Friday 3 February 2023

DIO BULDANA NEWS 03.02.2023

 स्वाधार योजनेसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

बुलडाणा, दि. 3 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्यासाठी दि. 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचे परिपूर्ण अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या बाजूला असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात दि. 21 डिसेंबर 2022 पासून सकाळी 10 ते 4.30 या वेळेत स्विकारण्यात येत आहे.

जिल्ह्याच्या ठिकाणी, तसेच बुलडाणा नगरपालिका हद्दीपासून 5 किलोमीटरच्या परिसरात असलेली महाविद्यालये, शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या आणि शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतलेला नसलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती तथा नवबौद्ध घटकातील अकरावी, बारावी तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्याक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातर्फे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे.

000000

जिल्ह्यातील फुटबॉलपटूंना जर्मनीत प्रशिक्षणाची विनामुल्य संधी

*जिल्हास्तर एफसी बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 30 : प्रतिभावान फुटबॉलपटूंचा शोध घेण्यासाठी जर्मनी येथील फुटबॉल क्लबशी करार करण्यात आला आहे. यासाठी जिल्हास्तर एफसी बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन दि. 8 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी येथे करण्यात आले आहे. यातून जर्मनी येथील प्रशिक्षणासाठी खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील 14 वर्षाखालील खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आला आहे.

या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या संघांनी स्पर्धास्थळी सकाळी 9 वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. या क्रीडा स्पर्धांमधून विजयी संघ विभाग आणि विभागस्तरावरुन विजयी संघ राज्यस्तरावर खेळण्यास पात्र राहिल. तसेच पराभूत संघातून पाच खेळाडू निवड चाचणीद्वारे पुढील स्तरावर पाठविण्यात येतील. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शाळांनी खेळाडूंचा प्रवेश अर्ज आणि खेळाडूंचे ओळखपत्र, शालेय क्रीडा स्पर्धेकरीता निर्धारीत केलेल्या विहित नमुन्यात तयार करावे, तसेच सोबत आधारकार्ड, बोनाफाईड प्रमाणपत्र आदीसह प्रवेश अर्ज दि. 7 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमा करणे आवश्यक आहे.

राज्यस्तराकरीता पात्र खेळाडू करीता आधारकार्ड, पॅनकार्ड, बोनाफाईड प्रमाणपत्र आणि निवसाबाबतची कागदपत्रे आणि असल्यास पासपोर्टची झेरॉक्स प्रत आदी सादर करणे आवश्यक आहे. क्रीडा स्पर्धेकरीता खेळाडूची जन्मतारीख दि. 1 जानेवारी 2009 किंवा त्यानंतरची असणे आवश्यक आहे. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्यप्राप्त खेळाडूंना जर्मनीमधील म्युनिच येथे फुटबॉलचे अद्यावत प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. या प्रशिक्षणाकरीता येणारा प्रवास, निवास, भोजन, प्रशिक्षण आदीचा संपूर्ण खर्च शासनातर्फे करण्यात येणार आहे. जर्मनी येथील म्युनिच येथे जाण्यासाठी पात्र खेळाडूना कोणताही आर्थिक खर्च करावा लागणार नाही.

जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समुदायाच्या सर्व शाळांनी या क्रीडा स्पर्धेमध्ये संघ सहभागी करावे, यासाठी अल्पसंख्याक पालक, शिक्षक आणि खेळाडूना या क्रीडा स्पर्धेत सहभागी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 14 वर्षाआतील मुलांच्या संघानी एफसी बायर्न फुटबॉल महाराष्ट्र कप या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये आवश्यक कागदपत्रासह दि. 8 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलढाणा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

बुलडाणा, दि. 3 : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. जानेवारी महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. 6 फेब्रुवारी  2023 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा लोकशाही दिन ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

लोकशाही दिनात जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतील. या महिन्यातील लोकशाही दिन दूरचित्रवाणी परिषदेद्वारे घेण्यात येणार आहे. लोकशाही दिनी तक्रारदाराला स्वत: उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारदारानी तक्रार रजिस्टर पोस्टाने प्रभारी अधिकारी, लोकशही दिन, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा यांच्या नावे पाठवावे.

अर्जदाराने अर्ज करताना अर्ज विहित नमुन्यातील असावा, तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, विहित अर्ज नमून्यात 15 दिवस आधी दोन प्रतीत पाठवावेत. तालुकास्तरीय लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हा लोकशाही दिनात अर्ज करावा.

लोकशाही दिनात न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व व अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती जोडल्या नसल्यास असे अर्ज, तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरूपाची नसल्यास अर्ज स्विकारले जाणार नाही.

00000

मागासवर्गीय विद्यार्थ्यानी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि.  3 : मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षात विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यानी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीकृत करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने, राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय पाठ्यक्रमाचे संलग्न असलेल्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येत आहे.

योजनांच्या लाभासाठी अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणाली व सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष, नूतनीकरणाचे अर्ज नोंदणीकृत करण्यासाठी दि. 21 सप्टेंबर 2022 पासून महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष व नूतनीकरणास प्रवेशित असलेल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणीकृत करावे लागणार आहे.

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या महाडीबीटी पोर्टलवरील डॅशबोर्डवर अनुसूचित जाती प्रवर्गाचे एकूण 8 हजार 852, इतर मागास प्रवर्ग, विजाभज व विमाप्र प्रवर्गाचे 22 हजार 771 अर्ज भरण्यात आले आहे. संपूर्ण सत्रातील सरासरीच्या तुलनेत भरलेल्या अर्जांचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ आणि व्यावसायिक महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालयात प्रवेशित, तसेच योजनेस पात्र असलेल्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर भरून घेण्याची कार्यवाही करावी.

कार्यशाळा घेऊन याबाबतची सूचना सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात यावी. यात पात्र मागासवर्गीय विद्यार्थी महाडीबीटी प्रणालीवर आवेदनपत्र भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्राचार्यांनी घ्यावी. असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

0000000

भंगार साहित्य विक्रीसाठी निविदा आमंत्रित

बुलडाणा, दि. 3 : शासकीय आद्योगिक प्रशक्षिण संस्था, सिंदखेडराजा येथील वापरुन निकामी, निरुपयोगी, कालबाह्य यंत्रसामुग्री, निर्लेखित करण्यात आली आहे. हे साहित्य विक्रीसाठी निविदा आमंत्रित करण्यात आल्या आहे.

भंगार साहित्य विक्री, लिलाव करण्यासाठी सिलबंद निविदा मागविण्यात येत आहेत. साहित्याची यादी आणि साहित्य पाहणीसाठी संस्थेत कार्यालयीन वेळेत उपलबध करुन देण्यात येईल. साहित्याची संख्या कमी अधिक करण्याचे अथवा निविदा नाकारण्याचचे पूर्ण अधिकार प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिंदखेड राजा यांनी राखून ठेवले आहे.

मोहोरबंद निविदा कार्यालयीन वेळेत निविदा पेटीत शनिवार, दि. 10 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत टाकण्यात याव्यात. यानंतर निविदा स्विकारल्या जाणार नाही. निविदेच्या शर्ती आणि अटी कार्यालयात उपलब्ध आहेत. निविदा अर्जाची किंमत 100 रुपये रोख भरुन नमूद केलेल्या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.

0000000

नवोदय विद्यालयाच्या चाचणी परीक्षेसाठी

आवेदन पत्र भरण्यास मुदतवाढ

बुलडाणा, दि. 3 : जवाहर नवोदय विद्यालयाच्या सहावीमधील प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. आवेदन पत्र ऑनलाईन पद्धतीने भरण्याची मुदत 31 जानेवारी 2023 होती, ती आता दि. 8 फेब्रुवारी 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

जिल्ह्यातील विद्यार्थी शैक्षणिक सन 2022-23मध्ये इयत्ता पाचव्या वर्गात शिकत असतील, त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, वाढीव मुदतीत आपला ऑनलाईन फॉर्म navodya.gov.in या संकेतस्थळावर भरावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय शेगावचे प्राचार्य आर. आर. कसर यांनी केले आहे.

0000000

नवोदयच्या नववी प्रवेशासाठी 11 फेब्रुवारी रोजी निवड चाचणी

बुलडाणा, दि. 3 : जवाहर नवोदय विद्यालयातील नववीच्या प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा दि. 11 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11.15 वाजता होणार आहे. तीन परिक्षा केंद्रावर ही परिक्षा घेण्यात येणार आहे.

ही परिक्षा जवाहर नवोदय विद्यालय, शेगाव, बुरुंगले विद्यालय, शेगाव आणि जे. व्ही. मेहता हायस्कूल, खामगाव तीन केंद्रावर होणार आहे. या परीक्षेकरीता विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 10.30 वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षेचे प्रवेश पत्र navodaya.gov.in. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संबधित शाळेतील मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी यांनी प्रवेश पत्र डाउनलोड करून परिक्षेस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment