Posts

Showing posts from June, 2026

शेतकरी कल्याणाला बळ; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना

Image
  बुलढाणा, दि. 30 (जिमाका): राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह प्रति शेतकरी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती देण्यात येणार असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची अपेक्षा असून, त्यासाठी सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या शेतकरी हितैषी व लोकाभिमुख कार्याला अभिवादन म्हणून या योजनेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. शेती, सिंचन, जलसंधारण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव या माध्यमातून करण्यात आला आहे. दोन लाखांपर्यंत थेट कर्जमुक्ती : योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जांचा समावेश करण्यात आला आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘जलयुक्त, समृद्ध महाराष्ट्र’ संकल्पनेला बुलढाण्यात बळ; टाटा ट्रस्ट-मानवलोकच्या उपक्रमातून शाश्वत शेतीला चालना

Image
  बुलढाणा, दि. 30 (जिमाका): राज्यातील जलसंधारण, मृदसंवर्धन आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांना बुलढाणा जिल्ह्यात प्रत्यक्ष कृतीची जोड मिळत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात जलसंपदा संवर्धन, हवामान बदलाला तोंड देणारी शेती आणि ग्रामीण विकासाला दिलेल्या प्राधान्यानुसार टाटा ट्रस्ट आणि मानवलोक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेला 'इंटिग्रेटेड सॉईल अँड वॉटर रिसोर्सेस मॅनेजमेंट (SWRM)' प्रकल्प जिल्ह्यातील चिखली व बुलढाणा तालुक्यात ग्रामीण परिवर्तनाचा नवा आदर्श ठरत आहे. पाच वर्षांच्या या प्रकल्पाची अंमलबजावणी ४० गावांमध्ये सुरू असून सुमारे २७ हजार कुटुंबांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. पाणी अडविणे, भूजल पातळी वाढविणे, मृदसंवर्धन, शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविला जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सातत्याने मांडलेल्या ‘पाणी हेच समृद्धीचे मूळ’ या विचाराशी हा उपक्रम सुसंगत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या प्रकल्पांतर्गत १० गावांमध्ये १५ च...

अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी महाडीबीटीवर अर्जाचे आवाहन • फलोत्पादन योजनांसाठी शेतकऱ्यांना अनुदान • प्रथम अर्ज, प्रथम लाभ तत्त्वावर निवड

  बुलढाणा, दि. 30 (जिमाका): एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विविध फलोत्पादन, संरक्षित शेती, मशरूम उत्पादन, शेततळे, मधुमक्षिका पालन, कृषी यांत्रिकीकरण, साठवणूक व प्रक्रिया प्रकल्पांसह अनेक घटकांना मंजुरी देण्यात आली आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. योजनेअंतर्गत फळबाग लागवड, स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रूट, द्राक्ष, केळी, पपई, अवोकॅडो आदी फळपिके, रोपवाटिका, अळिंबी उत्पादन प्रकल्प, फुलशेती, मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पती, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, वैयक्तिक व सामूहिक शेततळे, हरीतगृह, शेडनेटगृह, प्लास्टिक मल्चिंग, फळ कव्हर, तण नियंत्रक अच्छादन, मधुमक्षिका पालन, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, विविध प्रकारचे स्प्रेअर, फार्म गेट पॅक हाऊस, शीतगृह, शीतवाहन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र तसेच कमी खर्चाचे कांदाचाळ व लसूण साठवणूक गृह अशा एकूण २९ घटकांचा समावेश करण्यात आला आहे. या घटकांसाठी पात्रतेनुसार ४० टक्के ते ५० टक्के अर्थसहाय्य तसेच ...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्याचे आवाहन

  बुलढाणा, दि. ३० (जिमाका) : राज्य परिवहन विभागाच्या निर्देशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (High Security Registration Plate - HSRP) बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने वाहनधारकांना तातडीने नोंदणी करून HSRP बसवून घेण्याचे आवाहन केले आहे. HSRP ही विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये असलेली क्रमांक प्लेट असून त्यामध्ये क्रोमियम आधारित होलोग्राम, लेझर कोड आणि कायमस्वरूपी लॉकिंग व्यवस्था असते. त्यामुळे वाहनांची ओळख पटविणे सुलभ होते तसेच चोरी, बनावट क्रमांक प्लेटचा वापर आणि अन्य गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर नियुक्त केंद्रावर वेळापत्रकानुसार HSRP बसवून घेता येणार आहे. वाहनांच्या प्रकारानुसार शुल्क निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, निर्धारित मुदतीनंतर HSRP नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येऊ शकते. त्यामुळे सर्व दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनधारकांनी विलंब न करता...

दुचाकींसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकांचा २ जुलैला लिलाव; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

  बुलढाणा, दि. ३० (जिमाका) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) खामगाव येथे दुचाकी वाहनांसाठी आकर्षक (फॅन्सी) नोंदणी क्रमांक मिळविण्याची नवीन ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक वाहनधारकांनी १ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज सादर करून निर्धारित शुल्कासह डिमांड ड्राफ्ट (डीडी) जमा करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे. एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित अर्जदारांची यादी नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर २ जुलै २०२६ रोजी दुपारी ४ वाजता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, खामगाव येथे खुल्या लिलावाद्वारे संबंधित क्रमांकाचे वाटप करण्यात येणार आहे. लिलावासाठी सादर करण्यात येणारा डिमांड ड्राफ्ट Dy. R.T.O., Khamgaon यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेचा असावा व तो दोन महिन्यांपेक्षा जुना नसावा. प्रत्येक पसंती क्रमांकासाठी स्वतंत्र डीडी आणि स्वतंत्र अर्ज आवश्यक असून, विहित शुल्कापेक्षा कमी रकमेचा डीडी ग्राह्य धरला जाणार नाही. एका अर्जदारास एका क्रमांकासाठी एकच अर्ज...

सामाजिक न्याय दिनानिमित्त बुलढाण्यात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

  बुलढाणा, दि. 30 (जिमाका) : समाज कल्याण कार्यालय व जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जून रोजी राजर्षी शाहू महाराज यांची जयंती तथा सामाजिक न्याय दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज व अन्य महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर 'नशामुक्त भारत अभियान' अंतर्गत उपस्थितांनी व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेतली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त मनोज मेरत हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रमोद येंडाले, सहाय्यक संचालक (इतर मागास व बहुजन कल्याण) दिपाली पाडवी, माजी प्राचार्य विष्णु पाटील आणि समाजसेविका शाहीनी पठाण उपस्थित होत्या. यावेळी समाज कल्याण विभागाच्या विविध पुरस्कारांचे मानकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य विष्णु पाटील यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रातील योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. समाजात समता, सामाजिक न्याय आणि लोककल्याणकारी प्रशासन...

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा कोलवड येथून शुभारंभ; जिल्ह्यात २ लाख ३० हजार बालकांना पोलिओचे दोन थेंब देण्याचे उद्दिष्ट

Image
  बुलढाणा, दि. 30 (जिमाका): पोलिओमुक्त भारताचा दर्जा कायम राखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ रविवारी प्राथमिक आरोग्य केंद्र हतेडी अंतर्गत उपकेंद्र कोलवड येथे उत्साहात झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या हस्ते पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण जवंजाळ, डीईएमओ राजेश धुताडमल, समुदाय आरोग्य अधिकारी, गावाच्या सरपंच सौ. मीराताई पवार, उपसरपंच चंद्रभागाताई पाटील, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी तसेच लाभार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील २ लाख ३० हजार ४०१ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी जिल्हाभरात २ हजार ६९ लसीकरण बूथ उभारण्यात आले असून मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाचे ...

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय उद्घाटन उत्साहात संपन्न

  बुलढाणा, दि. 30 (जिमाका): राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा रविवारी (दि. 28) जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. उद्घाटन कार्यक्रमास निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण घोंगटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी राजेश धुताडमल, वैद्यकीय अधिकारी डॉ. जवरे, सार्वजनिक आरोग्य परिचारिका श्रीमती भालेराव, प्रदीप वानरे, महाले, आरोग्य कर्मचारी तसेच जिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिका व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पालकांना ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन करण्यात आले. पोलिओमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येक पात्र बालकापर्यंत लसीकरण पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आरोग्य विभागाने पालकांनी कोणतेही ...

