Friday 20 August 2021

DIO BULDANA NEWS 20.8.2021

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 1029 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह                                                            • 02 रूग्णांना मिळाली सुट्टी                                                                                                                                                           

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1030 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1029 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपीड अँटींजेन टेस्टमधील एका अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 737 तर रॅपिड टेस्टमधील 292 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1029 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : दे. राजा तालुका : डोंगर सोयगांव 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळला आहे.  तसेच आज 02 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.                                                                                                       

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 674517 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86664 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86664 आहे.  आज रोजी 1468 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 674517 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87364 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86664 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 28 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.                                                                       

****

                    जिल्ह्यात पावसाची संततधार…!

  • संग्रामपूर तालुक्यात सर्वात जास्त पाऊस

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. परिणामी खरीपाची पिके पावसासाठी आसुसली. सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी सिंचन सुरू केले. तर व्यवस्था नसलेले शेतकरी पावसाची आतुरतेने प्रतिक्षा करीत होते. मात्र दोन दिवसांपासून जिल्ह्यात कुठे जोरदार, तर कुठे रिपरिप पाऊस होत आहे. पावसाची संततधार जिल्हावासियांना अनुभवायला मिळत आहे. जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील आकडेवारीनुसार संग्रामपूर तालुक्यात सर्वात जास्त 20.7 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.  

   जिल्ह्यात आज 20 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार पावसाची झालेली नोंद पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आतापर्यंत पडलेल्या पावसाची – सर्वात जास्त पाऊस संग्रामपूर : 20.7 मि.मी (395.6 मि. मी), मलकापूर : 20.6 (267.7 मि. मी), जळगांव जामोद : 16.6 (207.6), नांदुरा: 11.9 (296), दे.राजा : 10 (440.9),  शेगांव : 9.3 (240.7), लोणार : 8.3 (588.2), मोताळा : 8.3 (315.1), चिखली : 7.4 (505.6), सिं. राजा : 7 (632.7), बुलडाणा : 6.4 (430.5), खामगांव : 5.1 (435.8) आणि सर्वात कमी मेहकर तालुक्यात 4.9 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. आजपर्यंत सर्वात कमी 207.6 मि.मी पावसाची नोंद जळगांव जामोद तालुक्यात करण्यात आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 136.5 मि. मी पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी 10.5 मि. मी आहे. आतापर्यंत सर्वात जास्त 776 मि.मी पाऊस मेहकर तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस जळगांव जामोद तालुक्यात 207.6 मि.मी झाला आहे. जिल्ह्यात 1 जुन 2021 पासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी 425.6 मि. मी आहे.

******


जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिनाची शपथ

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ 20 ऑगस्ट हा दिवस  सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाची शपथ आज तहसिलदार शामला खोत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अधिकारी व कर्मचारी यांना दिली. यावेळी सामाजिक एकोपा, सौहार्द ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी  नायब तहसिलदार संजय बंगाळे, आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

*****

महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांचा दौरा

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर 21 ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे: दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह, शेगांव येथे आगमन व राखीव, दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा स्व. शिवशंकरभाऊ पाटील यांचे निवासस्थानी सांत्वनपर भेट, सकाळी 10 वा शेगांव येथून मोटारीने बाळापूर जि. अकोलाकडे प्रयाण करतील.

No comments:

Post a Comment