एमएसएमई ॲवार्ड 2026' साठी विविध 9 प्रवर्गांमध्ये नामांकने आमंत्रित
बुलढाणा,दि.17 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या
उद्योग, गुंतवणूक व सेवा विभागाच्या पुढाकाराने आणि जागतिक बँक सहाय्यित RAMP
(Raising and Accelerating MSME Performance) योजनेअंतर्गत 'MSME Summit &
Awards 2026' या राज्यस्तरीय भव्य परिषद व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन शनिवार, दि. २७
जून २०२६ रोजी (MSME Day) वाशी, नवी मुंबई येथे करण्यात आले आहे.
या सोहळ्यात राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग
(MSME) क्षेत्रात उत्कृष्ट, नाविन्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांचा
राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. यासाठी विविध 9 प्रवर्गांमध्ये
नामांकने मागविण्यात आली आहेत. पुरस्कार प्रवर्गांमध्ये Champion MSME Award, MSME
Export Award, MSME Manufacturing Award, MSME Service Award, Next-Gen MSME
Award, Women Entrepreneur Award, Artisans/Handicraft Award, Green Enterprise
Award तसेच MSME Digital and AI Excellence Award यांचा समावेश आहे.
सदर पुरस्कारांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून
ती अत्यंत सुलभ करण्यात आली आहे. राज्यातील तसेच बुलढाणा जिल्ह्यातील जास्तीत जास्त
उद्योजकांनी या संधीचा लाभ घेऊन नामांकन सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नामांकनासाठी इच्छुक उद्योजकांनी
https://mahamsmeawards.in या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरावा. तसेच ही माहिती
अधिकाधिक उद्योजकांपर्यंत पोहोचावी यासाठी विविध अधिकृत सोशल मीडिया माध्यमांद्वारे
प्रसारित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे बुलढाणा जिल्ह्यातील उद्योजकांना
राज्यस्तरावर ओळख मिळण्यास आणि त्यांच्या कार्याचा गौरव होण्यास मोठी संधी उपलब्ध होणार
आहे.
0000
Comments
Post a Comment