आदर्श आचारसंहितेमुळे नियोजित रोजगार महाकुंभ महाराष्ट्र-2026 स्थगित
बुलढाणा, दि. 24 (जिमाका): जिल्ह्यातील रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने
29 सप्टेंबर 2026 रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नियोजित करण्यात आलेला ‘रोजगार
महाकुंभ महाराष्ट्र-2026’ आदर्श आचारसंहितेमुळे स्थगित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या अमरावती
विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-2026 च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता
जिल्ह्यात लागू झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 13 ठिकाणी नियोजित रोजगार मेळावे स्थगित
करून पुढे ढकलण्यात आले आहेत. या मेळाव्यांच्या पुढील तारखेबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात
येणार आहे.
स्थगित करण्यात आलेल्या मेळाव्यांमध्ये
बुलढाणा येथील मॉडेल डिग्री महाविद्यालय, चिखली येथील श्री शिवाजी महाविद्यालय, खामगाव
येथील शासकीय तंत्रनिकेतन व सिद्धीविनायक टेक्निकल कॅम्पस, मलकापूर येथील जनता कला
व वाणिज्य महाविद्यालय, मेहकर येथील एम.ई.एस. कला व वाणिज्य महाविद्यालय, लोणार येथील
भगवानबाबा कला व वाणिज्य महाविद्यालय, देऊळगाव राजा येथील श्री व्यंकटेश कला, वाणिज्य
व विज्ञान महाविद्यालय, मोताळा येथील के.बी.जे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शेगाव येथील
सरस्वती कॉलेज, नांदुरा येथील श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय, जळगाव जामोद येथील
श्रीपाद कृष्णा कोल्हटकर महाविद्यालय आणि सिंदखेड राजा येथील राजमाता पॅरामेडिकल कॉलेज
यांचा समावेश आहे.
रोजगार इच्छुक उमेदवारांनी याची नोंद
घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक
आयुक्त ग.प्र. बिटोडे यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment