Monday 30 August 2021

DIO BULDANA NEWS 30.8.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 772 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 20 पॉझिटिव्ह                                                                                        • 05 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 792 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 772 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 20 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 7 व रॅपीड अँटीजेन चाचणीमधील 13  अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 482  तर रॅपिड टेस्टमधील 290 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 772 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  दे.राजा शहर : 6, दे. राजा तालुका : दगडवाडी 1, चिखली तालुका : केळवद 1, पेठ 1, चिंचखेड 1, कोलारा 1, बुलडाणा तालुका : अंबोडा 1, सिं. राजा तालुका : आंचली 1, लोणार तालुका : कोयाळी दहातोंडे 6, वाडी वाघोली 1,  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 20 रूग्ण आढळले आहे.                                                                                    

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 689428 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86696 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86696 आहे.  आज रोजी 1150 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 689428 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87413 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86696 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 44 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

                                                            ***********

अंढेरा तलाव पाच वर्षासाठी लिलावाद्वारे मासेमारीकरीता ठेक्याने देणार

बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : जिल्ह्यातील 500 हेक्टर खालील पाटबंधारे विभागाचा 31 हेक्टर क्षेत्रफळाचा अंढेरा तलाव ता. दे. राजा सन 2021-22 ते सन 2025-26 पर्यंतचे पाच वर्षाचे कालावधीसाठी मासेमारीकरीता ठेक्याने देण्यात येणार आहे. यासाठी शासन निर्णय 3 जुलै 2019 मधील अटी, शर्तीचे अधिन राहून जाहीर लिलाव पद्धत अंवलबण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत पात्र मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था / संघ यांच्याकडून जाहीर लिलाव पद्धतीने देण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहे.

   अंढेरा तलावासाठी 10 हजार 980 रूपये बयाणा रक्कमेचा सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), बुलडाणा यांच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेची दर्शनी हुंडी (डिडी) सादर करणे आवश्यक आहे. बोली मध्ये भाग घेणाऱ्या इच्छुक संस्थेच्या बँक खात्यावर संबंधित तलावाची न्युनतम तलाव ठेका रक्कमेएवढी शिल्लक दर्शविणारे बँकेचे प्रमाणित केलेले स्टेटमेंट किंवा पासबुकाची प्रत सादर करावी. इच्छुक संस्था सद्यस्थितीत कार्यरत असलेबाबत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, बुलडाणा यांचे प्रमाणपत्र व संस्था नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेचे गत तीन वर्षाचे लेखापरीक्षण व सनदी अथवा प्रमाणीत लेखा पालाकडून प्रमाणीत केलेला ताळेबंद सादर करावा. संस्थेचे लेखा परीक्षण वर्ग हा किमान क वर्ग असावा. संस्था ही मत्स्यव्यवसाय विभागाची थकबाकीदार नसावी.

    जाहीर बोली लिलाव संच प्राप्त करण्याचा कालावधी 15 सप्टेंबर 2021 पर्यंत आहे. लिलाव संच दाखल करण्याचे अंतिम तारिख 17 सप्टेंबर 2021 रोजी सायं 5 वाजेपर्यंत आहे. लिलाव पूर्व बैठकीची तारीख ही 24 सप्टेंबर 2021  असून जाहीर लिलाव हा 27 सप्टेंबर रोजी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, बस स्थानकासमोर, बुलडाणा आहे. अधिक माहितीसाठी 07262- 242254 क्रमांकावर संपर्क साधावा.  लिलाव बाबत किंवा कार्यालयीन प्रक्रियेबाबत काही वाद निर्माण झाल्यास सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांचा निर्णय अंतिम राहणार आहे.  जलाशय / तलाव ठेका अनामत रक्कम ही बोलीने निर्धारीत केलेल्या जलाशय तालव ठेका रक्कमेच्या अथवा निवीदेद्वारे निश्चित केलेल्या ठेका रक्कमेच्या 20 टक्के राहणार आहे. तरी सदर तलाव मासेमारी ठेक्याने देण्यासाठी जिल्ह्यातील मस्त्यव्यवसाय सहकारी संस्थांनी तसेच मत्स्यकास्तकार यांनी 27 सप्टेंबर 2021 पर्यंत विहीत नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, प्रशासकीय इमारत, बस स्थानकासमोर, बुलडाणा येथे दाखल करावे, असे आवाहन सहायक आयुक्त स. इ नायकवडी यांनी केले आहे.   

No comments:

Post a Comment