Thursday 12 August 2021

DIO BULDANA NEWS 12.8.2021

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 1962 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 7 पॉझिटिव्ह

• 01 रूग्णाला मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि. 12 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1969 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1962 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 7 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपीड टेस्टमधील 7 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 452 तर रॅपिड टेस्टमधील 1510 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1962 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली तालुका : करणखेड 1, भालगांव 2, नायगांव 1, शिवणी 1,  चिखली शहर : 1, बुलडाणा तालुका : गजरखेड 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 7 रूग्ण आढळले आहे. 

      तसेच आज 01 रुग्णाने कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.    

   तसेच आजपर्यंत 660661 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86612 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86612 आहे. 

  आज रोजी 1793 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 660661 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87351 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86612 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 67 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

******

गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज उर्फ बंटी पाटील  जिल्हा दौऱ्यावर

 बुलडाणा,(जिमाका) दि. 12 :  गृह राज्यमंत्री (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील दिनांक 13 ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता शेगांव येथे आगमन व कै. शिवशंकरभाऊ पाटील, व्यवस्थापकीय विश्वस्त, श्री. गजानन महाराज संस्थान, शेगांव यांच्या निवासस्थानी सदीच्छा भेट, सकाळी 11 वाजता शेगांव येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

No comments:

Post a Comment