अमृतचा हरित ऊर्जेकडे मोठा टप्पा; ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि अर्थसहाय्य

Image
  बुलढाणा, दि. 30 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या माध्यमातून राज्यभरात ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेईकल) चार्जिंग स्टेशन व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हरित ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देत युवक, महिला, स्वयं सहाय्यता गट, एमएसएमई उद्योजक तसेच ग्रामीण भागातील इच्छुकांना प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत असल्याने भविष्यात ईव्ही चार्जिंग स्टेशनचे मोठे जाळे उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमृत संस्थेने राज्यातील युवकांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणी, संचालन व व्यवस्थापन, चार्जिंग उपकरणांची देखभाल, सौरऊर्जेवर आधारित चार्जिंग सुविधा, ग्रीन एनर्जी सेवा, ईव्ही तांत्रिक सेवा, फ्रँचायझी मॉडेल तसेच ग्रामीण भागात चार्जिंग हब उभारणीसारख्या विविध क्षेत्रा...

यूपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसाठी अमृतची विशेष अर्थसहाय्य योजना; पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले

  बुलढाणा, दि. 30 (जिमाका): महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तसेच अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षा व मुलाखत पूर्वतयारी योजना राबविण्यात येत असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ सन २०२६-२७ मधील यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मुख्य परीक्षा तसेच मुलाखतीची तयारी करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांना मिळणार आहे. अमृतच्या लक्षित गटामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पाटील, राजपूत, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुंथर, गुजराती, जाट, हिंदू नेपाळी, भूमिहार, लोहारणा, कानबी आदी समाजघटकांचा समावेश आहे. योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसेच मुलाखत पूर्वतयारीसाठी २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य प्रदान करण्यात येणार आहे. इच्छुक उ...

जिल्हा नियोजन समिती बुलढाणा येथे 20 वा राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा

Image
  बुलढाणा, दि. 29 (जिमाका): राष्ट्रीय सांख्यिकीचे जनक प्राध्यापक पी.सी.महालनोबीस यांचा जन्मदिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून जिल्हा नियोजन समिती कार्यालय बुलढाणा येथे माननीय जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा नियोजन अधिकारी बुलढाणा राहुल पवार, कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त बिटोळे, उपायुक्त गोपाल पानगे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी उल्का राणे यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला   सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा सांख्यिकी कार्यालय व जिल्हा नियोजन समिती कार्यालय बुलढाणा येथील कर्मचारी व अधिकारी यांनी रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला. तसेच जिल्हा नियोजन समिती व जिल्हा सांख्यिक कार्यालयामधील उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करून कार्यक्रम साजरा केला   सहायक संशोधन अधिकारी कृष्ण वानखेडे, सांख्यिकी सहाय्यक मिलिंद इंगळे व प्रफुल बाबर यांनी सांख्यिकी दिनाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक संशोधन अधिकारी प्रदीप तोमर यांनी तर आभार प्रदर्शन प्रज्ञा सु...

१ जुलै रोजी अटल पेन्शन योजना जनजागृती दिन; जिल्ह्यात १० हजार नागरिकांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट

  बुलढाणा, दि. 29 (जिमाका): केंद्र शासनाच्या अटल पेन्शन योजना जनजागृती दिनानिमित्त १ जुलै २०२६ रोजी जिल्हाभर विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण (PFRDA) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व बँका, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, बँक प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचा सहभाग राहणार आहे.   असंघटित क्षेत्रातील नागरिकांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षितता मिळावी, या उद्देशाने अटल पेन्शन योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. याअंतर्गत १ जुलै रोजी जिल्ह्यात १० हजार लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.   अटल पेन्शन योजना ही राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत कार्यरत असून तिचे संचालन PFRDA मार्फत केले जाते. ही योजना शेतकरी, फेरीवाले, छोट्या व्यावसायिक, महिला, हमाल, वाहनचालक, बांधकाम मजूर तसेच इतर असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.   योजनेअंतर्गत १८ ते ४० वर्षे वयोगटातील नागरिकांना सहभागी होता येत...

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीचे पैसे जमा होणार ; राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय ! सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना, 36 हजार 500 कोटी रुपयांचे वितरण

Image
    बुलढाणा, दि. 29 (जिमाका):   कधी अवेळी पाऊस, कधी तीव्र दुष्काळ, तर कधी गारपीट आणि अतिवृष्टी... अशा एकामागून एक येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे हवालदिल झालेल्या महाराष्ट्रातील बळिराजाला पुन्हा पायावर उभे करण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ ची घोषणा केली असून, या महाकर्जमुक्ती योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या थेट कर्जखात्यांमध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून सुमारे 36 हजार 500 कोटी रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे.   खरीप हंगामाच्या तोंडावर जाहीर झालेल्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. ही योजना शेतकऱ्यांना केवळ तात्पुरती कर्जमुक्ती देणारी नसून, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना सन्मानाने जगण्याची आणि त्यांना नव्या उमेदीने शेती करण्यासाठी '...

पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

    बुलढाणा, दि. 29 (जिमाका): भारत सरकारतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने प्रजासत्ताक दिन २०२७ निमित्त जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट आणि समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींची नामांकने मागविण्यात आली आहेत. कला, साहित्य व शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्र, समाजकार्य, विज्ञान व अभियांत्रिकी, नागरी सेवा, व्यापार व उद्योग आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.   जिल्ह्यातील पात्र व्यक्तींची नामांकने विहित नमुन्यात भरून दि. ३१ जुलै २०२६ पर्यंत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (http://awards.gov.in) वर ऑनलाइन अपलोड करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. पद्म पुरस्कारांसंदर्भातील अधिक माहिती तसेच ऑनलाइन नामांकन प्रक्रियेची माहिती राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर उपलब्ध असून, इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे प...

विशेष लेख : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६; कर्जाच्या ओझ्यातून मुक्ततेकडे बुलढाणाच्या शेतकऱ्यांची वाटचाल

      राज्य शासनाने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत असून बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेमुळे नव्या आशेने भविष्यातील शेती नियोजनाकडे पाहत आहेत. वाढता उत्पादन खर्च, अनियमित पाऊस, नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमुळे मोठा आधार मिळणार आहे.   कृषिप्रधान जिल्हा म्हणून बुलढाणाची ओळख आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा व इतर नगदी पिकांवर अवलंबून आहेत. मात्र मागील काही वर्षांत हवामानातील बदलांमुळे शेती व्यवसाय अधिक जोखमीचा बनला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्जाच्या माध्यमातून शेती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रतिकूल परिस्थितीमुळे कर्जफेड करणे कठीण झाले. अशा वेळी शासनाची कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार आहे.   या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जातून दिलासा मिळणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ देण्या...

आदिशक्ती संत श्री मुक्ताबाई पालखी आगमनानिमित्त बुलढाण्यात प्रथमच ‘चरणसेवा उपक्रम

Image
    बुलढाणा, दि. 29 (जिमाका): आदिशक्ती संत श्री मुक्ताबाई यांच्या पालखीचे शनिवारी अनेक वारकऱ्यांसह बुलढाणा शहरात आगमन झाले. पालखीच्या स्वागतासह यावर्षी बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच 'चरणसेवा' हा उपक्रम राबविण्यात आला. आषाढी वारीनिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई यांच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून राज्यभर राबविण्यात येणारा हा उपक्रम यंदा प्रथमच बुलढाणा जिल्ह्यात आयोजित करण्यात आला.   बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या पुढाकाराने व शुभहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उपक्रमांतर्गत वसंतप्रभा भौतिक उपचार महाविद्यालय, बुलढाणा तसेच राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालय, बुलढाणा येथील विद्यार्थ्यांनी पालखीसोबत आलेल्या वारकऱ्यांना वेदना कमी करण्यासाठी तेल अभ्यंग व भौतिक उपचार (फिजिओथेरपी) करून उपशम चिकित्सा प्रदान केली. दिवसभर अनेक वारकऱ्यांनी या सेवांचा लाभ घेतला.   मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, मुंबईचे कक्षप्रमुख   रामेश्वरजी ...