DIO BULDANA NEWS 23.02.2023
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा
बुलडाणा, दि. 23 : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी शुक्रवार, दि. 24 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
त्यांच्या दौऱ्यानुसार, श्री. गडकरी यांचे सकाळी 8.40 वाजता खामगाव येथील सिद्धीविनायक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर आगमन होईल. त्यानंतर ते सकाळी 9.15 वाजता सतीश जळगावकर यांच्या निवासस्थानी भेट देतील. भेटीनंतर सकाळी 9.45 वाजता सिद्धीविनायक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हेलिपॅडवरून नांदेडकडे प्रयाण करतील.
000000
जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगे बाबा यांना अभिवादन
बुलडाणा, दि. 23 : जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगे बाबा जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
तहसीलदार श्यामला खोत यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिला पाल, नाझर संजय वानखडे, गजानन मोतेकर आदी उपस्थित होते. यावेळी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment