सेवासंकल्प अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न; ग्रामपंचायत, आरोग्य व विविध विभागांच्या समन्वयातून गावे आरोग्य संपन्न करण्याचा संकल्प
बुलढाणा, दि. २९ (जिमाका) : आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात
येत असलेल्या ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव – कसं काय?’ व ‘सेवासंकल्प अभियाना’ अंतर्गत
छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा परिषद सभागृह, बुलढाणा येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात
संपन्न झाली.
मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात
(भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
रणजीत मंडाले, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, अतिरिक्त जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. निलेश जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शिवशंकर भारसाकळे,
जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालकल्याण) प्रमोद येंडोले, कार्यकारी अभियंता
(बांधकाम) एस. एस. गुडदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
कार्यशाळेत प्रत्येक ग्रामपंचायतीने
आपल्या गावाला आरोग्य संपन्न करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करावे, याबाबत
मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग तसेच
अन्य संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून काम करण्यावर विशेष भर देण्यात आला.
गटचर्चेतून कृतीयोग्य उपाययोजनांवर मंथन
कार्यशाळेत तालुकानिहाय गट तयार करून
गटचर्चा आणि पेपर प्रेझेंटेशन घेण्यात आले. ‘आपले गाव आरोग्य संपन्न कसे करता येईल?’
या विषयावर सहभागींकडून विविध कृतीयोग्य उपाययोजना मांडण्यात आल्या. ग्रामपंचायत स्तरावर
अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक नियोजनाबाबतही मार्गदर्शन करण्यात
आले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकळे
यांनी ग्रामस्तरावर आरोग्य संपन्न गावासाठी राबवावयाच्या विविध उपाययोजनांबाबत सविस्तर
मार्गदर्शन केले. जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव यांनी अभियानाची
अंमलबजावणी प्रक्रिया तसेच विविध उपक्रमांची माहिती दिली. राज्यस्तरीय समन्वयक खंडू
सोनटक्के आणि एन. पी. पुरी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
विविध विभागांच्या सहभागातून अभियानाला गती
कार्यशाळेचे प्रास्ताविक वैद्यकीय अधिकारी
डॉ. शैलेश खंडारे यांनी केले. कार्यशाळेस सर्व तालुका गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य
अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, गट प्रवर्तक, आशा व आरोग्य कर्मचारी
उपस्थित होते.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा
विस्तार व माध्यम अधिकारी राजू धुताडमल, सुनील लोखंडे, शालीकराम गवई, विजय जाधव आणि
शीतल साखळीकर यांनी परिश्रम घेतले. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग
आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयातून बुलढाणा जिल्ह्यातील गावे आरोग्य संपन्न करण्याचा
संकल्प यावेळी करण्यात आला.
0000
%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%82%20%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5,%20%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%20%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%20%E2%80%93%20%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%82%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF.jpeg)


Comments
Post a Comment