सेवा संकल्प अभियानांतर्गत अंत्री देशमुख येथे आरोग्य शिबिर; आरोग्य तपासणीसह हिवताप, साथरोग प्रतिबंधाबाबत जनजागृती
बुलढाणा,
दि. २८ (जिमाका) : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रंजित मंडाले तसेच तालुका आरोग्य अधिकारी
डॉ. सुरज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र, देऊळगाव माळी अंतर्गत
मौजे अंत्री देशमुख येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात
आले. या शिबिरामध्ये गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नागरिकांना आवश्यक
आरोग्य सेवा, आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच आजारांपासून बचाव करण्याबाबत माहिती देण्यात
आली.
यावेळी
गावामध्ये विशेष कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. हिवताप तसेच इतर साथरोगांच्या प्रतिबंधासाठी
आवश्यक उपाययोजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. घराच्या परिसरात पाणी साचू
न देणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्याचे महत्त्व नागरिकांना
समजावून सांगण्यात आले.
हिवताप
अथवा इतर साथरोगांची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी विलंब न करता जवळच्या आरोग्य केंद्राशी
संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले. नागरिकांनी आरोग्य विभागाच्या
प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले.
0000

Comments
Post a Comment