बुलडाणा प्रधान डाकघरात आधार सेवा आता सकाळी ८ वाजेपासून
बुलडाणा, दि. २८ (जिमाका) : नागरिकांच्या सोयीसाठी बुलडाणा प्रधान डाकघर येथील आधार
नोंदणी व आधार दुरुस्ती सेवा यापुढे सकाळी लवकर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दि.
१ ऑक्टोबर २०२६ पासून बुलडाणा प्रधान डाकघरातील आधार सेवा केंद्राची वेळ सकाळी ८ ते
सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहणार आहे.
या विस्तारित वेळेमुळे नागरिकांना नवीन आधार नोंदणी, आधारमधील
आवश्यक दुरुस्ती तसेच आधार अद्ययावतीकरणाच्या सेवा घेणे अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः
विद्यार्थी, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार
आधार सेवा घेता येणार आहे. नागरिकांनी आधारसंबंधित आवश्यक कागदपत्रांसह बुलडाणा प्रधान
डाकघर येथील आधार सेवा केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन बुलडाणा विभागाचे अधीक्षक डाकघर
गजेंद्र जाधव यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment