींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. तालुकानिहाय विमा समन्वयक आणि जिल्हा व्यवस्थापकांची नावे व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत : *बुलढाणा :* सुरेश कुमावत (जिल्हा व्यवस्थापक) – ७२४०४६६६७६ महावीर चिकटे (जिल्हा व्यवस्थापक) – ८४८२८१९०८२ अमोल गाडेकर (जिल्हा समन्वयक) – ९५८८४११५८८ योगेश मोहिते (तालुका समन्वयक...

पाणीटंचाई निवारणासाठी सज्ज राहा; अवैध पाणी उपशावर कठोर कारवाई करा - जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे निर्देश

Image
      ● पाणीटंचाई व्यवस्थापनाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा ● जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश   ● पाणीगळती दुरुस्ती, वॉटर हार्वेस्टिंग आणि शेततळ्यांच्या कामांना प्राधान्य   बुलढाणा, दि. १६ (जिमाका) : संभाव्य ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे आगामी काळात पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी आतापासूनच प्रभावी नियोजन करावे. अवैध पाणी उपशावर कठोर कारवाई करून उपलब्ध जलस्रोतांचे संरक्षण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी दिले.   जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात आयोजित पाणीटंचाई व्यवस्थापनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.   जिल्ह्यात पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम कर...

वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज बुलढाणा जिल्हा ग्रंथोत्सवाचा उत्साहात शुभारंभ; ग्रंथदिंडी, परिसंवाद व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून वाचनाचा जागर

Image
    - मान्यवरांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन   - बोलीभाषा, साहित्य आणि ग्रंथालय चळवळीच्या संवर्धनावर भर - ग्रंथप्रदर्शन, ग्रंथविक्री, कविसंमेलन व व्याख्यानांची मेजवानी बुलढाणा, दि. १६ (जिमाका) : वाचन संस्कृतीचा विकास, ग्रंथालय चळवळीचे संवर्धन आणि समाजात पुस्तकांविषयी आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय बुलढाणा जिल्हा ग्रंथोत्सवाचा आज गर्दे वाचनालयाच्या सभागृहात उत्साहात शुभारंभ झाला. ग्रंथपूजन, ग्रंथदिंडी आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनातून यावेळी वाचन संस्कृतीचा जागर करण्यात आला. उद्घाटनप्रसंगी मुख्याधिकारी गणेश पांडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. अतुल वानखडे, सहायक माहिती अधिकारी सतिश बगमारे, गोविंद गायकी, संजय बनसोड, रमेश इंगळे यांच्यासह ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. अतुल वानखडे यांनी प्रास्ताविकातून वाचन संस्कृतीचे महत्त्व विशद करत ग्रंथालय चळवळीच्या संवर्धनाची आवश्यकता अधोरेखित केली. संजय बनसोड यांनी पुस्तक वाचनातून मिळणारा आन...

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक - 2026 मतदानासाठी मतदारांना विशेष नैमित्तिक रजा जाहिर

    बुलढाणा, दि. 16 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे. निवडणूकीसाठी मतदार असलेल्या शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष नैमित्तिक रजा जाहिर करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने दिनांक 22 सप्टेंबर, 2026 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये औरंगाबाद विभाग, पुणे‍ विभाग व नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ तसेच अमरावती विभाग व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक - 2026 चा कार्यक्रम जाहिर केलेला आहे. निवडणूकीचे मतदान शुक्रवार दि. 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत व मतमोजणी मंगळवार दि. 27 ऑक्टोबर, 2026 रोजी होणार आहे. निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना मतदानांचा हक्क बजावता यावा, यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 च्या कलम 135B नुसार भर पगारी सुट्टी जाहीर करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने, सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 23 जून, 1991 रोजीच्या शासन निर्णयान्वये पदवीधर/शिक्षक मतदारसंघामध्ये मतदार असलेल्या व्यक्तींना विशेष नैमित्तिक रजा जाहीर करण्यात आलेली आहे. या शा...

विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत चांदूर बिस्वा येथे आरोग्य शिबिर विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, संतुलित आहार आणि आरोग्यदायी सवयींबाबत मार्गदर्शन

Image
    बुलढाणा, दि. १6 (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचे आरोग्य संवर्धन, वैयक्तिक स्वच्छतेबाबत जनजागृती आणि आरोग्यदायी सवयींचा प्रसार करण्याच्या उद्देशाने यशवंत हायस्कूल, चांदूर बिस्वा येथे १५ ऑक्टोबर रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. आयुष्मान आरोग्य मंदिर, चांदूर बिस्वा यांच्या माध्यमातून आयोजित या शिबिरात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.   जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रंजित मंडाले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रिंढे, गटविकास अधिकारी श्री. शेख आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. अकोदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.   शिबिरादरम्यान समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मीरा मरकड यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. यावेळी विद्यार्थ्यांना हात धुण्याची योग्य पद्धत, नखे स्वच्छ व लहान ठेवण्याचे महत्त्व, जेवणापूर्वी तसेच शौचालयाचा वापर केल्यानंतर साबणाने हात धुण्याची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच दातांची नियमित स्वच्छता, संतुलित आहार आणि स्वच्छ पिण्याचे पाणी यांचे आरोग्...