Wednesday 18 August 2021

DIO BULDANA NEWS 18.8.2021

 

आकाशवाणीच्यावतीने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि. 18 : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने आकाशवाणी, मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्वातंत्र्य संग्रामातील महत्वाच्या बाबींविषयी समाजात औत्स्युक्य निर्माण व्हावे, ऐतिहासिक स्मृतींना उजाळा मिळावा आणि समाज मनात त्याचे स्थान कायम रहावे, या उद्देशाने ज्ञान प्रबोधनासाठी ही स्पर्धा 16 ऑगस्टपासून आयोजित करण्यात आली आहे.

    या स्पर्धेसाठी आकाशवाणीच्या बातमीपत्रातून दर सोमवारी एक प्रश्न विचारल्या जाणार आहे. स्पर्धकांनी या प्रश्नाचे उत्तर आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडे quiz75news@gmail.com या ई मेल द्वारे पाठवायचे आहे. सर्वप्रथम योग्य उत्तर देणाऱ्या यशस्वी स्पर्धकाचे नाव शुक्रवारच्या बातमीपत्रातून प्रसारीत करण्यात येणार आहे. आकाशवाणीच्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरही फोटोसह विजेत्या स्पर्धकाचे नाव प्रकाशित करण्यात येईल. तसेच प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आकाशवाणी, मुंबईच्या वृत्त विभागप्रमुख सरस्वती कुवळेकर यांनी केले आहे.    

******                  

पोलीस स्टेशनमध्ये वाहन जप्त असल्यास कागदपत्रांमधून मालकी हक्क दाखवावा

  • जिल्हा पोलीस दलाचे आवाहन
  • 275 दुचाकी व एक तीन चाकी ऑटो

बुलडाणा,(जिमाका) दि. 18 : जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला बेवारस स्थितीत मिळून आलेले 275 दुचाकी व एक तीन चाकी ऑटो जप्त करण्यात आली आहे. सर्व बेवारस वाहने संकलीत करून पोलीस मुख्यालय, बुलडाणा येथील आवारात जप्त करण्यात आलेली आहे. त्या सर्व बेवारस वाहनांची निर्गती करणे असल्याने जप्त करण्यात आलेल्या वाहनावर ज्या कोणत्याही व्यक्तीचा हक्क असेल त्यांनी हे आवाहन प्रकाशित झाल्याचे तारखेपासून सात दिवसाचे आत पोलीस मुख्यालय, बुलडाणा येथे येऊन बेवारस स्थितीत जप्त करण्यात आलेल्या वाहनांचे कागदपत्रे आणून आपला मालकी हक्क दाखवावा.

    पोलीस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आलेले मालमत्तेवर कुणीही मालकी हक्क प्रस्थापित केला नाही, तर जप्त मालमत्तेची निर्गती करण्यात येणार आहे. तरी ज्या नागरिकांचे वाहन चोरी झालेले, हरविलेले बाबत तक्रारी असल्यास त्यांनी बुलडाणा जिल्हा पोलीस दलाचे www.buldhanapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध आलेल्या वाहनांचे यादीची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन पोलीस उपअधिक्षक गिरीष ताथोड यांनी केले आहे.

******

                                  कोरोना अलर्ट : प्राप्त 1863 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह                           • 07 रूग्णांना मिळाली सुट्टी                                                                                                                                                           

बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1864 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1863 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील एका  अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 463 तर रॅपिड टेस्टमधील 1500 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1863 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळला आहे.  तसेच आज 07 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.                                                                                                       

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 671530 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86661 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86661 आहे.  आज रोजी 1833 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 671530 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87362 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86661 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.                                                                       

****

                     स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने न्यायालयीन कर्मचाऱ्यांची दौड

बुलडाणा,(जिमाका) दि. 18 : जिल्हा न्यायालयाच्या अधिनस्थ असलेल्या वि. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मोताळा व वि. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर चिखली येथील कार्यरत असलेले कर्मचारी बेलीफ गजानन पाटील व कनिष्ठ लिपीक सुरेश शिंबरे यांनी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने न्यायालयीन कर्मचारी धावतो देशाकरीताच्या माध्यमातून 22 कि.मी ची दौड केली. या दौडमधून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. दौडला चिखली येथे वि. दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, चिखली यांनी सकाळी हिरवी झेंडी दिली.

    या न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी जिल्हा न्यायालय, बुलडाणा प्रबंधक व्ही. आर भारंबे यांचेस्फुर्तीने ही दौड केली. न्यायालयीन कर्मचारी दौडसाठी चिखली येथून सकाळी 5.10 वाजता निघून 7.15 वा जिल्हा न्यायालय, बुलडाणा येथे पोहोचले. दौड दरम्यान लक्ष्मीकांत सपकाळ, मोताळा यांनी त्यांना पायलट म्हणून मदत केली. जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात वि. जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांनी धावपटू कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष विजय सावळे उपस्थित होते. दौडदरम्यान प्रत्येक 5 ते 7 कि.मी च्या अंतरावर न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून श्री. पाटील व श्री. शिंबरे यांचा उत्साह वाढविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रबंधक व्ही. आर भारंबे, डी. एल सपकाळ, प्रदीप शिंदे, मंगेश चोपडा यांनी प्रयत्न केले.  

******

No comments:

Post a Comment